विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक उतरलाय. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आतापासून मतदारसंघातील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणारे मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. अशातच मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपलाच मोठा धक्का दिलाय.
मराठवाड्यातील (Marathwada News) भाजपचे विश्वासू नेते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय.
सुधीर पाटील यांचा धाराशिवमध्ये तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी शिवसेनेत (Shivsena News) प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधीर पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधीर पाटील हे आधी शिवसेनेतच होते.
त्यांनी धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.इतकंच नाही तर, 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली होती. मात्र, त्यानंतर 2017 मध्ये सुधीर पाटील यांनी धनुष्यबाण सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं.
आता सुधीर पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी भाजपकडे विधानसभेची मागणी देखील केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रतिसाद दिल्याने सुधीर पाटील नाराज झाले होते. याच नाराजीतून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे सुधीर पाटील यांना कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.