नवीन वर्षात देशात 600 हून अधिक कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. (Latest Marathi News)
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक 31 डिसेंबरला पार्टी करत होते. यामध्ये कोरोना व्हायरसनं देखील हजेरी लावल्याचं समोर येत आहे. कोरोना विषाणूमुळं नववर्षाच्या उत्सवावर काही अंशी विरजन पडल्याचं दिसून आलं. आतापर्यंत कोरोना विषाणुमुळं 600 हून अधिक लोकं संक्रमित झाले आहेत, तर 3 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 400 च्या जवळ पोहोचली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं सरकारसह सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 636 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनाची लागण झालेल्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये दोन आणि तामिळनाडूमध्ये एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोना विषाणूचे 4 हजार 394 सक्रिय रुग्ण आहेत.
गुरुग्राममध्ये एका महिन्यात 25 रुग्ण : देशात कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर केल्याचं दिसत आहे. गुरुग्राममध्येही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. नववर्षाच्या सुरूवातीलाच तेथे कोरोनाच्या दोन रुग्णांची नोंद झाली. यात एक महिला आणि तरुणाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच ही महिला गोव्याला गेली होती, तर तरुण केरळहून परतला होता. डिसेंबर महिन्यात कोरोना विषाणूच्या एकूण 25 रुग्णांची नोंद झाली आहे.
JN.1 चे एकूण 162 रुग्ण : कोरोना व्हायरस JN.1चा नवीन प्रकार देखील देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पसरत आहे. हा विषाणू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत आहे.
2023 मध्ये नवीन प्रकार JN.1चे एकूण 162 रुग्ण समोर आले आहेत. या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत, तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत केरळमध्ये 83 आणि गुजरातमध्ये 34 रुग्ण आढळले आहेत. याबाबत केंद्रासह राज्य सरकारने नागरिक तसेच रुग्णालयांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहेत.
Edited By - Rohini Gudaghe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.