SSC-HSC Result 2023
SSC-HSC Result 2023  Saam TV
महाराष्ट्र

SSC-HSC Result 2023: विद्यार्थ्यांनो तयार राहा! दहावी-बारावीचा निकाल लवकरच, बोर्डाने दिली महत्वाची माहिती...

Priya More

Pune News: सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दहावी (10th Result) आणि बारावीचा निकाल (12th Result) लवकरच जाहीर होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्यामुळे एकीकडे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता तर आहे पण किती टक्के गुण मिळणार याची धाकधुक देखील त्यांच्या मनात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी सध्या सुरू आहे. या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याबाबची विचारणा राज्य मंडळ विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे.

याच दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसंच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी बसले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : रोकड घेऊन जाणारी कॅश व्हॅन नाक्यावर थांबवली अन् सापडलं घबाड; निवडणुकीआधी पवई पोलिसांची मोठी कारवाई

Leopard Attack : घराबाहेर उभ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; आईच्या डोळ्यादेखत बालिकेचा मृत्यू

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?

Japan vs Mongolia: विश्वासच बसेना! ६ फलंदाज शून्यावर बाद ; स्कोअरबोर्ड पाहून डोकं चक्रावून जाईल

"आमच्या फुलाचं सौंदर्य खुललंय..."; 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने Met Gala 2024 सोहळा गाजवला

SCROLL FOR NEXT