rohit pawar  saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: जे राष्ट्रवादीसोबत झालं ते उद्या काँग्रेससोबतही... ; रोहित पवारांचं सूचक विधान

कालची घटना झाल्यानंतर आता काहीही होऊ शकत कधी होऊ शकत, असंही रोहित पवार म्हणाले.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: अजित पवार आपल्या ९ नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय. अशीच स्थिती एक वर्ष आधी शिवसेनीची झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आता अशीच परिस्थिती राष्ट्रवादीची आहे आणि उद्या काँग्रेसची असेल असं सूचक विधान आमदार रोहित पवारांनी केलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले रोहित पवार?

आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालं ते उद्या काँग्रेसबाबत सुद्धा होऊ शकतं. जे खोके खोके बोलायचे तेच आता सत्तेत गेलेत. आम्ही शरद पवारांसोबतच लढणार आहोत, असं आमदार रोहित पवार म्हणालेत. त्यांच्या या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचेही दोन गट होणार का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

५ जुलै रोजी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक शरद पवारांनी बोलावली आहे. त्यावेळेस अनेक निर्णय होतील. आमच्यासाठी लोकांत जाणे, मार्गदर्शन करणे आणि भेट घेणे हे महत्वाचे आहे. विषय विचारांचा आहे कदाचित उद्या काँग्रेसवर पण हा प्रयत्न होऊ शकतो. कर्नाटक सारखं इतर राज्यात झालं तर भाजप खासदार घटू शकतात. कालची घटना झाल्यानंतर आता काहीही होऊ शकत कधी होऊ शकत, असंही रोहित पवार म्हणाले.

मतदान कार्ड विकाव का?

आपलं मतदान कार्ड विकाव का? असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण होत आहे. आमच्या मनात आता असा प्रश्न निर्माण झालात की आपण राजकारणात ज्यासाठी आलोय तसे होत नाही मग आपण चुकलो का? अनेक आमदारांना बैठक कशाची होती हेच माहीती नव्हतं, असा खुलासा यावेळी रोहित पवारांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT