Bhagat Singh Koshyari News
Bhagat Singh Koshyari News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'भगत सिंह कोशियारींच्या काळ्या टोपीच्या खालचा मेंदू सडका'; राष्ट्रवादीची जोरदार टीका

अॅड. जयेश गावंडे

Amot Mitkari News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, 'महाराष्ट्राचे वादग्रस्त आणि वाचाळवीर भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महापुरुषांबद्दल गरळ ओकलेली आहे. सातत्याने महापुरुषांचा एकेरी उल्लेख करणे, महाराष्ट्राचा अपमान करणे, महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे ही संघाची त्यांची विचारधारा पुन्हा एकदा प्रकट केलेली आहे'.

'भगत सिंह कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू आहे. हा पुन्हा महाराष्ट्राच्या निदर्शनास आला आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ होत होता. त्यावेळी हुरळून जाऊन पाठीवर कौतुकाची थाप दोन नेत्यांनी द्यावी. यामुळे भगत सिंह पुन्हा एकदा उभे राहिले'. असे मिटकरी म्हणाले.

'राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताना म्हटलं, 'शाळेत असताना शिक्षक विचारायचे की, तुमचा आवडता हिरो कोण ? तेव्हा काही सांगायचे की महात्मा गांधी, कोणी सुभाषचंद्र बोस, कोणी पंडित जवाहरलाल नेहरू, आम्हाला हा प्रश्न विचारण्याची गरज नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवाजी महारांजाचा एकेरी उल्लेख केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राज्यपालांनी पुन्हा एकदा महापुरूषाचा अपमान केला आहे', अशी टीका मिटकरी यांनी केली.

'राज्यपालांचं सदर वक्तव्य नितीन गडकरींना पटलेलं नसेलच. गडकरी हे वैचारिक प्रगल्भ आहेत, असे मानतो. त्या भाषणानंतर त्यांनी नक्कीच राज्यपालांना खडेबोल सुनावले असतील. गडकरींना विनंती आहे की, त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगून राज्यपालांची हकालपट्टी करावी. काल सावरकरांवरून ज्यांनी तोंडसुख घेतलं, त्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर तसाच बाणेदारपणा दाखवतील. त्यानंतर राज्यपालांचा काळे झेंडे दाखवून निषेध करतील, असेही मिटकरी म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?

'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT