महाराष्ट्र

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मास्टर प्लान; एक-दोन महिन्यांत मोठी घडामोड

Mahavikas Aghadhi seat sharing : ९ जणांचा समितीत समावेश, वरिष्ठ नेत्यांना अहवाल सादर केल्यानंतर अंतिम निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics :

आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपासाठी महाविकास आघाडीने ९ जणांची समिती नेमली आहे. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या तिन्ही पक्षांचे सदस्य असणार आहेत. प्रत्येक पक्षाचे ३ सदस्य या समितीत असतील आणि ही समिती जागा वाटपाचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करणार आहे. त्यांनतर वरिष्ठांकडून एक दोन महिन्यात अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

महाविकास आघाडीच्या या समितीत काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील , नसीम खान, शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी राज्यनिहाय जागावाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. आघाडीतील पक्षांसोबत रामन्वय राखण्यासाठी आणि प्रचारासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जागावाटपाचा निर्णय त्या त्या राज्यातील आघाडीतील पक्ष घेतील, असे ठरले होते.

सध्याच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे किंवा कोणत्या पक्षाला सदर मतदारसंघ जिंकता येण्याची अधिक शक्यता आहे, याचा विचार करूनच नियुक्त केलेली समिती जागा वाटपाचा निर्णय घेईल. जागा वाटप शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल, असे महाविकास आघाडीच्या एका नेत्याने सांगितले.

राजकीय निरीक्षकांच्या मते, काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी ) यांच्यात 2019 मध्ये युती झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायमच शिवसेनेचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडवताना तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये सेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या ४८ जागा

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती केली होती आणि युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 25 पैकी 22 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली आणि 18 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT