Marathwada rain saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon: मॉन्सूनबाबत नवी अपडेट, हवामान विभागाच्या अंदाजानं वाढवली शेतकऱ्यांची चिंता

Monsoon Update: मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाहीये.

Bharat Jadhav

यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एन्ट्री केली. राज्यात मान्सूनची एन्ट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला. पण मराठावाड्यात मात्र अजून अपेक्षित असा पाऊस पडला नाहीये. अजून काही दिवस वरुणराजा तेथे बसरणार नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. दरम्यान पुणे, सातारा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढील २-३ तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीय.

राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. काही दिवस पावसाचा जोर राहतो नंतर काही दिवस पाऊस उसंत घेत असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून तेथे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झालीय. राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला.

मात्र ३० मे नंतर पावसात काहीसा खंड पडला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली. पुन्हा एकदा २० जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं. पण पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी एक बातमी समोर आली आहे.

मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय. सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाहीये. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, पुढील दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मुसळधार पाऊस होणार नाही. मात्र २० तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी वर्तवलाय.

मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प असून तेथील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. चांगला पाऊस पडला नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिके सुकत असल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kobra Viral Video: भलामोठा क्रोबा पकडल्यानंतर जेव्हा हातातून पुन्हा निसटतो, तेव्हा काय घडतं? धडकी भरवणारा Video

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, मुंबई हायकोर्टात याचिका

Awhad vs Padalkar : सर्वसामान्यांना विधानसभा अधिवेशनाचा पास कसा मिळवता येणार? नियम काय?

Maharashtra Live News Update: अकोला पोलिसांकडून आरोपींच्या 2 ठिकाणी 'रोड शो'

Heavy Rainfall: जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?

SCROLL FOR NEXT