deepak kesarkar, eknath shinde, maharashtra, shirdi saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...तर शिंदे शहीदच झाले असते; दीपक केसरकर काय म्हणाले? वाचा...

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

संभाजी थोरात

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते, तेव्हा त्यांना अनेक धमक्या आल्या. त्यावेळी जर कुठं दगाफटका झाला असता, तर ते शहीदच झाले असते. असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एकनाथ शिंदेनी उच्चारलेल्या शहीद शब्दावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी शहीद या शब्दाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (Eknath Shinde Latest News)

काय म्हणाले दीपक केसरकर?

'रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारा व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे', असं केसरकर यांनी म्हटलं आहे. 'एकनाथ शिंदे हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते, तेव्हा त्यांना अनेक धमक्या आल्या. त्यावेळी जर कुठं दगाफटका झाला असता, तर ते शहीदच झाले असते'. असं धक्कादायक विधानही केसरकर यांनी केलं.

'शिंदे सरकार अतिशय स्थिर'

दरम्यान, शिंदे सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार अतिशय स्थिर आहे असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. संजय शिरसाट यांच्या ट्वीटबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळणार आहे. भरत गोगावले, बच्चू कडू यांना देखील संधी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असंही ते म्हणाले. (Eknath Shinde Todays News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहीद या शब्दावर बोलताना केसरकर म्हणाले. अगदी छोट्या-छोट्या शब्दामधून चुकीचा अर्थ काढणं योग्य नाही. शिंदे हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते, अनेक धमक्या त्यांना आल्या त्यावेळी जर कुठं दगाफटका झाला असता तर ते शहीदच झाले असते, असं केसरकर म्हणाले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. दोन्ही काँग्रेस बरोबर जाणे हा त्यांचा विचार होता. आपल्या मूळ पक्षासाठी केलेला हा उठाव आहे. आम्ही कोणतीही वास्तू बळकवण्याचा प्रयत्न करत नाही, दोन्ही काँग्रेस सोबत जाणारे दररोज काहीही बोलतील त्यांना उत्तर देत आम्ही बसू का? असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT