NITIN TIWARI JOINS SHIV SENA WITH SUPPORTERS IN PRESENCE OF EKNATH SHINDE, BIG POLITICAL DEVELOPMENT IN NAGPUR Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर जोरात! बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ; शिंदेसेनेत केला प्रवेश

Maharashtra Operation Tiger Update : नागपूरचे ठाकरेसेनेचे नेते नितीन तिवारी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Alisha Khedekar

  • नितीन तिवारी यांनी समर्थकांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला

  • मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडला

  • एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला

  • ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला

Maharashtra Shivsena Operation Tiger News नागपूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात ऑपरेशन टायगर जोरात सुरु असताना दुसरीकडे नागपूरमध्ये युवा सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते नितीन तिवारी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

गेल्या दीड दशकापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नितीन तिवारी यांनी युवकांच्या प्रश्नांपासून ते सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी युवा सेनेत उपजिल्हाप्रमुख, शिवसेना शहर समन्वयक आणि शहरप्रमुख यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम आणि जनआंदोलने राबवण्यात आली होती. विशेषतः कचरा व्यवस्थापनातील समस्या, लर्निंग लायसन्स घोटाळ्याविरोधातील आंदोलन, कामगारांचे प्रश्न, बेरोजगार युवकांच्या समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यामुळे नागपूरमधील युवकांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना नितीन तिवारी यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या जनसेवाभावी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना हे योग्य व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

"राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गरज पडल्यास जनहितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये आशिष हाडगे, भूपेंद्र कठाणे, अब्बास अली, कार्तिक करोसिया, ललित बावनकर, कमलेश त्रिपाठी, आकाश शिर्के, मुन्ना तिवारी, तोरेन हिरौंदे आणि शोहेब कुरेशी यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयाला लागली आग

Menstrual Hygiene: सॅनिटरी पॅड्समध्ये केमिकल्स आरोग्यासाठी किती धोकादायक? डॉक्टरांनी सांगितला शरीरावर होणारा परिणाम

मोठी बातमी: ओमराजे निंबाळकर रात्रीच दिल्लीला रवाना; शिंदे गटात प्रवेश करणार? सस्पेन्स कायम, दिल्लीत हालचालींना वेग

नो मेकअप, नो फेशिअल! सकाळी उठून फक्त ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम; चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

SCROLL FOR NEXT