Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: नागपूरमधील नुकसान टाळता आलं असतं; पूरस्थितीतून धडा घेत देवेंद्र फडणवीसांनी सुचवले 'हे' बदल

Maharashtra Political News: माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की," ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं तिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले.

Ruchika Jadhav

Nagpur Flood:

पूरसदृश्य परिस्थिची पाहाणी करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन पाहाणी केली. तसेच माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की," ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं तिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले. जेवढ्या प्रमाणात पाऊस झाला तेवढी कॅरिंग कॅपिसीटी नव्हती. नाल्यांमध्ये जे बांधकाम, भींती आहेत त्याचे काम केल्यास भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही. (Latest Marathi News)

अंबाझरीबाबत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, "अंबाझरीमधील जे ओव्हरफ्लो पॉइंट आहेत तिथलं इंफ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोच्या ठिकाणी जे बांधकाम झालं ते काढून नव्यावे बांधले जाईल. आतापर्यंत इतका पाऊस झाला नव्हता त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटले नव्हते. मात्र आता झालेल्या पावसानंतर योग्य त्या उपायोजना केल्या जातील, " असं फडणवीस म्हणाले.

ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना मदतीचे आश्वासन फडवीसांनी दिलेय. यावेळी ते म्हणाले की, "लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळे नागरिक अगदी रडकुंडीला आलेत. त्यामुळे सरकारमार्फत नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तित जास्त मदत केली जाणार आहे."

नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अंबाझरी परिसर पाण्याखाली गेला. आता पाऊल थांबल्यावर घरांमध्ये मोठ्याप्रमाणार चिखल साठला आहे. घरातील अन्न धान्यासह सर्व वस्तू खराब झाल्यात. फडवीस येथे पाहाणी करत असताना काही नागरिक संतप्त झाले होते. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना घेराव ही घातला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smita Gondkar: अभिनेत्री स्मिता गोंदकरचा पारंपारिक अंदाज, ओणम् सणानिमित्त खास फोटोशूट

Maharashtra Live News Update : गोरेगावात मॅक्डोनाल्ड्स इमारतीत भीषण आग

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

SCROLL FOR NEXT