Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाची पुढची रणनिती ठरली! प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार; लोकांच्या भावना...

आज झालेल्या मातोश्रीवर बैठकीत झाली ज्यामध्ये ठाकरे गटाने पुढील रणनिती ठरवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political Crises: शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाणाच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर ठाकरे गटाची पुढची रणनिती काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच ठाकरे गटाने पुढील रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून चिन्ह आणि नाव गेल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून चिन्ह आणि नाव गेल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार आहेत. आज झालेल्या मातोश्रीवर बैठकीत झाली ज्यामध्ये ही रणनिती आखली आहे. ज्यामध्ये ठाकरे गटातील नेते राज्यातील विविध भागात लवकरच दौरा करणार आहेत.

ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देऊन लोकांमध्ये जनजागृती नेत्यांकडून करण्यात येणार आहे. लोकांच्या भावना आणि ठाकरे गटाची (Udhav Thackeray) भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावी असा या दौऱ्यांचा उद्देश असणार आहे.

दरम्यान, शिवसना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवल्यानंतर शिंदे गट आता आणखी आक्रमक होणार आहे. शिवसेना पक्षाची राज्यभरात असलेल्या कार्यालयांवर शिंदे गट दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एवढंच नाही तर शिवसेनेचं गाणं आणि ट्विटर, फेसबूकसह सर्व डिजिटल अकांउंटवर देखील शिंदे गट दावा करणार आहे. शिवसेना पक्षाच्या नावावर राज्यभरात जे काही आहे त्याच्यावर शिंदे गट टप्प्या टप्प्याने दावा सांगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गंगापूर धरणातून सध्या 6336 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू

Satara News : प्रेम प्रकरणातून साताऱ्यात कांड, विवाहितेची राहत्या घरी निघृण हत्या, १२ तासात आरोपीला पुण्यात बेड्या

Ramayana : 'रामायण'मध्ये तगडी स्टार कास्ट; रणबीर, साई पल्लवी ते यश, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Crime: मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

Interesting Fact: ऐकूनही विश्वास बसणार नाही! असा साप जो स्वतःवरच करतो हल्ला

SCROLL FOR NEXT