Jitendra Awhad News Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: अजितदादांनी परत यावं, मी राजकारण सोडतो; जितेंद्र आव्हाडांची भावनिक साद

Jitendra Awhad: अजितदादांनी परत यावं मी राजकारण सोडेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक साद घातली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या अशा वागण्याने राष्ट्रावादी शरद पवार गटामधील अनेक पदाधिकारी त्यांना परत येण्यासाठी भावनिक साद घालत आहेत. अशात आता जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना परत बोलवत मोठं विधान केलं आहे. अजितदादांनी परत यावं मी राजकारण सोडेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक साद घातली आहे. (Latest Marathi News)

मी येवल्यात जाऊन शपथ घेईल. तुम्ही परत आल्यावर आयुष्यात कधीही राजकारणात येणार नाही. तुम्ही म्हणताय या बडव्यांनी साहेबांना घेरलंय, त्यांच्यामुळे सगळं झालंय. तर ठिक आहे मी पवार साहेबांच्या जबळपास दिसणार नाही. तेथे फिरकणारही नाही. मात्र तुम्ही परत या. शरद पवारांना या वयात त्रास देऊ नका, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटल्याने राजकीय वतृळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना गेलेले ४० आमदार परत येणार असतील तर मी राजकारण सोडतो, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

मी राजकारण सोडतो, परत येताय का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदे दिली मात्र त्यांनी गद्दारी केली. बरं मी जातोय बाजूला येताय का ४०, असा थेट सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ४० आमदारांना विचारला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील अजित पवारांना परत येण्यासाठी भावनिक साद घातली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार खरोखर परत येणार का? ते परतल्यास जितेंद्र आव्हाड राजकारणाला कायमचा रामराम ठोकणार का? आणि हेच चित्र शिवसेनेतही पहायला मिळणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT