Saamana Editorial on BJP: हिंसाचार पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या...; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

Saamana editorial on BJP: ठाकरे गटाच्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV

Mumbai News: राज्यातील अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील हिंसाचाराच्या या घटनांमुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाने राज्यातील वाढत्या हिंसाचारावरून भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. 'हिंसाचार पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे. निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते', असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिपदाचे आमिष दाखवून ६ आमदारांना कोट्यवधींचा गंडा; राजकीय वर्तुळात खळबळ

'राज्यात सध्या भडकविल्या जात असलेले हिंसाचार राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फोल ठरत आहे, अशी टीका ठाकरे गटाने फडणवीसांवर केली.

'बिहारातही हिंसाचार भडकविल्या गेले, पण फायदा झाला नाही. मणिपुरात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. तेथे अख्खे राज्य हिंसाचारात होरपळले व त्या धुराचे लोट दिल्लीपर्यंत पोहोचले. तो वणवादेखील मोदी-शहांना अद्याप विझविता आलेला नाही, अशी टीका देखील ठाकरे गटाने केली.

Uddhav Thackeray
Chhatrapati Sambhajinagar News: 'संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबादच करा' मुंबई हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

'काही विषय सामंजस्याने, सलोख्याने सोडवले जाऊ शकतात; पण शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत. राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावे, असेही टीका ठाकरे गटाने केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com