maharashtra milk price issue Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Milk Price Issue: दूधदर मैलांवर बदलतात, दुध उत्पादक शेतक-यांचा कोल्हार- घोटी मार्गावर रास्ता रोको

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे / विश्वभूषण लिमये

Nagar News :

दुध दर प्रश्नी आज (गुरुवार) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जनसंघर्ष‌ संघटना तसेच दुध उत्पादक शेतक-यांनी कोल्हार - घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन (kolhar ghoti highway rasta roko andolan) केले. यामुळे परिसरातील वाहतुक काही विस्कळीत झाली. (Maharashtra News)

दुधाला 34 रुपये दर द्यावा, पशू खाद्याचे दर 25 टक्के कमी करून जीएसटी हटवावी, सरकारी आणि खाजगी दुध संघाचे ऑडीट करावे तसेच तीन महिन्यातील दुध दरातील फरक शेतक-यांना द्यावा अशा विविध मागण्यासांठी शेतक-यांनी आंदोलन छडेले. त्यानंतर काही शेतक-यांनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

दूधदर मैलांवर बदलतात

सांगली आणि कोल्हापुरात गाईच्या दुधाला लिटरला ३३ रुपये, सातारा आणि पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळत आहे. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झालं आहे.

या घसरणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांचे मरण होत असताना शासनाचा अंकुश राहिला नसल्याने दरात फरक करण्याचे धाडस खासगी दूध संघांकडून होत आहे. त्यामुळे याचा पूर्ण फटका सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याला बसतो आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT