police  saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; गृह विभागाकडून १०९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्याच्या गृह विभागाने एकूण १०९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Police officers transfers : राज्याच्या गृह विभागाने एकूण १०९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांची ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर बापू बागंर यांची साताऱ्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार राज्यातील पोलीस (Police) सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रतीक्षेतील अशा एकूण १०९ अधिकाऱ्यांना आज गृह विभागाने पदस्थापना दिली. सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक मुंबई शहर उपायुक्तपदी झाली आहे. मनोज पाटील यांनाही मुंबई (Mumbai) शहरातच पदस्थापना दिली आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्वप्ना गोरे यांची बदली पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड आमि नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांची सोलापूर शहर पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांना पदस्थापना मिळालेली नव्हती. अखेर गृह विभागाने त्या पोलीस अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT