ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येक गोष्टी घरबसल्या विकत घेणे किंवा विकणे अगदी सोपे झाले आहे.
अनेक मोठे महत्त्वाचे व्यवहार घरबसल्या अगदी सहज करता येतात.
त्यात अनेकजण घरबसल्यान ऑनलाईन विज बिलही भरतात.
मात्र ऑनलाईन विज विज भरताना या खाली दिलेल्या गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते.
ऑनलाईन विज बिल भरताना ते बिल कोणत्या महिन्याचे आहे हे दोनदा तरी तपासावे, अन्यथा तुम्हाला पुन्हा विज बिल भरावे लागेल.
अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना काही ऑफर असतात,ज्यांच्या मदतीने तुम्हाला काही रक्कमच भरावी लागेल.
ऑनलाईन विज बिल भरताना माहिती नसलेल्या लिंकवर जाणे टाळावे,अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते.
ऑनलाईन विज बिल भरताना तुमच्या बँके संबंधित माहिती भरावी लागते,तेव्हा कोणालाही बँके संबंधित व्ययक्तिक माहिती देऊ नये.