Chhatrapati Sambhajinagar News: 'संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबादच करा' मुंबई हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Aurangabad Rename: हायकोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत संभाजीनगर असा उल्लेख न करत औरंगाबादच करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mumbai High Court
Mumbai High Court saam tv

Aurangabad News: संभाजीनगरच्या नामांतरावर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असाच करावा असे निर्देश हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्र सरकारकडून औरंगाबादच्या नामांतराला मंजूरी मिळाली. मात्र काही जणांचा या नामंतराला विरोध होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं. त्यानंतर आता हायकोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत संभाजीनगर असा उल्लेख न करत औरंगाबादच करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mumbai High Court
Mumbai News : धोकादायक इमारतींचा विजपुरवठा खंडीत करा, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या सूचना

महाविकासआघाडी सरकारच्या काळात शेवटच्या टप्प्यात औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नमांतर धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंत्रीमडळाने मंजरू केला होता. मात्र त्यानंतर काही दिवसातच ते सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारकडूनही या नामांतराला मंजूरी मिळाली होती.

Mumbai High Court
Gautami Patil Program: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण; धक्कादायक VIDEO

परंतु काही नागरिकांचा या नामांतराला विरोध आहे. आम्ही लहानपणापासून या शहराला औरंगाबाद म्हणत आलो आहोत असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराला विरोध केला होता. यानंतर त्यांनी या नामांतराविरोधात आंदोलन देखील केले होते. (Latest Political News)

त्यानंतर त्यांनी ते आंदोलन स्थगित करून कोर्टात लढाई लढण्याचा निर्णय घेतला होता. या नामांतराच्या विरोधात काही जणांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबादच करावा असे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com