Washim News: 'गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भामट्यांना धडा शिकवा...' खासदार अरविंद सावंत यांचे भाजपवर टीकास्त्र

Maharashtra Political News: गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व भामटे भरले आहेत. या भामट्यांना २०२४ ला धडा शिकवा.. असे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.
Maharashtra Political News:
Maharashtra Political News:Saamtv
Published On

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी

Washim News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराव महाराज यांना शब्द दिला होता, सत्तेत येताच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ मात्र 9 वर्ष झाली त्यांनी शब्द पाळला नाही.. त्यामुळे खरे भामटे कोण आहेत? शब्द पाळणारे की शब्द फिरवणारे असा टोला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बंजारा समाजातील चार तरुण भटक्या विमुक्त प्रवर्गात भामटा राजपूत जातीचे बोगस प्रमाणपत्र घेऊन झालेली घुसखोरी रोखण्यासाठी SIT समिती नेमावी या मागणीसाठी चार दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत.

वाशीमच्या (Washim) पोहरादेवी इथे हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भेट दिली. यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political News:
Wardha News: काय सांगता! आख्ख्या शाळेत एक शिक्षक अन् एकच विद्यार्थी; गुरू- शिष्याच्या जोडीची जिल्ह्यात चर्चा

काय म्हणाले अरविंद सावंत?

"सत्तेत येताच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ असा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रामराव महाराज यांना शब्द दिला होता. मात्र 9 वर्ष झाली तरी त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे खरे भामटे कोण आहेत. शब्द पाळणारे की शब्द फिरवणारे? असा टोला सावंत यांनी लगावला.

तसेच यावेळी पुढे बोलताना "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व भामटे भरले आहेत. या भामट्यांना २०२४ ला धडा शिकवा.." असे आवाहनही अरविंद सावंत यांनी केले. दरम्यान, अरविंद सावंत आणि सुषमा अंधारे यांच्या मध्यस्थीनंतर चार दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. (Latest Marathi News)

Maharashtra Political News:
Shinde Group MP Resign : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा, पत्र व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com