Pankaja Munde In Beed Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde In Beed: बीडमध्ये पंकजा मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी; 151 तोफांची सलामी देत जंगी स्वागत

Pankaja Munde Welcome Celebration: दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Ruchika Jadhav

Beed News:

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाचंग्री गावात जंगी स्वागत करण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलेय. शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे आज बीड जिल्ह्यात आगमन झाल्याने कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात तोफांची अतिशबाजी करण्यात आली आहे. महिलांनी पंकजा यांचे औक्षण देखील केले. (Latest Political News)

संत भगवान बाबा जयंती उत्सवात पाटोदा येथील कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे यांची रॅली काढून जंगी मिरवणूक करण्यात येणार आहे. तसेच पाटोदा , बीड, वडवणी , तेलगाव सिरसाळा, परळी या ठिकाणी जंगी स्वागत केले जाणार आहे. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

पंकजा मुंडे गेल्या २ महिन्यांपासून बीडमध्ये आल्या नव्हत्या. एवढ्या दिवसांनी त्या आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणीत झाला. पंकजा यांच्या स्वागतासाठी तब्बल १५१ तोफांची सलामी देखील देण्यात आली.

पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले की, "मला सध्या मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी आणि दिल्लीमध्ये चिटणीस केल आहे सह प्रभारी केल्यामुळे जे काम सांगतीले ते मी करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला सध्या काही काम नाही माझा काही रोल नाही. त्यामुळे माझे कार्यकर्ते मला विचारतात तुम्ही राज्यात दिसत नाही? याच कारणामुळे मी देवदर्शन करण्याच्या निमित्ताने दौरा काढला आहे." पंकजा मुंडेंच्या जंगी स्वागताचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटात जाणार

Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?

SCROLL FOR NEXT