Shivsena Shinde Group Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोण रुसलं- कोण रागावलं...; शिंदेंच्या नाराज आमदारांवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा खोचक टोला

Bhaskar Jadhav On Shivsena Shinde Group MLA's: मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज झाले आहेत.

Priya More

महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळामध्ये महायुतीमधील अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे सध्या महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. या आमदारांनी हिवाळी अधिवेशनाला न थांबता थेट आपला मतदारसंघ गाठला आहे. या नाराज नेत्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीच्या नाराज नेत्यांबद्दल बोलताना भास्कर जाधव यांनी सांगितले की, 'भुजबळ मुनगंटीवारसारखे नेते नाराज आहेत. मला माहिती नाही की या वयामध्ये त्यांना कुठे चैन पडेल. जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही. भुजबळसाहेबांनी नाराजीपेक्षा काही तरी पदरारत पाडून घ्यावं. कोण रुसलं कोण रागावलं याला फार महत्व महायुतीमध्ये आजच्या घडीला नाही. शिंदेंकडून ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही ते गाशा गुंडाळून गेले. कोणाला स्थान मिळाल्यावर कोण मंत्री झालं, कोण झालं नाही याबद्दल मला काही सुखदुःख नाही. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाही मिळालं त्यांनाही शुभेच्छा.'

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना भास्कर जाधव यांनी महायुतीवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'हे सगळं बोलावं लागतं हे सगळं करावं लागतं पुढे काय होईल त्यापेक्षा महाराष्ट्राच्या पदरात काय पडेल हे बघणं गरजेचं आहे. शपथ घेतली म्हणून मंत्रिमंडळ स्थापन झालं असं म्हणता येत नाही. सुरुवातीला 3 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि आमचे मंत्रिमंडळ स्थापन झालं असं सांगितलं गेलं. घटनात्मक तरतूद काय आहे की खरं मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे की नाही हे मी सभागृहात असतो तर दाखवून दिलं असतं. कारण कायदे धाब्यावर बसवले जात आहेत.'

अजित पवारांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, 'माझ्या माहितीनुसार काल दादा हे त्यांच्या बंगल्यावर उपस्थित होते तरीही बाहेर बोर्ड लावलेला होता की उपलब्ध नाहीत. भुजबळसाहेबांच्या रागाला सामोरे न जाण्यासाठी नोटा केबलचा निर्णय अजित दादांनी घेतला असावा. आज उद्धव ठाकरे आमच्या नेत्यांना परत आले आहेत शिवसेनेच्या वतीने कोणाला विरोधी पक्ष नेता करावा याचे पत्र देतील. मला संधी द्यायची की नाही हे उद्धवसाहेबांच्या हाती आहे पण माझा आग्रह आहे की शिवसेनेने ही संधी सोडू नये.'

तसंच, 'सरकारकडे पाशवी बहुमत असल्याने ते लोकशाहीचा सन्मान करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद देतील. आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की विरोधी पक्षनेते नेमण्यात आम्ही गांभीर्याने विचार करू. आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे मागणी ठेवल्यावर ते काय निर्णय घेतात त्यावर भाष्य करू.', असे देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT