Washim Police Bharti Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Police Bharti: पोलीस भरतीत अनियमितता उमेदवारांचा आरोप; खासदार अरविंद सावंतांसमोर मांडली व्यथा

Washim Police Bharti: वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यासाठी आलेले खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर उमेदवारांनी आपली व्यथा मांडली. भरती प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय.

Bharat Jadhav

मनोज जयस्वाल, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती सुरू आहे. पोलीस दलातील विविध पदांवर १७४७१ जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातही पोलीस भरती घेतली जात असून त्यासाठी मैदानी चाचणी घेतल्या जात आहेत. वाशिम जिल्ह्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत अनियमितता होत असल्याचा आरोप काही उमेदवारांनी केलाय.

यासंदर्भात या उमेदवारांनी खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन ही भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केलीय. यानंतर अरविंद सावंतांनी गृहखात्यावर टीका केली असून बेरोजगार युवकांच्या आयुष्याशी हे सरकार खेळ खेळत असून यासंदर्भातील मुद्दा आम्ही येणाऱ्या अधिवेशनात मांडू, असे आश्वासन खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी उमेदवारांना दिलेत.

खासदार अरविंद सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांना भेटून आपली आपबीती सांगितली. बुधवार १९ जूनपासून वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर ६८ जागांसाठी पोलीस भरतीची मैदानी चाचणी राबवली जात आहे.

त्यातील १०० मीटर आणि १६०० मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये वेळ नोंदवण्यासाठी लावण्यात आलेल्या चीपमुळे उमेदवारांच्या गुणात तफावत असल्याचा आरोप या उमेदवारांकडून करण्यात आला. तसेच इतर जिल्ह्यात होत असलेल्या भरतीची गुणांची माहिती ऑनलाईन तात्काळ दिसत आहे. मात्र वाशिममध्ये होत असलेल्या भरतीची माहिती ऑनलाइन मिळत नसल्याचेही या तक्रारकर्त्या उमेदवारांनी सांगितले आहे.

दरम्यान राज्यातील पोलीस दलातील विविध पदांवर १७४७१ जागांवर भरती होत आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड, मिरा-भाईंदर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग-मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग-पुणे, लोहमार्ग औरंगाबाद. या जिल्ह्यात भरती प्रक्रिया पार पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT