Shruti Vilas Kadam
दोरी उडी मारणे हा प्रभावी कार्डिओ व्यायाम आहे. रोज फक्त १५ मिनिटे स्किपिंग केल्यास कॅलरीज झपाट्याने बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
स्किपिंगमुळे हृदयाची गती सुधारते आणि रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
दोरी उडी मारताना पाय, हात, खांदे आणि पोटाचे स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे संपूर्ण शरीर टोन होण्यास मदत मिळते.
नियमित स्किपिंग केल्याने शरीराची सहनशक्ती वाढते आणि थकवा लवकर येत नाही. दैनंदिन कामांमध्येही उत्साह जाणवतो.
दोरी उडी मारताना शरीराचा तोल राखावा लागतो. यामुळे बॉडी बॅलन्स, कोऑर्डिनेशन आणि फोकस सुधारतो.
व्यायामामुळे एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो.
दोरी उडी मारण्यासाठी जिमची गरज नसते. घरच्या घरी, कमी वेळेत आणि कमी खर्चात हा व्यायाम करता येतो.