Ambadas Danve and alliance leaders amid growing tensions in MVA over MLC candidature decision. Saam tv
महाराष्ट्र

MLC Election: अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरुन मविआत फूट? काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार; ७ जणांची नावं चर्चेत

Maharashtra Politics: शिवसेनेने अंबादास दानवे यांना विधान परिषद सदस्यपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेस आपला स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून मविआत तणाव

  • काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता

  • हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहेत

विधान परिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असून काँग्रेस पक्षही विधान परिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज दिल्लीत आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार नसल्यानं काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या प्रतिक्रियामध्ये नाराजी उघडपणे दिसत होती. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना वडेवट्टीवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा करण्याआधी आमच्याशी चर्चा केली नाही.

काँग्रेसने पाठिंबा फक्त उद्धव ठाकरे यांच्या नावाला दिलेला होता. नवीन नाव कोणते आले असेल, तर ते चर्चा न करता ते पुढे आले असेल तर ते योग्य नाही. किमान चर्चा तरी आमच्यासोबत व्हावी, ही अपेक्षा होती. दरम्यान दोन वर्षात राज्यसभा आणि विधानपरिषद सोबत येणार आहे, त्यावर ठाकरे गटाची भूमिका काय असेल हे या चर्चेतून निश्चित झालं असतं, असं विजय वडेवट्टीवार म्हणालेत. जर पक्षश्रेष्ठींना उमेदवार देण्याचं ठरवलं तर आम्ही उमेदवार देऊ. असंही वडेवट्टीवार म्हणालेत.

दरम्यान काँग्रेसमधील ७ नेत्याची नावे चर्चेत आहेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, यशोमती ठाकूर , मोहन जोशी, नसीम खान यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणत्या नेत्याची विधान परिषदेसाठी वर्णी लागले हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करेल, असं भाई जगताप म्हणालेत.

या सर्व घडामोडींबाबत भूमिका मांडली आहे. काँग्रेस कदाचित आपला उमेदवार देईल. आतापर्यंत आमच्या चर्चा सुरू होत्या. त्यात एक गोष्ट जाहीर होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत आहेत. प्रांताध्यक्ष यासंदर्भातील अधिकृत घोषणा करू शकतात. कदाचित काँग्रेस विधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना नाही राहिली - राज ठाकरे

कोर्टात मोठा राडा; दोन वकिलांमध्ये जुंपली, एकाने शर्ट काढून व्यक्त केला संताप, व्हिडिओ व्हायरल

Snake Smell: या ५ गोष्टी घराच्या आजुबाजूला असतील तर सापांचा धोका वाढेल, वेळीच व्हा सावध

Exit Polls: पाच राज्यांपैकी २ राज्यात सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; एक्झिट पोलनं राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Kerala Exit Poll: केरळमध्ये कोणाचं सरकार येणार? भाजप, काँग्रेसचं काय होणार? एक्झिट पोलच्या अंदाजात भलतीच लाट

SCROLL FOR NEXT