Sanjay Raut  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात काय? वाचून धक्का बसेल

संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम जाणून घ्या

सुरज सावंत

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. त्यामुळे अटकेपूर्वी दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम आता समोर आला आहे.

संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 आहे. संजय राऊत यांना सुरक्षितेच्या कारणास्तव इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचतात. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ तेटीव्हीवरील बातम्या पाहून ते घडामोडींवर लक्ष ठेवतात.

राऊत यांनी जेल मधील स्टोर मधून एक वही व पेन घेतला आहे. वर्तमान पत्रात छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे राऊत वहीत आपले विचार लिहित असतात. लिखाणात खंड पडू नये हे त्या मागचे कारण असावे. मात्र ते लिखाण त्यांच्यापर्यंत मर्यादित राहिल, ते बाहेर छापण्यासाठी दिले जाणार नाही आहे. संजय राऊत हे दिवसभरातील बराच वेळ लिखाणात व्यस्त असतात. कोर्टाच्या आदेशानुसार संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT