Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis PM Narendra MOdi Move Delhi Politics AI Images
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य; राजकारणात खळबळ

Sanjay Raut On Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्राच्या राजकारणात प्रवेश करतील आणि दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Alisha Khedekar

  • देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्राच्या राजकारणात प्रवेश करणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना सक्षम मंत्रिमंडळासाठी फडणवीसांची गरज

  • संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

राज्यात गेले अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या विषयावर काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल होत. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्राच्या राजकारणात प्रवेश करतील, असा दावा उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात अधिक सक्षम मंत्रिमंडळ उभे करायचे असून त्यासाठी फडणवीस यांची दिल्लीत गरज असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी म्हटले की, पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांशी फडणवीसांना केंद्रात घेण्याबाबत चर्चा करत आहेत. कालही त्यांना याबाबत सांगण्यात आले असावे. फडणवीस सध्या महाराष्ट्रातील कामकाज हळूहळू आवरून दिल्लीकडे रवाना होतील, असा दावा त्यांनी केला. तसेच फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याची शक्यता नाकारल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातून यापूर्वीही अनेक नेते दिल्लीला गेले आहेत. त्यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे आणि जबाबदाऱ्या व्यवस्थित लावून घ्याव्या लागतात. “फडणवीसांना दिल्लीची गरज नाही, मात्र दिल्लीला त्यांची गरज आहे,” असे राऊत यांनी नमूद केले.

केंद्रातील मंत्रिमंडळाच्या कामकाजावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधानांना अधिक चांगले आणि सक्षम मंत्रिमंडळ तयार करायचे असल्याने फडणवीस यांच्यासारख्या नेत्याची केंद्रात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र ते दिल्लीला जाण्याची प्रतीक्षा करणारे अनेक जण आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

यावेळी राऊत यांनी फडणवीसांच्या “मी पुन्हा येईन” या जुन्या विधानाचाही संदर्भ घेतला. सत्ता परिवर्तनासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असा आरोप त्यांनी केला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी फार वेळ लागत नाही, असा दावा त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात खड्ड्यावरून शिवसेना आक्रमक, शिंदे गट करणार खड्ड्यांचा पंचनामा

कमी झोप, जास्त साखर खाणे आणि सतत मोबाईल पाहणे; रोजच्या 'या' 10 सवयी मेंदू अन् स्मरणशक्तीसाठी ठरतात घातक

ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! KCC मधून मिळणार तब्बल ₹5 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CM फडणवीस आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलणार; थेट GR चा काढला

SCROLL FOR NEXT