हा आक्रोश आहे...कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा....कांद्य़ाचे दर घसरल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं...कारण गेल्या वर्षभरात कांदा उत्पादक शेतकऱ्याचं तब्बल 4 हजार कोटींच आर्थिक नुकसान झालयं... त्य़ामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुरती वाताहत झालीय. घसरलेल्या दरामुळे संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी बाजार समितीत व्यापाऱी आणि सरकारविरोधात घोषणा बाजी केली...तर नाशिकच्या सटाणा बाजार समितीत तर शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. कांद्याला 50 रुपये क्विवटलचा दर पुकारताच शेतकऱ्यानं थेट गळ्यावला फास लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला...
तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये अत्यल्प दरामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा कुठे किती दरात विकत घेतला जातोय...
कांद्याचे दर मातीमोल
सटाणा - 50 पैसे किलो
संगमनेर - 1 रुपये किलो
लासूर - 1 रुपये किलो
लासलगाव - 5 रुपये किलो
दुसरीकडे या सगळ्याचा कळस म्हणजे पैठणच्या एका शेतकऱ्यानं 12 क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्यालाच व्यापाराला 1 रुपया अधिकचा द्यावा लागलाय... पैठणच्या प्रकाश गलधर या शेतकऱ्यानं 12 क्विटंल 62 किलो कांदा 100 रुपये क्विंटल प्रमाणे विकला... ज्याचे त्यांना 1262 रुपये मिळाले... मात्र हमालाचे 125 रुपये, तोलाईचे 38 रुपये, वाराईचे 25, भराईचे 25, गाडी भाड्याचते 500 आणि गोणी खर्चाचे 550 रुपये मिळून 1263 रुपये झाले..
मात्र राज्यात कांद्याचे दर नेमके का घसरले? यामागे नेमकी कोणती कारणं आहेत... पाहूयात...
कांद्याचे दर घसरण्याची कारणं
- बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली
- युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये कांद्याच्या मागणीत घट
- निर्यात कमी झाल्यानं देशांतर्गत बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध
- गारपिटीच्या धास्तीनं साठवलेला कांदाही बाजारात विक्रीसाठी
किमान उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्तेक वर्षांची मागणी आहे. मात्र सरकारच्या धरसोड धोरणामुंळे कांदा उत्पदक शेतकऱ्याला त्याचा फटका बसतो. त्यामुळे दर वर्षा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. मात्र यंदा कांद्याच्या दरानं केवळ निचांक गाठला नाही तर कांदा पार मातीमोल झालाय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्याचा आक्रोश थांबवण्यासाठी त्याला धीर देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.