Vijay Wadettiwar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashra Politics: मंत्रिमंडळ निर्णयाचा फेरविचार करा; राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

Maharashra Politics: कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आ

साम टिव्ही ब्युरो

Vijay Wadettiwar News:

'सरकारने फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे की, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी? असा सवाल करत मंत्रिमंडळ निर्णयाचा फेरविचार करावा आणि कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकराने सरकारने फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी पिके नष्ट झाली आहेत. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना गत वर्षीचे देय अनुदान सरकारने अद्याप दिले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'खरिप हंगाम हा अत्यंत वाईट गेला आहे. त्यात अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाची शाश्वती नाही. चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीत मदत करण्यासाठी सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. यामुळे सर्वांना दुष्काळाचे लाभ मिळतील. याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.

'केवळ पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का? असं काही असल्यास हा निर्णय मागे घ्यावा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

'राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून चुकीची आकडेवारी दाखवत सरकारने या 40 तालुक्यांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला शेतकरी कदापी माफ करणार नाही, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT