Maharashtra Municipal Elections May Face Further Delay Due to Winter Session and Exam Schedule Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

Maharashtra Municipal Elections: राज्यातील महापालिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झालीय... त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन चुकवून निवडणुक आयोग महापालिका निवडणुका कधी जाहीर करणार? पालिका निवडणुकांचं गणित नेमकं का बिघडलं?

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय... त्यामुळे महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलयं...एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने पालिका निवडणुकीसाठी 31 जानेवारीची डेडलाईन दिलेली असताना महापालिका निवडणुका उशीरा होणाऱ असल्याची चिन्हं आहेत...महापालिका निवडणुका पुढे ढकल्यामागे नेमकी काय कारणे आहेत?

हिवाळी अधिवेशन

नागपूरात 8 ते 19 डिसेंबर हिवाळी अधिवेशन होणार

अधिवेशन काळात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणार नाही

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जाणार आणि जानेवारीत निकाल

कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण

एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणांवर अतिरिक्त ताण

दहावी- बारावीच्या परिक्षांमुळे महापालिका निवडणुका पुढे ढकल्याची शक्यता

नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.. त्यानंतर जिल्हा परिषद-पंचायत समित्या आणि शेवटी महापालिका असा निवडणुकांचा क्रम अपेक्षित असला तरी हिवाळी अधिवेशन, विद्यार्थ्यांच्या परिक्षांमुळे निवडणुका थेट मार्च 2026 नंतर होण्याची शक्यता आहे..आता निवडणुक आयोग सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन पाळून निवडणुक कार्यक्रम जाहीर करणार की न्यायालयाला विनंती करून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आणखी पुढे ढकलणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT