CM Devendra fadnavis  Saam
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

BJP Shortlists 30 Candidates for Legislative Council Seats: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकींच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीने ३० जणांची नावं निश्चित केली असून ती दिल्लीला पाठवली आहेत.

Priya More

Summary -

  • विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग

  • भाजपकडून ३० उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली

  • ६ जागांसाठी अंतिम नावं लवकरच जाहीर होणार

  • प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित

गणेश कवडे, मुंबई

विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपकडून ३० जणांच्या नावाची यादी केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. यापैकी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब माहिती सूत्रांनी दिली.

भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलेल्या ३० जणांच्या यादीमध्ये प्रज्ञा सातव यांच्यासह माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी यांची नावं असल्याची माहिती आहे. या पैकी आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय ते पाहणे महत्वाचे राहिल.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला असलेल्या ६ जागांसाठी कुणाला संधी द्यायची यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. ३० जणांची यादी तयार आहे यामधील कुठली ६ नावं केंद्रीय नेतृत्वाकडून फायनल होणार हे लवकरच कळेल. या निवडणुकीत जातीय आणि प्रादेशिक समतोलावर विशेष भर दिला जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील ९ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या ९ सदस्यांचा समावेश आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT