महाराष्ट्र

झिरवळांचं मंत्रीपद दुसरंचं कुणी चालवतंय, माहिती अधिकार कार्यकर्त्याला वेगळाच संशय, पाहा काय म्हणाले?

Narhari Zhirwal : आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी महाराष्ट्र मंत्री नरहरी झिरवाल यांच्या खात्याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे प्रशासनात खळबल माजली आहे.

Bharat Jadhav

  • नरहरी झिरवळ यांच्या खात्यावर नवीन वाद उभा

  • RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर संशय

  • लाच प्रकरणानंतर वाद अधिक चिघळला

आधी लाचखोरीचं प्रकरण आता अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या खात्याविषयी धक्कादायक खुलासा उघडकीस आला आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खाते आहे. काही दिवासपूर्वी त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांच्या खात्याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

झिरवळ यांचे मंत्रीपद दुसरेच कोणी चालवत आहे का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. झिरवळ यांच्याकडे अनेक बाबतीत तक्रारी केल्या,मात्र त्यावर ते काही उत्तर देत नाहीत. अधिकारी त्याचे ऐकत नाहीत, असा धक्कादायक खुलासा कुंभार यांनी केला आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे बघून त्यांचा पोशाख पाहून ते सज्जन असल्याचं वाटतं. झिरवळ यांच्यावर काही आरोप झाला तर त्यांचे सहकारी लगेचच त्यांच्या बचावासाठी धावातात.

झिरवळ हे प्रामाणिक आहेत,ते स्वच्छ प्रतिमेचं असल्याचं सांगतात. परंतु गेल्या काही दिवसापासून आम्ही झिरवळ यांच्याशी पत्रव्यवहार करतोय. त्यांना काही गोष्टी सांगतोय. काही लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतोय. पण झिरवळा यांचे उत्तर मात्र नकारार्थी होतं. लहान मुलांची जी लस आहे, ती लस हाफकिनकडे आहे. ती लसचं खासगीकरण करण्यात येत आहे. एक कंपनी त्याबाबत प्रयत्न करत आहे.

या खासगीकरणाला मंत्र्यांचा विरोध आहे, पण झिरवळ यांच्या खात्यातील अधिकारी झिरवळ यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे झिरवळ यांचे खाते ते चालवत नाही तर दुसरेच कोणी अधिकारी चालवत आहेत. किंवा सत्ताबाह्य व्यक्ती ते चालवत असल्याची शक्यता आहे. त्यांची नावे सुद्धा आता बाहेर येतील. यामुळे खरात फाईल्स प्रमाणे झिरवळ फाईल्स बाहेर येतील असं विजय कुंभार म्हणाले.

झिरवळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावला

झिरवळांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.' झिरवळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठं नाव समोर येत आहे. सरकारमधील एक माजी मंत्री आहेत. तेच हे सगळं करत आहेत. जर झिरवळांची जागा खाली झाली तर त्याची एन्ट्री होईल, असा सगळा प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

Health care: जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे का? कोणती फळे ठरतात फायदेशीर

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू व्यक्तीवर ईडीचा छापा, नोटांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, राजकारणात खळबळ

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून गर्लफ्रेंडचा गळा चिरला, बॉयफ्रेंडने घरात घुसून केले सपासप वार

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT