अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यास मारहाण करणाऱ्या 'रावण ग्रुप'च्या सहा आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करून शहरातून वरात काढत जनतेत भीती नाही, तर कायद्यावर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मेणबत्या लावून आणि दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली, नवनीत राणा यांच्यासह उपस्थित लोकांनी या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला तसेच आरोपी वर कठोरात कठोर कारवाई करावी ही मागणी करण्यात आली,आता भारतावर डोळे वटाळून बघा तुमचे डोळे काढल्या जाईल असा इशारा नवनीत राणा यांनी दिला,तर आता फक्त पाणी बंद केलं पुढे एक एक दाण्यासाठी पाकिस्तान तर तरसणार आता पाकिस्तान मधून भारतात शिरले पुन्हा शिरून दाखवा त्याचा बदला कसा घेऊ आम्ही असा इशारा देखील नवनीत राणा यांनी दिला
- नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च
- कॅन्डल मार्च काढत अतिरेकी हल्ल्याचा निषेध
- पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी आणि मोदी शहांच्या राजीनाम्याची केली मागणी
- पुढील आठ दिवस जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल
- जिल्ह्यातील नर्सरी ते सातवी पर्यंत सुरु असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळांच्या वेळेत बदल
- सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत असणार शाळा
- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासुन तापमानात सतत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी यांचा निर्णय
डोंबिवलीत एन आय ए ची टीम दाखल
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबियांशी
एनआय ए चौकशी करणार
हल्ल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं,कसा हल्ला झाला, याचा जबाब नोंदवणार
उन्हाचा तीव्रतेने हिट झालेल्या डीपी ने अचानक घेतला पेट.
विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला लागली आग.
डीपीला आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांची एकच धावपळ उडाली.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस वर.
नंदुरबार जिल्ह्यात वाढता तापमानाचा फटका विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला बसतानाच पाहायला मिळत आहे.
डीपीला लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ.
शहादा नगरपालिका अग्निशमन दल वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीचं कारण अस्पष्ट
अग्निशमन दलाकडून आग अटोक्यात
आगीमध्ये इर्टिगा गाडी जळून खाक
संगम चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 28 जणांचा ग्रुप दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती-पत्नी सुखरूप बचावले आहेत काश्मीर पहलगाम मधील घटनास्थळापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर वरती हा सगळा ग्रुप व हे कुटुंब होतं या सगळ्या घटनेचा थरार या घटनेतून बचावलेले शिवप्रसाद चौगुले व पत्नी प्रियांका चौगुले यांनी सांगितला आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आरामाशीनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या आरामशीनला लागूनच मोठी वस्ती असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रिसोड नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल असून ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याची प्रयत्न सुरू आहे..
- कोल्हापूरच्या मुरगुड परिसरातील घटना
- चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे हा 24 वर्षे तरुण गंभीर जखमी
- जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
- तरुणाला विवस्त्र करून रॉड, काट्या आणि लाथा बुक्क्याने केली जबर मारहाण
- मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील मारेकर्यांनी देखील केला शूट
- मारेकर्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत केली मारहाण
- बीडमधील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात तरुणाला विवस्त्र करून मारहाण करताना केले व्हिडिओ
आगीची वर्दी मिळतात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने सहा अग्नीशमन विरोधी बॉम्ब घटनास्थळी पाठविले आहेत. झोपडपट्टीतील आतील भागात आग लागली असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. मात्र पाईप लाईन आणि फायर होसच्या सहाय्याने अग्निशमन विभागाने अगदी काही तासाच्या आत आग आटोक्यात आणली आहे. या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
- मागील पंधरा दिवसांपासून राज्यभरातसह उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहे.. यातच विदर्भात हिट व्हेवमुळे अधिकच त्रास जाणवत आहे. प्रादेशिक हवामान दोन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे...
- (Heat Wave)ऑरेंज अलर्टमुळे पुढील दोन दिवस हे तापमान 45 अंशाचा घरात राहण्याची शक्यता आहेय..
- उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत आहे...विदर्भात तीव्र- उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे..
- सोमवारपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे 44 अंशाचा घरात आहे.. हे तापमान सामान्यपेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअसने अधिक आहे.
- शनिवारीनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे.. त्यामुळे पूर्व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्या परिस्थितीत तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे..
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनात खासदार अशोक चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण सहभागी झाले होते.या निदर्शना दरम्यान अशोक चव्हाण यांनी उद्या नांदेड बंद ची माहिती दिली.
अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगातील कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ७ नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी गेलेले हे तिन्ही कुटुंब सध्या श्रीनगरच्या हॉटेल ग्रँड रोमामध्ये अडकले आहेत. यात १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
उल्हासनगर रेल्वेचा नगर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील मध्य पादचारी पुलाचे काम चालू असताना ओव्हर हेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडल्याने ठिणग्या उडाल्या. अंबरनाथहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या काही वेळ थांबवण्यात आल्या. स्टेशन मास्तरच्या तत्परतेने ओव्हर हेड वायर बंद करण्यात आली असून, या कारणामुळे मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटं विस्कळीत झाली होती. आता रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
कृष्णा आंधळे याच्या शोधासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात दोन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली. या सोडतीतुन उत्तर पुणे जिल्ह्यात "महिलाराज" प्रस्थापित होणार असून 628 पैकी तब्बल 316 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नेमले जाणार आहेत.
चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे. या मद्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकरांसह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी करत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अमरावती जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले आहे. अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले.
काश्मीर येथिल पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना वर्ध्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. आंतराष्ट्रीय बजरंग दल व दुर्गाशक्ती परिषदेच्या वतीने वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कँडल जाळत श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्ध्यातील नागरिक या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेय. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
- पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे 2023 24 चा राज्यातून प्रथम क्रमांक हिंगणघाट बाजार समितीला
- हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळवले 200 गुणांपैकी 178 गुण
- हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतले जाते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय
- राज्यातून 305 बाजार समित्यांपैकी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटनी पटकवला पहिला क्रमांक
- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचे करण्यात येत आहे सर्व स्तरातून अभिनंदन
कोथरूड – कश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोथरूड येथील शिवशाही प्रतिष्ठान कडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत, देशविरोधी कारवायांचा तीव्र निषेध करणारे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी कोथरूडच्या मुख्य चौकात आंदोलन केले. "दहशतवादाचा नायनाट झालाच पाहिजे", "भारतमातेचा विजय असो" अशा घोषणा देत देशभक्तीचा आविष्कार करण्यात आला.
पहलगाम हल्ल्यात जवळपास २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यातील मृतांना पीएम मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. या हल्ल्यात ज्यांनी जीव गमावला त्यांना श्रद्धांजली, असं त्यांनी म्हटलं आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.नांदेडच्या अर्धापूर येथे भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून आतंकवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा भाजपाच्या वतीने जाळण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन
डांबराच्या गाडीत प्रतीकात्मक नोटा ठेऊन केलं अनोखा आंदोलन
शंभर कोटीच्या रस्ते दुरुस्ती कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप
आंदोलका कडून शंभर खोके एकदम ओके ची घोषणाबाजी
आंदोलकांना महानगरपालिकेच्या दारातच अडवलं
- पुढील सुनावणीला उज्वल निकम उपस्थित राहणार..
- वाल्मीक कराडने दाखल केलेल्या डिस्चार्ज ॲप्लीकेशन वर सरकार पक्षाने आपले म्हणणे केले दाखल.
- विष्णू चाटेच्या वकिलाकडून डिस्चार्ज ॲप्लीकेशन दाखल.
- विष्णू चाटेला बीड कारागृहात हलविण्याच्या अर्जावर कारागृह अधीक्षक व सरकार पक्षाचं म्हणणं दाखल.
वेंगुर्ला कॅम्प येथील गावस्कर मैदान येथील ह्यालिपॅड येथे झाले पवारांचे आगमन.
शरद पवार वेंगुर्ल्यातील फळ संशोधन केंद्राला देणार भेट
कोल्हापुरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी शिवसेना आक्रमक
निधी उपलब्ध होत असताना देखील रस्ते होत नसल्याने शिवसेना झाली आक्रमक
रस्ते डांबरीकरणासाठी लागणारी अवजारे घेऊन शिवसेना महापालिकेत दाखल
शिवसेनेची महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदा कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेत मालाला भाव योग्य भाव मिळाला असल्याने, शेतकरी मोठ्या अडचणीत आला होता.., मात्र अशातच आंबट चिंचने काही प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा अंड्याचे पाहायला मिळत आहे... सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेची आवक सुरू झाली आहे..तर या आंबट चिंचेला बाजारात 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे...तर या सोबत चिंचोक्यांना देखील चांगला दर मिळाल्याने सध्या चिंच लागवड शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसत आहे..
पहलगाम येथील दहशतवादी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगावत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला..
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला...
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात असून जळगाव ते हिंदू समाजबांधव आक्रमक झाले आहेत
संपूर्ण जळगाव शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये निषेधाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष हिंदू समाजबांधव सहभागी झाले होते.
दुकान बंद करण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
सुरू असलेली दुकाने केली बंद
दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचं केलं आवाहन
राज्यभरात नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या काही दिवसापासून कामगारांना आणि शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे... कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव असल्याने, हमाल माथाडी कामगारांची हेळसांड होत आहे.. मार्केट परिसरातील माथाडी कामगारांना आणि शेतकऱ्यांना शुद्ध पाणी द्यावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या वाटर फिल्टर धुळखात पडल्याचं पाहायला मिळत आहे..लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले वाटर फिल्टर साठी पाणी नसल्याच बाजार समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.. मात्र तात्काळ पाणी सुरू करावं अशी मागणी हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..
आज धुळ्यामध्ये सकल जैन समाज संघटनेच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व सकल जैन समाज बांधवांनी काळया फिती बांधून या निषेध मूक मोर्चा मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे,
- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या धाड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन
- नाशिकमधील ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी
- हातात काळे झेंडे आणि काळ्याफिती बांधून दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा शिवसैनिकांकडून निषेध
- त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या झाल्याप्रकरणी देखील ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध
- महाराष्ट्रात आणि देशात हिंदू सुरक्षित नाही, ठाकरे गटाची बॅनरबाजी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई केली आहे. दरम्यान, आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. यामुळे पाकिस्तानला घाम फुटल्याचे दिसत आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्यातच्या संचालक पदासाठी तब्बल 478 उमेदवाराचे अर्ज झाले वैध झाले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला बारामतीत सुरुवात झाली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 18 मे रोजी निवडणूक होत आहे,यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
पर्यटनासाठी गेलेले श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळे येथील सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर तिकडे भितीचे वातावरण असून विमानाचे तिकीट मिळणे मुश्किल झाल्याचं त्यांनी सोशल माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून सांगितलं आहे.. महाराष्ट्र सरकारने आम्हाला येथून लवकरात लवकर बाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.. अडकलेल्यांमध्ये अहिल्यानगर येथील तृतीयपंथीयांचे काजल गुरु आणि धुळे येथील पार्वती गुरू यांचा समावेश आहे...
अकोले तालुक्यातील राजुर गावात कावीळच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच 100 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.. अनेकांना संगमनेर, राजूर आणि अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत..
नंदुरबार येथें जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डोंबिवली बंदला हॉटेल व्यवसायिकांचा पाठिंबा
डोंबिवलीतील सर्व हॉटेल्स आज दुपार पर्यंत बंद राहणार
- अजित शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, डोंबिवली
जम्मू काश्मीर येथील झालेल्या पर्यटकावर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे हा बंद व्यापारी व नागरिकाकडून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात सर्व तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे दिवसभर बंद पाळल्यानंतर सायंकाळी परभणी शहरातून पाच वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा शहरातील शनिवार बाजार येथून निघत मुख्य बाजारपेठ मधून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी.
काश्मीरमधील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट रस्त्यावर उतरला
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीत दुकानदारांना बंद करण्याचा आव्हान
ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी स्टेशन परिसरात दाखल झालेत डोंबिवलीकर दुकानदारांना दुकान बंद ठेवण्याचा आवाहन केलं
30 एप्रिल पर्यंतचे बुकिंग तिकीट 8 हजारावर..
2 मे पासून 3 हजार 864 रुपये दर दिसतो आहे.
16 जून नंतर 2625 रुपये आणि 25 जून नंतर 2100 रुपये दर्शवितो आहे.
सर्व सामान्य नागरिकांना विमान प्रवासाचा दर न परवडणारा आहे..
याशिवाय विमानाची वेळ देखील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीची नाही.. त्यामुळे वेळ बदलण्याची देखील मागणी होते आहे..
कोकणातील मुंबई - गोवा महामार्गाला पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सागरी महामार्ग उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 8 खाडीपुलांपैकी 6 खाडीपुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड जोडणारा खाडी पूल 700 कोटींचा आहे. बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलाच्या निविदा 7 जूनला उघडण्यात येणारा आहे.
अमरावतीत एक दिवसाय पाळला जाणार बंद..
अमरावतीत तीव्र निषेध आंदोलन..
उद्या सकाळी 10 वाजता राजकमल चौकात श्रद्धांजली वाहून तीव्र केला जाणार निषेध..
विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनेचे आयोजन..
- त्र्यंबकेश्वरच्या आराखड्याला अंतिम रूप देण्याची तयारी
- २९ एप्रिलला चौंडीमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहराच्या आराखड्याचा सादरीकरण
- प्रशासनानं सादर केलेल्या १५ हजार कोटींच्या आराखड्यात सातत्याने बदल
- त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील ८३७ कोटींची काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी तर उर्वरित कामं कुंभमेळ्यानंतर हाती घेण्याचं नियोजन
- अजय गमे आणि वाळू कसबे अशी संशयित आरोपींची नावे
- दोन्हीही सदाशिव घोटे या साधूचे शेजारी
- त्र्यंबकेश्वर साधू मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना नाशिक न्यायालयात करण्यात आले हजर
- साधूला लाथा बुक्क्यांनी झाली होती मारहाण, मारहाणीसह साधू जमीनीवर कोसळल्याची घटना झाली होती सीसीटीव्हीत कैद
- नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान 2 लाख 60 रूपये किंमतीचा दहा किलो गांजा पकडला आहे. ही कारवाई करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे करण्यात आली.या प्रकरणी पुणे येथील गौरव माल्हिकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय.. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चात सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदु - मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून रोष व्यक्त केला आणि दहशतवादाविरोधात भारत देश एकजुटीने उभा असल्याचा संदेश दिला..
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीकडून कोणतीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी बाहेर टाकले जात असल्याने शेतजमीन नापीक झाल्याने खासदार अमोल कोल्हे चांगलेच संतापलेत
धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारी एक योजना सहा वर्षापासून बंद आहे तर दुसऱ्या योजनेचा एक पंप नादुरुस्त आहे त्यामुळे दररोज आठ एमएलडी पाण्याची तुट निर्माण होत आहे.त्यामुळे धाराशिव शहराला चार दिवसाआड पाणी मिळत आहे.या दोन्ही योजना नव्याने करण्यासाठी मंजुरी मिळाली असली तरीही ती पुर्णत्वाकडे जाईपर्यंत धाराशिव करांना चार दिवसाआड मिळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागणार आहे. शहराला सध्या उजणी व तेर येथील तेरणा प्रकल्पातुन पाणीपुरवठा केला जात आहे.
रावेर, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटनाला आलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात मुख्य चौकात अतिरेक्याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय आणि विदेशी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जगदाळे यांच्या घरी दाखल होणार आहेत अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.
संतोष जगदाळे यांच्यावर त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही अंत्यविधी करणार आहे.
शरद पवार अंत्य दर्शनाला आले आहेत
अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
9 वाजता अंत्य यात्रा निघणार
धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह पाच जण पहिलगाम पासून 50 किलोमीटरवर आपल्या काही कामासाठी गेल्या असता त्या ठिकाणी अडकले आहेत, पार्वती जोगी ,साक्षी जोगी, काजल गुरु (अहिल्यानगर) पिंकी गुरु अहिल्यानगर हे अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे आहेत, कालपासून कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीय दहशतीखाली आहेत.
अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिव्या दिल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली.. गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी थेट बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र, याच वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन थेट पोलिस अधिकारी आमदाराला फोनवर शिव्या देऊन बसला. असा आरोप करीत भाजप आमदाराने शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर निलंबन करा.. अन्यथा राजकीय आमदाराची इज्जत राहणार नाही, असे गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे मागणी केली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी तूनकलवार यांच्यावर पोलीस विशेष महानिरीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील सुरु आहे..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील ५४ पर्यटक सध्या श्रीनगर आणि जम्मूजवळ अडकले असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. यातील पाच जण आज हवाई मार्गे परतणार असून, उर्वरित ४९ जण जम्मूमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
या पर्यटकांमध्ये बुलढाणा शहरातील ५, शेगावमधील ३, नांदुरा आणि खामगाव येथील प्रत्येकी १७, तसेच जळगाव (खान्देश) येथील ४ व्यक्तींचा समावेश आहे. या ४९ जणांचा ग्रुप १८ एप्रिल रोजी मलकापूर रेल्वेस्थानकावरून जम्मूकडे रवाना झाला होता. १९ एप्रिल रोजी ते जम्मूला पोहोचले, मात्र ढगफुटीमुळे पुढचा प्रवास रोखण्यात आला. त्यानंतर कटरा मार्गे हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले. पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी फक्त एक रात्र श्रीनगर येथे काढली आणि लगेचच परतीचा प्रवास सुरु केला आहे... अद्याप पर्यंत हे पर्यटक जिल्ह्यात पोहोचले नाहीत...
काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना साताऱ्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघ वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी या भ्याड हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहण्यात आली.डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
मयत मुलीच्या आईने पोलिसांच्या तपासावर उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह
मयत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाचा तपास अधिकारी बदलण्यात आला
आत्महत्या प्रकरणात अगोदरच सखोल तपास झाला आहे, मात्र मयत मुलीच्या आईने उपस्थित केलेल्या प्रश्नावर पुन्हा तपास होणार - पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती
बीड येथे शिक्षण घेत असलेल्या मुलींने धाराशिव येथे मामाच्या घरी केली होती आत्महत्या
आत्महत्या प्रकरणात मुलीला आरोपी अभिषेक कदम कडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप , पोलिसांकडून नीट तपास झाला नसल्याचाही आक्षेप
मयत मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून केली होती तक्रार
पोलिसांनी आरोपी अभिषेक कदमला अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मिळालेला
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढला आहे. या उष्णतेचा चिमुकल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.