Proposal for 20 new districts and 81 talukas in Maharashtra sparks fresh debate among citizens." Saamtv
महाराष्ट्र

New Districts: राज्यात होणार २० नवीन जिल्हे अन् ८१ तालुके; सरकारचा नेमका प्लॅन काय?

Maharashtra New Districts: राज्यात ८१ नवे तालुके आणि २० जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र २०२१ ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत निर्णय होणार नसल्याचं भाजप मंत्र्यानं सांगितलंय.

Bharat Jadhav

राज्यात नवीन तालुके आणि जिल्हे होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. राज्यात तब्बल ८१ तालुके आणि २० नवे जिल्हे बनवले जाणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे आलाय. नवीन जिल्हे कधी होणार सरकार कधी घोषणा करणार याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चंद्रपुरात माहिती दिली. दरम्यान मंत्री बावनकुळे यांच्या विधानानंतर नागरिकांमध्ये कोणते नवे जिल्हे होणार, याबाबत चर्चा सुरू झालीय.

दरम्यान सरकार समोर प्रस्ताव आहे, त्यावर निर्णयही घेतला जाणार आहे, पण जनगणनेचा अहवाल आला तर नवीन जिल्ह्यांबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरणही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. सरकारसमोर नवीन २० जिल्हे आणि ८१ तालुके करण्याचा प्रस्ताव आलाय. परंतु मात्र जोपर्यंत २०२१ ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत त्यावर निर्णय होणार नसल्याचं बानवकुळे म्हणालेत.

दरम्यान नवीन जिल्हे होण्याची चर्चा दोन वर्षांपासून चालू आहे, परंतु मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यावेळी विधानसभेत या चर्चांना पू्र्ण विराम दिला होता. २०२३ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील, हे महसूल मंत्री होते, विधानसभेत बोलताना त्यांनी नवीन जिल्हे होण्याच्या चर्चांना ब्रेक लावला होता. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी येणारा मोठा आर्थिक खर्च होतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान ३५० कोटी रुपये खर्च येत असतो. तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जागेवरून होणारे वादामुळे २०२३ मध्ये नवीन जिल्हे होण्याची चर्चा संपृष्टात आली होती.

पण नवीन तालुके निर्माण करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक होतं. आता हाती आलेल्या माहितीनुसार सरकारसमोर नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव आलाय. त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येत स्थानिक विकासाला गती मिळत असते. पण या प्रक्रियेसाठी आर्थिक भार आणि प्रशासकीय अडचणी येत असतात

. दरम्यान नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात सरकारसमोर प्रस्ताव आहे. पण जोपर्यंत जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. तो अहवाल आल्यानंतरच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा निर्मितीबाबतचा निर्णय घ्यावा लागतो. जानेवारी महिन्याच्या आधी सोशल मीडियावर नवीन जिल्ह्यांबाबत काही मेसेज व्हायरल होते. २६ जानेवारी २०२५ ला नवीन जिल्ह्यांची घोषणा केली जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. परंतु ते मेसेज खोटे असल्याचं नंतर निदर्शनात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT