Maharashtra Police Gets 12 New IPS Officers; Postings Announced (saam tv AI)
महाराष्ट्र

Maharashtra IPS Officers: महाराष्ट्राला मिळाले १२ नवे IPS अधिकारी; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

New 12 IPS Officers Join Maharashtra : हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केलेले १२ परिविक्षाधीन IPS अधिकारी ३१ ऑगस्टपासून महाराष्ट्र संवर्गात रुजू होणार आहेत. गृह विभागाने त्यांची पदस्थापना जाहीर केली आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र संवर्गात १२ नवीन परिविक्षाधीन IPS अधिकारी रुजू होणार आहेत.

  • हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण

  • गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदस्थापना केली

हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रात नवे १२ आयपीएस अधिकारी रूजू होणार आहेत. गृह विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. ैदराबाद येथील सरकार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र संवर्गात ३१ ऑगस्टपासून रुजू होणार आहेत.

राज्याच्या गृह विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. हे अधिकारी उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या १२ अधिकाऱ्यांमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समोवश आहे. त्यांची रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, लातूर, परभणी, वर्धा, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आलीय. याबाबतचे वृत्त सरकारनामा या वृत्तसंस्थेनं दिलंय.

पदस्थापना मिळालेल्या १२ अधिकाऱ्यांपैकी ६ अधिकारी २०२३ च्या तुकडीचे आणि ६ आयपीएस अधिकारी २०२४ च्या तुकडीचे आहेत.

वाचा यादी

परिविक्षाधीन अधिकारी व त्यांची पदस्थापना -

अरांक्षा यादव - रत्नागिरी

गुरव गंगाधर कायांदे पाटील - उमरखेड (यवतमाळ)

कुमार सुशांत - राजूरा (चंद्रपूर)

मेघना आय. एन. - लातूर (ग्रामीण)

राहुल कुमार - परभणी शहर

राहुल रमेश आत्राम - आर्वी (वर्धा)

सागर संजय भामरे - भामरागड (गडचिरोली)

ईशानी आनंद - अचलपूर (अमरावती)

जान्हवी बाळासाहेब शेखर - गंगापूर (छत्रपती संभाजीनगर)

सारदा तेजस सुदिप - भंडारा

शशांत एन. एम. - कामठी (नागपूर ग्रामीण)

सुयश कुमार सिंग - धानोरा (गडचिरोली)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्हाधिकारी मीना यांनी लिपिकला केले निलंबित

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT