Maharashtra Legislative Council election 2026 five seats saam tv
महाराष्ट्र

Maharashtra MLC Election: पाच जागा, दावेदार अनेक! महायुतीत जागावाटपावरून चढाओढ; राजकीय मोर्चेबांधणीला वेग

Maharashtra MLC Polls: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून महायुतीतील जागावाटपाकडे लक्ष लागले आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र विधान परिषद पाच जागांची निवडणूक 2026

  • महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक तारीख

  • 23 ऑक्टोबर 2026 विधान परिषद निवडणुकीचे मतदान

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय. अमरावती, पुणे, नागपूर, संभाजीनगर या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकांची घोषणा करण्यात आल्याने आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागतील. परंतु जागावाटपावरून महायुतीत चुरस वाढलीय.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आलाय. २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. पाच मतदारसंघांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय आहे. या निवडणुकीत विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच उमेदवारी आणि जागावाटपावरून चुरस निर्माण झालीय. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोरही योग्य उमेदवार निश्चित करण्याचे आव्हान आहे.

या पाच जागांपैकी तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व, तर दोन जागांवर महायुतीशी संलग्न सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणुकीतील पक्षीय समीकरणे बदलली आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप की राष्ट्रवादी?

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात २०२०मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते. आता लाड यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका घेतलीय. त्याचवेळी त्यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी दावा केलाय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आलाय. भाजपने राजेश पांडे यांच्यावर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातही चुरस

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुतीकडून मात्र शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांची नावे चर्चेत आहेत. चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी, तर सानप हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी आहेत. येथे भाजपकडूनही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि त्यानंतर उमेदवार कोण, हा पेच कायम आहे.

या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारांची नव्याने तयार होणारी यादी. पुणे विभागात पात्रता तारीख १ नोव्हेंबर २०२५ धरून मतदारयादीची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांनी मतदार नोंदणीवर दिलेला भर हा निवडणूकपूर्व तयारीतील महत्त्वाचा भाग ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT