Maharashtra Cabinet Expansion News Today: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)
तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) इच्छुक आमदारांनी दिल्ली दरबारी दाद मागितल्याने मंत्रीमंडळ विस्तार आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. केंद्रातून हिरवा कंदील दाखवल्यानंतरच राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांना आणखीन काही दिवस वाट बघावी लागणार, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. (Political News)
भाजप आमदारांमुळे उशीर?
मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक आमदारांनी दिल्ली (Delhi) रबारी दाद मागितल्याने मंत्रीमंडळ विस्तार आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे. मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी सध्या बरेच आमदार फिल्डिंग लावून आहेत. शिवसेनेतील मंत्रीपदाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र भाजपमध्ये बहुतांश निर्णय हे दिल्लीतून आदेश आल्यानंतर होतात. त्यामुळे भाजपची यादी अद्याप फायनल न झाल्यामुळे मंत्रीमंडळचा विस्तार काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.