Shiv Sena Shinde group  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिवसेनेचा कोट्यवधी रूपयांचा पक्षनिधी वळवला, ठाकरे गटाने खेळली मोठी चाल

निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात जाण्याची कुणकुण ठाकरे गटाला आधीच लागली होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून ही काळजी घेण्यात आली आहे.

Shivaji Kale

Maharashtra Political Crisis : निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतल्यानंतर आता सेना भवन आणि शिवसेना पक्षाची राज्यभरात असेलेली कार्यालय शिंदे गट थोड्याच दिवसात ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याआधी शिवसेनेचा कोट्यवधी रूपयांचा पक्षनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, काल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय जाहीर केला. मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात जाण्याची कुणकुण ठाकरे गटाला आधीच लागली होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून ही काळजी घेण्यात आली आहे.

बँकेत नविन खाते उघडून या खात्यावर पक्षनिधी ट्रान्सफर केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यास पक्षनिधीवर ते दावा करण्याची शक्यता असल्याने अगोदरच हा पक्षनिधी वळवल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षाच्या नावावर जे काही आहे त्याच्यावर शिंदे गट दावा सांगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये शिवसेना पक्षाची राज्यभरात असेलेली कार्यालय शिंदे गट थोड्याच दिवसात ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत आंदोलन झालं त्यासाठी मनोज जरांगेना जागा मी देण्यास मदत केली - धंनजय मुंडे

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT