परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
हल्लेखोरांना पकडून पीडितांना न्याय देणार
सिंधु जल करायला स्थगिती
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत मृतकांना राजकमल चौकात मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली..
पर्यटकांवरील या दहशतवादी हल्ल्याला भाजपकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हा हल्ला कोण्या धर्मावर नसून हा देशावर आहे पर्यटकांवर आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातून कश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेल्याच्या समोर आलं आहे. हे सर्वजण सध्या सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाच्या आणि सुरक्षित ठिकाणी कॅम्पमध्ये काहीजण मुक्कामाला आहेत. त्यामध्ये सांगलीमधील 2, मिरजेतील एक आणि कुपवाडच्या सावळी येथील एक आणि पलूस येथील 5 कुटुंबांचा समावेश आहे. हे सर्व कुटुंब सध्या सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये सध्या आहेत. यासर्व कुटुंबांशी प्रशासनाकडून संवाद साधण्यात आला असून त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे.
मानखुर्द मध्ये मेट्रोचे काम सुरू असताना खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू
मानखुर्द स्टेशन जवळ मेट्रोचे काम सुरू आहे. यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. याच खड्ड्यात पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत
काँग्रेसच्या वतीने भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
संगमनेर बस स्थानक परिसरात कॅन्डल मार्च काढून केला निषेध
जयश्री थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबे सहभागी
पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत केला निषेध
रणजीत कासलेच्या विरोधामध्ये आणखी दोन गुन्हे परळी शहर आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे रणजीत कासलेला पुन्हा पोलीस ताब्यात घेऊ शकतात.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कासले विरोधात आहे गुन्हा दाखल.
पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज कासलेला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात १५०० हून अधिक ओव्हरग्राउंड कामगार आणि अतिरेकी रेकॉर्ड असलेल्या आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था
- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- उद्या दोन विमान श्रीनगरहून मुंबईकडे येणार
- पर्यटकांना मोफत आणण्याची व्यवस्था
- इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची व्यवस्था झाल्याची मोहोळ यांची माहिती
- उद्या १८२ पर्यटक श्रीनगरहून मुंबईला येणार
- विमानांचा खर्च राज्य सरकार देणार
संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना रात्रौ 11:15 वाजता पुणे विमानतळ येथे आणण्यात येईल व तेथून रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार.
दोन्ही पार्थिव सकाळी 7/7:30 ला निवासस्थानी दर्शनासाठी नेण्यात येतील.
संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा उद्या 24 एप्रिल सकाळी 9 वाजता राहत्या घरून निघणार असून सकाळी वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कौस्तुभ गनबोटे यांची अंत्ययात्रा देखील सकाळी 9 वाजता कोंढवा बुद्रुक, साळवे गार्डन समोर, चौधरी ट्रेडर्स, गनबोटे फरसाण हाऊस येथून निघून त्यांच्यावरही वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लातूरच्या उदगीर लातूर महामार्गावरच्या करडखेल पाटी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय...दरम्यान अपघातामधील मयत व्यक्ती हे माजी सैनिक आणि शासकीय कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये एका परप्रांतीय कर्मचाऱ्याने मुलीची छेड काढून तिला अर्धातास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांना सदर विषयाची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला चोप दिला.
सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा वाढला असून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. आईला बस स्टॅण्ड परिसरात सोडायला आलेल्या तरुणांची बाईकला आग लागली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. जवळच असलेलता अग्निशमन बंबने पाण्याचा मारा करत आग विझवण्यात आलीय.
आज परभणी शहरात तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. परभणीतील आज तापमान 43.1 अंशावर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट कायम आहे. मागील काही दिवसांपासून तापमानाने चाळीशीचा आकडा ओलांडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकजण घरीच थांबणे पसंत करत आहेत. महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक रुमाल,टोपी छत्री आदींचा उपयोग करताना दिसत आहेत.
धुळ्यात कमी झालेला तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा वाढला आहे, आज धुळ्यात 43 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 41.4 अंशावर कमी झाला होता, परंतु काल व आज तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत असून या तापमान वाढीचे चटके आता धुळेकरांना सहन करावा लागत आहेत.
रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातील पर्यटकांनी दहशतवादी कारवाईविरोधात आंदोलन केलं. महाराष्ट्रातील पर्यटक धनंजय जाधव आणि पुजा मोरे काश्मिरी नागरिकांसोबत दहशतवादी कारवाई विरोधात रस्त्यावर उतरले. भारत माता की जय, टुरिस्ट हमारी जान है च्या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये 2 हजारपेक्षा जास्त पर्यटक अडकले आहेत.
पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर नराधमांनी दहशतवादी हल्ला केल्याच्या निषेधार्थ परदेश वारी करणारे पंतप्रधान आणि देशातील नागरिकांची सुरक्षा करू न शकणारे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मध्ये फिरायला गेलेले हिंगोली शहरातील अग्रवाल कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे,
शुभम अग्रवाल व रचना अग्रवाल अशी या दोघांची नावे असून या दोघांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला होता
त्यानंतर पर्यटनासाठी ते काश्मीर मधील श्रीनगर भागात गेले होते मात्र दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतर या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली
मात्र आज सकाळी त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर अग्रवाल परिवाराने मोकळा श्वास घेतला आहे, दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव हे कुटुंब आहे
त्याच ठिकाणी पुढील काही दिवस राहणार असून परिस्थिती शांत झाल्यानंतर ते आपल्या गावी परतणार असल्याची माहिती मिळाली आहे
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे,
यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान व आतंकवादी विरोधात घोषणाबाजी केली आहे,
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करीत भ्याड हल्ला केला यामध्ये जवळपास 27 भारतीय नागरिकांचे प्राण गेले आहेत,
या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने निदर्शने करून निषेध व्यक्त केला,
तसेच भारतीय सरकारने तातडीने कठोर कारवाई करून त्यांना जोरदार उत्तर द्यावे, अशी मागणी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे,
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्रजी व पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशिमच्या वारला,टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा येथील अवैद्य दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी वज्रदेही महिला विकास संघाच्या महिला थेट वारला गावातील पाण्याच्या टाकीवर चढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन केले.
टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा गावात अवैध दारू विक्रेत्यांनी नुसता धुमाकूळ घातला असून, अवैध दारू विक्रीमुळे कित्येक महिलांचे घर उध्वस्त झाले असून त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे.
गावात सहजपणे पहाटेपासूनच तळीरामांना दारू मिळत असल्यामुळे गावाचे वातावरण दूषित झाले आहे. गावांची शांतता व सुव्यवस्था भंग पावली आहे.
अनेक महिला तसेच शाळकरी मुली या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झाल्या आहेत.
त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा त्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला.
पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला.
खास विमानाने या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगर येथून मुंबईत आणले जाणार आहेत.
नंतर ॲम्बुलन्स हे मृतदेह डोंबिवली आणि पुणे येथे घेऊन जाणार आहेत.
मृतदेह घेऊन जाण्यासाठी दोन रुग्णवाहिका सध्या मुंबई कार्गो विमानतळावर दाखल झाल्या आहेत.
पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच - छगन भुजबळ
अश्या दुःखद प्रसंगी भारतीयांनी एकत्र राहण्याची गरज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध - छगन भुजबळ
भारत सरकार झालेल्या घटनेचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही -छगन भुजबळ
जळगाव -
जळगावात शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळला....
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जळगावातील टॉवर चौकात आंदोलन..
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केल्याच्या घटनेचा शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन पाकिस्तानच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला..
दहशतवादी हल्ल्यानंतर ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा सरकारला सवाल
ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा दोष काय होता?? ते फिरायला गेले हा त्यांचा दोष होता का??
ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा दोष काय होता ?
देशात जे दहशतीचे वातावरण आहे त्याला जबाबदार कोण ?
खूपच दुःखद घटना आहे,देशावर जे संकट ओढवलंय ते दुखद आणि दुर्दैवी ,डोंबिवलीवर देखील दुःखाच संकट कोसळलं
सरकार आणि राजकारण्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांचा दोष काय ,ते फिरायला गेले हा त्यांचा दोष आहे का?
जे दहशतीचे वातावरण झालाय याला जबाबदार कोण आहे या माझा सरकारला प्रश्न आहे
शरद पवारांना भीमा कोरेगाव कमिशनकडून पत्र जाईल
शरद पवारांनी उद्धब ठाकरे मुख्यमंत्री असताना पत्रं दिल होत त्याची बातमी एका वर्तमान पत्रात आली होती
ते पत्र आयोगासमोर द्याव ही मागणी आम्ही केली होती
त्यावर आज सुनावणी झाली
मात्र पत्र दिल होती की नाही ही माहिती आयोगासमोर येईल
ही दंगल पूर्वनियोजित होती अस पत्रात म्हटल्याचा प्रकाश आंबेडकर यांच्या दावा
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने निषेध करण्यात आला.
पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आतंकवादी हल्लेखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले
तसेच या आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पहलगाम येथील आतंकवादी हल्ला आणि पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
सांगली जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत संभाजी भिडे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून निवेदन देखील देण्यात आले आहे.
या घटनेचा निषेध म्हणून शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढली.
पहलगाममधील झालेल्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहत पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथे हिंदूंवर घडलेल्या अत्याचाराच्या देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कण्याची मागणी यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून करण्यात आली आहे.
- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून पाकिस्तानची तिरडी आंदोलन
- पाकिस्तानची तिरडी काढत गाडगं घेऊन आंदोलन
- ठाकरे गटाच्या वतीने हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली
- यावेळी पाकिस्तानी झेंड्यांचे पोस्टर्स ही जाळण्यात आल्याचं दिसून आलं
- सत्ताधारी पक्षाने बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हल्ला करवला का त्याची चौकशी व्हावी
- मागील वेळी पुलवामा तसेच पठाणकोट येथे देखील अशाच पद्धतीचे हल्ले झाले होते
- त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी यामध्ये राजकारण करू नये अशी आमची मागणी
मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले.
संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल.
हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल.
हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर
दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)
संपर्क क्रमांक : 8657106273
संपर्क क्रमांक : 7276446432
पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष
Contact details :
A) 0194-2483651
0194-2457543
B) WhatsApp No.
7780805144
7780938397
Courtesy :- District Administration Srinagar
जम्मु काश्मिरमध्ये निशःस्त्र पर्यटकांवर करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्याचा आज महाडमध्ये शिवसेनेने जाहिर निषेध केला.
महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हि निदर्शन करण्यात आली.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निशपाप पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्थान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
या घटनेनंतर केवळ निषेध करून चालणार नाही तर हा हाल्ला गंभीर पणे घेणे गरजेचे असल्याच मत यावेळी मांडण्यात आले.
डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर तोंडावर काळ्याफिती लावून आंदोलन
घोषणा पुरे झाल्या आता पाक पुरस्कृत दहशतवाद मोडून काढा --
Sr. No. | Tourist Name | Mobile No. | Gender | Age (Yrs.) | Resident District Location | Type of Injury | Hospital Name & Location | Body Status | Other | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | S. Bhalchandra | Male | Pune | Minor Injury & Stable | ||||||
2 | Asawari Jagdale | 9.175E+11 | Female | Pune | Injured | |||||
3 | Pragati Jagdale | Female | Pune | Injured | ||||||
4 | Santosh Jagdale | Male | Pune | Dead | ||||||
5 | Kaustubh Ganbote | Male | Pune | Dead | ||||||
6 | Girish Bhalchandra Naikavadi | 9823352363 | Male | Pune | safe | |||||
7 | Rupali Girish Naikavadi | Female | Pune | |||||||
8 | Aadesh Girish Naikawadi | Male | Pune | |||||||
9 | Bhargav Girish Naikawadi | Male | Pune | |||||||
10 | Pramod Patil | Male | Pune | |||||||
11 | Tejasvini Pramod Patil | Female | Pune | |||||||
12 | Shreyansh Pramod Patil | Male | Pune | |||||||
13 | Vinay Agarkhed | Male | Pune | |||||||
14 | Sneha Vinay Agarkhed | Female | Pune | |||||||
15 | Sachin Pawar | Male | Pune | |||||||
16 | Naina Sachin Pawar | Female | Pune | |||||||
17 | Mansi Sachin Pawar | Female | Pune | |||||||
18 | Hemashri Sachin Pawar | Female | Pune | |||||||
19 | Ishwar Pawar | Male | Pune | safe | ||||||
20 | Alka Pawar | Female | Pune | |||||||
21 | Avinash Lad | Male | Pune | |||||||
22 | Jyoti Lad | Female | Pune | |||||||
23 | Kiran Chitte | Male | Pune | |||||||
24 | Deepak Chitte | Male | Pune | |||||||
25 | Madan Kulkarni | Male | Pune | |||||||
26 | Madhvi Kulkarni | Female | Pune | |||||||
27 | Sudhir Kulkarni | Male | Pune | |||||||
28 | Mitali Kulkarni | Female | Pune | |||||||
29 | Rohan Murugkar | Male | Pune | |||||||
30 | Rajendra Chavan | Male | Pune | |||||||
31 | Sujata Chavan | 9890257686 | Female | Pune | ||||||
32 | Abhishek Chavan | Male | Pune | safe | ||||||
33 | Neha Chavan | Female | Pune | |||||||
34 | Rugved Chavan | Male | Pune | |||||||
35 | Mangesh Shelar | Male | Pune | |||||||
36 | Rasika Shelar | Female | Pune | |||||||
37 | Atharva Shelar | Male | Pune | |||||||
38 | Siya Shelar | Female | Pune | |||||||
39 | Hirachand Kamble | Male | Pune | |||||||
40 | Namita Kamble | Female | Pune | |||||||
41 | Harshada Kamble | Male | Pune | |||||||
42 | Manasvi Kamble | Female | Pune | |||||||
43 | Pratik Nikam | Male | Pune | |||||||
44 | Nikita Nikam | Female | Pune | |||||||
45 | Ruhi Nikam | Female | Pune | safe | ||||||
46 | Sudhir Chimbalkar | Male | Pune | |||||||
47 | Smita Chimbalkar | Female | Pune | |||||||
48 | Dnyaneshwar Shinde | Male | Pune | |||||||
49 | Nayan Shinde | Male | Pune | |||||||
50 | Gopal Mundada | Male | Pune | |||||||
51 | Shweta Mundada | Female | Pune | |||||||
52 | Parth Mundada | Male | Pune | |||||||
53 | Chhaya Patil | Female | Pune | |||||||
54 | Prabhakar More | Male | Pune | |||||||
55 | Ravindra bonagit | Male | Pune | |||||||
56 | Raju Sarkale | Male | Pune | |||||||
57 | Amod Joshi | 9975394714 | Male | Pune | ||||||
58 | Jyoti Joshi | Female | Pune | safe | ||||||
59 | Ahan Joshi | Male | Pune | |||||||
60 | Vishal Khodke | Male | Pune | |||||||
61 | Ujwala Khodke | Female | Pune | |||||||
62 | Narendra Jadhav | Male | Pune | |||||||
63 | Harshal Pandit | 9673728192 | Male | Pune | ||||||
64 | Vaishali Pandit | Female | Pune | |||||||
65 | Shravasti Pandit | Female | Pune | |||||||
66 | Yashwant Ranaware | 9923118101 | Male | Pune | ||||||
67 | Mrs. Geeta Ranaware | Female | Pune | |||||||
68 | Somshekhar Bedare | 9850433090 | Male | Pune | ||||||
69 | Ashvini Bedare | Female | Pune | |||||||
70 | Anish Bedare | Male | Pune | |||||||
71 | Arya Bedare | Female | Pune | safe | ||||||
72 | Mohit Changede | 8657560706 | Male | Pune | ||||||
73 | Lubha Changede | Female | Pune | |||||||
74 | Aryash Changede | Male | Pune | |||||||
75 | Sanjay Raut | 9923051111 | Male | Pune | ||||||
76 | Sonal Raut | Female | Pune | |||||||
77 | Adarsh Raut | Male | Pune | |||||||
78 | Hemant Bedekar | 7774010440 | Male | Pune | ||||||
79 | Rupali Bedekar | Female | Pune | |||||||
80 | Aryan Bedekar | Male | Pune | |||||||
81 | Sandeep Patil | 7506402111 | Male | Pune | ||||||
82 | Namrata Patil | Female | Pune | |||||||
83 | Sneha Patil | Female | Pune | |||||||
84 | Sanvi Patil | Female | Pune | |||||||
85 | Vijay jadhav | 9860309500, 9682661874, 9665732122 | Male | Pune | safe | |||||
86 | Anjali jadhav | Female | Pune | |||||||
87 | Aaditya jadhav | Female | Pune | |||||||
88 | Avanti jadhav | Female | Pune | |||||||
89 | Anil Divekar | Male | Pune | |||||||
90 | Pratibha divekar | Female | Pune | |||||||
91 | Swara divekar | Female | Pune | |||||||
92 | Yashraj divekar | Male | Pune | |||||||
93 | Jyoti Zurunge | 9860596889 | Pune | |||||||
94 | Aditya Janardan Khatate | 9552729057 | Pune | Safe | ||||||
95 | Janardan Baban Khatate | Pune | ||||||||
96 | Manisha Janardan Khatate | Pune | ||||||||
97 | Kajal Aditya Khatate | Pune | ||||||||
98 | Kajal Ramesh Pore | Pune | ||||||||
99 | Dnyaneshwar Jawalkar | Pune | ||||||||
100 | Sadhana Jawalkar | Pune | ||||||||
101 | Nilesh Umbarkar | Pune | ||||||||
102 | Jyoti Umbarkar | Pune | ||||||||
103 | Aarya Umbarkar | Pune | ||||||||
104 | Bhumi Umbarkar | Pune | ||||||||
105 | Prasad Sawant | Pune | ||||||||
106 | Deepa D Sawant | Pune | ||||||||
107 | Deepa P Sawant | Pune | ||||||||
108 | Rakesh Takale | Pune | ||||||||
109 | Ashwini Takale | Pune | ||||||||
110 | Siddhant takale | Pune | ||||||||
111 | Sunil Nikam | Pune | ||||||||
112 | Rekha Nikam | Pune | ||||||||
113 | Dipali Gaikwad | Pune | ||||||||
114 | Vaishanavi Gaikwad | Pune | ||||||||
115 | Tejashree Gaikwad | Pune | ||||||||
116 | Manisha gaikwad | Pune | ||||||||
117 | Nirmala Adak | Pune | ||||||||
118 | Vaishali Dhagate | Pune | ||||||||
119 | Kiran Wagmode | Pune | ||||||||
120 | Samsher Shaikh | Pune | ||||||||
121 | Shain Shaikh | Pune | ||||||||
122 | Siddhik Shaikh | Pune | ||||||||
123 | Shirish Deshmukh | Pune | ||||||||
124 | Bhagyashree Deshmukh | Pune | ||||||||
125 | Prajwal Kulal | Pune | ||||||||
126 | Ashwini Futane | Pune | ||||||||
127 | Nasir Shaikh | Pune | ||||||||
128 | Vinod Yadav | Pune | ||||||||
129 | Komal Yadav | Pune | ||||||||
130 | Amol Hambir | Pune | ||||||||
131 | Mona Hambir | Pune | ||||||||
132 | Arohi Hambir | Pune | ||||||||
133 | Govind Yadav | Pune | ||||||||
134 | Jyoti Yadav | Pune | ||||||||
135 | Kaivalya Yadav | Pune | ||||||||
136 | Amol Mhaske | Pune | ||||||||
137 | Swapnali Mhaske | Pune | ||||||||
138 | Varsha Kanchan | Pune | ||||||||
139 | Aarya Kanchan | Pune | ||||||||
140 | Yuvraj Hole | Pune | ||||||||
141 | Tejashree Hole | Pune | ||||||||
142 | Tanishk Hole | Pune | ||||||||
143 | Chitraksh Hole | Pune | ||||||||
144 | Savita Lonkar | Pune | ||||||||
145 | Satish Gaikwad | Pune | ||||||||
146 | Darshana Gaikwad | Pune | ||||||||
147 | Prrajwal kutwal | Pune | ||||||||
148 | Sandhya Dedge | Pune | ||||||||
149 | Shaunak Dedge | Pune | ||||||||
150 | Rohini Gaikwad | Pune | ||||||||
151 | Aditya Gaikwad | Pune | ||||||||
152 | Prathamesh Zurunge | Pune | ||||||||
153 | Shalini nagekar | Pune | ||||||||
154 | Shraddha Kale | Pune | ||||||||
155 | Sai Kale | Pune | ||||||||
156 | Sheha Kulale | Pune | ||||||||
157 | Alka kudale | Pune | ||||||||
158 | Kalpna gaykwad | Pune | ||||||||
159 | Sushma shindi | Pune | ||||||||
160 | Rupali tambe | Pune | ||||||||
161 | Dipali lokhande | Pune | ||||||||
162 | Manisha Gaikwad | Pune | ||||||||
163 | Lalita adak | Pune | ||||||||
164 | Tejal Gaikwad | Pune | ||||||||
165 | Rajendra Krushnarao Jagtap | 9850082459 | Pune | |||||||
166 | Amit Rajendra jagtap | 8308687985 | Pune | |||||||
167 | Vanita Rajendra jagtap | 9657808689 | Pune | |||||||
168 | Yash Shah | Pune | ||||||||
169 | Mohit Changede | 8657560706 | Pune | Safe | ||||||
170 | Lubha Changede | Pune | ||||||||
171 | Aryash Changede | Pune | ||||||||
172 | vidya jadhav | Pune | ||||||||
173 | Nikhi shinde | Pune | ||||||||
174 | dharya jadhav | Pune | ||||||||
175 | uday jadhav | Pune | ||||||||
176 | Ashwini jadhav | Pune | ||||||||
177 | GOPAL MIRAJKAR | 986099382, 9422942323 | Pune | Safe | ||||||
178 | NALINI MIRAJKAR | Pune | ||||||||
179 | CHANDRAKANT DENG | Pune | ||||||||
180 | SUNITA KHODKE | Pune | ||||||||
181 | SHASHIKANT BASUTKAR | Pune | ||||||||
182 | SUREKHA BASUTKAR | Pune | ||||||||
183 | DATTARAM SAKPAL | Pune | ||||||||
184 | DEEPIKA SAKPAL | Pune | ||||||||
185 | TANAJI KAKADE | Pune | ||||||||
186 | SANGITA KAKADE | Pune | ||||||||
187 | ANUPAMA KALASKAR | Pune | ||||||||
188 | SEEMA MOTE | Pune | ||||||||
189 | JAYANT KULKARNI | Pune | ||||||||
190 | AMOLINI KULKARNI | Pune | ||||||||
191 | YOGESH TOPADEBUWAA | Pune | ||||||||
192 | RAGINI TOPADEBUWAA | Pune | ||||||||
193 | AARYA TOPADEBUWAA | Pune | ||||||||
194 | JAYSHREE KARNIK | Pune | ||||||||
195 | RATNAPRABHA MAHAJAN | Pune | ||||||||
196 | SHIVRAJ MATHPATI | Pune | ||||||||
197 | SUVARNA MATHPATI | Pune | ||||||||
198 | GAJANAN PATIL | Pune | ||||||||
199 | MEGHA PATIL | Pune | ||||||||
200 | PANDURANG ADLINGE | Pune | ||||||||
201 | ARUNA ADLINGE | Pune | ||||||||
202 | PRABHAKAR JOSHI | Pune | ||||||||
203 | JAYSHREE JOSHI | Pune | ||||||||
204 | MAHADEV BHOSALE | Pune | ||||||||
205 | SUVARNA BHOSALE | Pune | ||||||||
206 | ATUL DESHPANDE | Pune | ||||||||
207 | AARTI DESHPANDE | Pune | ||||||||
208 | ABHISHEK DESHPANDE | Pune | ||||||||
209 | ANVI DESHPANDE | Pune | ||||||||
210 | ABHILASH DESHPANDE | Pune | ||||||||
211 | GRISHMA JOSHI | Pune | ||||||||
212 | VIJAY DESHPANDE | Pune | ||||||||
213 | ANUSHRI DESHPANDE | Pune | ||||||||
214 | AANAV DESHPANDE | Pune | ||||||||
215 | VIJAY KUMAR SHANKARRAO GUMPHEKAR | Pune | ||||||||
216 | Dinesh Gavhane | 7276859047 | Pune | Safe | ||||||
217 | Vishal Gavhane | Pune | ||||||||
218 | Varsha Gavhane | Pune | ||||||||
219 | Deepali Gavhane | Pune | ||||||||
220 | Sweta Gavhane | Pune | ||||||||
221 | Swaraj Gavhane | Pune | ||||||||
222 | Viren Gavhane | Pune | ||||||||
223 | sunil Vahile | 9103276059 | ||||||||
224 | satish kharabi | 9103427513 | ||||||||
225 | Tejal Gaikwad | 7875296651 | Safe | |||||||
226 | Manisha Gaikwad | 9172013172 | ||||||||
227 | Deepali Lokhande | 7798013421 | ||||||||
228 | Rupali Tambe | 9373095381 | ||||||||
229 | Bhagyashri Deshmukh | 8446611212 | ||||||||
230 | Nirmala adak | 9763484478 | ||||||||
231 | Deepali Gaikwad | 9067222199 | ||||||||
232 | Vaishali Gaikwad | 9657925529 | ||||||||
233 | Shirish Deshmukh | 8888584245 | ||||||||
234 | Ramdas Murlidhar Jagtap | |||||||||
235 | Swati Ramdas Jagtap | 9682643580, 84928 21931, 9103240294 | ||||||||
236 | Shankar Vitthal Raut | |||||||||
237 | Neelam Shankar Raut | |||||||||
238 | Asmita Shankar Raut | |||||||||
239 | Aryan Shankar Raut | |||||||||
240 | Ganesh Maruti Bhagwat | |||||||||
241 | Ashwini Ganesh Bhagwat | |||||||||
242 | Shreeja Ganesh Bhagwat | |||||||||
243 | Rajveer Ganesh Bhagwat | |||||||||
244 | Chandrashekhar Yashwant Kudale | |||||||||
245 | Sapna Chandrashekhar Kudale | |||||||||
246 | Krushnali Chandrashekhar Kudale | |||||||||
247 | Vrundali Chandrashekhar Kudale | |||||||||
248 | Krushnaraj Chandrashekhar Kudale | |||||||||
249 | Sagar Yashwant Kudale | |||||||||
250 | Tejaswi Sagar Kudale | |||||||||
251 | Yashveer Sagar Kudale | |||||||||
252 | Shyam baban Dedge | |||||||||
253 | Yogita Sham Dedge | |||||||||
254 | Ganesh Shyam Dedge | |||||||||
255 | Sanket Sarang Dedge | |||||||||
256 | Gauri Ganesh Baneker | |||||||||
257 | Adhiraj Ganesh Baneker | |||||||||
258 | Avanti Ganesh Baneker | |||||||||
259 | Seema Mohan Dedge | |||||||||
260 | Gauri Mohan Dedge | |||||||||
261 | Janvi Mohan Dedge | |||||||||
262 | Aarohi Mohan Dedge | |||||||||
263 | Kiran dattatrey Chandre | |||||||||
264 | ShivTej Dattatreya Chandre | |||||||||
संजय लेले यांच्या जाण्याने त्यांच्या मित्र परिवाराने हळहळ व्यक्त केली दहशतवादयांच्या या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवलाय.
संजय लेले हे मनमिळाऊ स्वभावाचे होते आजूबाजूच्या मित्रांनाच नव्हे तर इमारती शेजारी असलेल्या पावभाजीच्या गाडी मालकाला देखील ते कायम मदत करत असायचे.
संजय लेले हे उत्तम क्रिकेटर होते असे त्यांच्या मित्रांनी सांगितलं.
आज संजय लेले यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या इमारतीच्या आजूबाजूला मित्रांचे गर्दी झालेली पाहायला मिळाली.
इमारती लगत असलेल्या चौकात त्यांचे मित्र त्यांच्या आठवणी एकमेकांना सांगत होते .
अशा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना निस्तनाबूत करावं अशी मागणी त्यांनी केली
अमरावतीमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबांची प्रशासनाकडे मागणी..
श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना बोलताना अश्रू अनावर.
कुटुंबीयांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे आमच्या नातेवाईकांना अमरावती मध्ये परत आणण्याची केली मागणी...
जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना नंदुरबार शहरात श्रद्धांजली अर्पित करण्यात आली
नंदुरबारच्या धान्य मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रद्धांजली अर्पण करत हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला...
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे वाशिमचे 51पर्यटक फिरण्यासाठी गेले असताना, पहलगाम येथे पोहचण्यासाठी काल उशिर झाल्याने ते जाऊ शकत नाही, त्यामुळं ते बचावले असून, सध्या हे पर्यटक श्रीनगर येथे सुखरूप आहेत.
वाशिम शहरातील मुक्तांगण योगा मंडळाचे 51 सदस्य सहलीसाठी काश्मीरला गेले आहेत.
यांच्या सहलीचा कालावधी 6 दिवसांचा होता, यात बहुतांश महिला सहभागी आहेत.
हे पर्यटक रविवारी हे वाशिम वरून निघाले,मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास श्रीनगर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध ट्युलिप गार्डनला भेट दिली.
तिथून ते पहलगाम येथे जाणार होते मात्र, जाण्यासाठी उशीर झाल्याने ते तिथे जाऊ शकले नाही.
यात एकूण 51 जणांमध्ये 50 वाशिम येथील असून, एक पर्यटक पुण्यातील आहे. यामध्ये 44 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे.
रत्नागिरी दक्षिण मनसेकडून जाळण्यात आला पाकिस्तानचा झेंडा
पाकिस्तानचा उल्लेख पापी स्थान
पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याचा केला रस्त्यावर उतरून निषेध
मनसेकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी
भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावं - मनसेची मागणी
जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
अशातच पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे 100 च्यावर पर्यटक सुखरूप आहे. त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला आहे.
गोळीबार होण्याच्या काही तासा आधी ही सर्व पर्यटक श्रीनगर च्या दिशेने निघाले होते.
अमरावती चे संपूर्ण पर्यटक सध्या सुखरूप आहेत.अमरावतीचे 100 ही पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आणि पहलगाम येथे सुखरूप असून श्रीनगरच्या आणि पहलगामच्या खाजगी हॉटेलमध्ये थांबून असल्याची माहिती आहे.
मंगला बोळके, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचे हे कुटुंब आहे.
हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे माहिती अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली.
सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यात असणारया जिंती गावाच्या जितोबा देवाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली.
गेले 400 वर्षापासुनची हि परंपरा आज ही जिंती गावातील ग्रामस्थांनी जतन करुन ठेवली आहे. या बगाडाची सुरुवात गावातील हरळी वैष्णव मठापासुन केली जाते.
यावेळी बगाडाचे मानकरयाची वाजत गाजत आणी गुलालाची उधळण करत मिरवणुक जितोबा मंदिरा पर्यन्त काढण्यात आली.
यात्रेला आलेले भावीक मोठ्या संख्येने जितोबा देवाच्या जागृत देवस्थानामुळे आपला देवासमोर नवस बोलतात आणि हा नवस पुर्ण झाला की नवस फेडण्यासाठी अनेक भावीक या ठिकाणी येत असतात. नारळाचे तोरण आणि पैशाची माळ घालुन हा नवस फेडला जातो दरवर्षी
हा सोहळा पाहण्यासाठी जिल्हयासह इतर जिल्हयातील भाविक फलटण तालुक्यातल्या जिंती गावात गर्दी करत असतात या बगाड यात्रेची घेतलेली खास ड्रोन दृश्य
जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
अशातच पहलगामला येथे गेलेले अमरावतीचे 36 ही पर्यटक सुखरूप आहे.
त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला आहे.
गोळीबार होण्याच्या काही मिनिटांआधी 36 पर्यटकांनी काढता पाय घेतल्याने अकरा ही पर्यटक सध्या सुखरूप आहेत.
अमरावतीचे 36 ही पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आणि पहलगाम येथे सुखरूप असून श्रीनगरच्या आणि पहलगामच्या खाजगी हॉटेलमध्ये थांबून असल्याची माहिती आहे.
मंगला बोडके, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचे हे कुटुंब आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्लेत महाराष्ट्र येथील अनेक पर्यटक होते..
त्यातील भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक हे कश्मीर मध्ये असून ते सर्व सुरक्षित आहेत.
जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि आज सायंकाळपासून परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
ते सर्व सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
हल्ला झाल्यामुळे आम्ही घाबरलो आहे आमच्यामुळे सोबत काही मुली आहे काही महिला आहेत.
मला बीपी आणि हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सुखरूपप आम्हाला लवकरात लवकर सरकारने गावी न्यावं..
हॉटेलमध्ये मालकांनी डॉक्टरला बोलवून आमच्यावर उपचार केले आम्हाला सुरक्षित गावला न्याय
कौस्तुभ गंगोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध कात्रज कोंढवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी केला आहे. ज्या पद्धतीने भ्याड हल्ला केला त्याच पद्धतीने पाकिस्तान वरती हल्ला करून योग्य उत्तर देण्यात यावा अशी मागणी शेजाऱ्यांनी केली आहे
लातूरच्या चाकुर तालुक्यातील जानवळ गावात मध्यरात्री अचानक तीन दुकानांना भीषण आग लागली...
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र या आगीत, किराणा दुकान, कापड दुकान आणि एका मोबाईल शॉपीचा समावेश आहे...
दरम्यान या आगीत अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..
आग एवढी भीषण होती की, परिसरात काही काळ भीतीच वातावरण पसरलं होतं....
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही पर्यटकांना आपला जीव मुठीत धरून पहलगाम आणि जम्मू-काश्मीर परिसरात वावरावे लागत आहे.
पंढरपूर आणि पुणे परिसरातील 30 नागरिक पहलगाम मधील जंगलात अडकून पडले आहेत. काश्मीर मधून परतण्यासाठी देखील रस्ते बंद आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ जवळ करण्याची देखील अडचण होत आहे.
अशा परिस्थितीत नागरिक रस्त्यावरच जंगलात अडकून पडलेली दिसतात. अशा प्रवाशांनी आम्हाला काश्मीर मधून बाहेर काढा.
अशी आर्त हाक सरकारकडे करत आहेत.
पंढरपूर येथील प्रमिला शिंदे यांचा समावेश आहे. इतर महिला पुणे येथील असल्याची माहिती आहे.
आम्ही चाळीसगाव वरून 14 लोक परवा पहेलगाम येथे आलो होतो..
काल आम्ही श्रीनगरमध्ये स्टे केला, त्यानंतर आम्ही सोनबर्ग ला गेलो मात्र आमच्या या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही खूप घाबरलो आहोत...
बाहेरची परिस्थिती पाहिली तर बाहेर हाय अलर्ट आहे जागोजागी सैनिक तैनात आहेत
त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे
आम्ही सध्या सुरक्षित आहोत मात्र इथून लवकरात लवकर निघावे असा आमचा प्रयत्न सुरू आहे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आमच्या संपर्कात असल्याची माहिती देवयानी ठाकरे यांनी दिली आहे..
बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला आज बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
त्याची आज पोलीस कोठडी संपत असून बीड न्यायालयात हजर करतात रंजीत कटलेला न्यायालयीन कोठडी मिळते का पुन्हा पोलीस कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे
मात्र त्याच्या विरोधात परळी शहर आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला पुन्हा अटक करून न्यायालयात हजर केले जाऊ शकते.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुण्याहून तळेगावच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली.
या अपघातात चालकासह अन्य एक जण जखमी झाला असून एक कामगार सुखरूप बचावला आहे.
तळेगाव दाभाडे येथे एका खाजगी कंपनीत रात्रपाळी करिता दोन कामगारांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर तळेगावच्या दिशेने जात असताना जुन्या मुंबई पुणे महामार्गावर देहू रोड जवळील जकात नाक्याजवळ हा अपघात झाला आहे.
अपघातातील जखमींना वेळीच आरटीओ अधिकाऱ्यांनी मोलाची मदत मिळाल्याने वाहनात अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा या अपघातात जीव थोडक्यात बचावला आहे.....
पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज येणार परत
हडपसर आणि शिरूर, दौंड तालुक्यातील एकूण 65 रहिवाशी काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये अडकून
आम्हाला पुण्यात घेऊन या पर्यटकांची प्रशासनाकडे मागणी
विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्या आधीच पहेलगाम मधून पडला होता बाहेर
पुण्यातून गेलेली 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल
जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानाने पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईत येणार
काश्मीरच्या पहलगामहून जवळच बॅसरन खोरे पर्यटनस्थळ आहे.
तिथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला.
या पर्यटनस्थळी जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील नेहा तुषार वाघुळदे यांच्यासह मैत्रिणींचा मैत्रिणींचा ग्रुप पर्यटनासाठी गेला होता.
दहशतवादी हल्ल्यानंतर या सर्व पर्यटकांना सैन्य दलाच्या जवानांनी दीड किलोमीटर अंतरावर सुरक्षित स्थळी हलवले आहे,
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन कुटुंब पर्यटनसाठी गेले होते..
त्यातील संजय लेले हे डोंबिवलीच्या सुभाष चौक येथे राहणारे आहेत..
त्यांचे मित्र प्रवीण राहुळ यांना सकाळी पेपरमधून माहिती समजताच संजय लेले हे दहशतवादी हल्ल्यामध्ये गेल्याची माहिती मिळतात त्यांना धक्का बसला..
तुळजापुरच्या घाटात कंटेनरची कारला धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली असुन या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
माञ या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारला धडक दिली त्यानंतर कंटेनर देखील पलटी होवुन कारवर कोसळले.
सोलापुर येथील एक कुटुंब लग्नासाठी तुळजापूरला आले होते लग्न समारंभ उरकून वापस जात असताना हा अपघात झाला
दरम्यान कंटेनरचा चालक दारु पिलेला असल्याने कंटेनर कंट्रोल न झाल्याने हा अपघात झाल्याचे कारचालकांनी सांगितले
सोलापुरात 43.4 ° सेल्सियस तापमानाची झाली नोंद
दिवसेंदिवस तापमान उच्चांकाचे मोठं मोठं गाठत आहे विक्रम
वाढत्या तापमाणामुळे सोलापूरकरांची झाली लाहीलाही
सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाणे परिसरात पोलिसांकडून कारवाई करून ठेवण्यात अलेल्या वाहनांना आग लागली.
यात एका ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी हानी टळली.
ही आग विझविण्यासाठी तीन बंब लागले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तरुण सुशिक्षित बेरोजगार मुलं गुन्हेगारी कडे वळू नये रिकाम्या हाताला काम मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून तीन मे रोजी रोजगार मिळायचा आयोजन करण्यात आला आहे.
अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली
दरम्यान तीन मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत पोलीस मुख्यालय परिसरात रोजगार मिळावा होणार आहे.
या रोजगार मेळाव्यास 25 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या रोजगार मेळाव्यात नोंदणी करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलय.
काश्मीरमध्ये कल पर्यटकांवर दहशतवादांनी भाड हल्ला केला या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला.
यामधील अमोल मोने संजय लेले व हेमंत जोशी हे तिघे डोंबिवलीतील रहिवासी आहेत .
हे तिघेही मावसभाऊ असून सहकुटुंब पर्यटनासाठी ते काश्मीरला गेले होते.
या तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच तिघांचे मित्रपरिवार नातेवाईक काल त्यांच्या घरी आले होते मात्र या तिघांच्या घराला कुलूप होतं.
त्यांच्या मृत्यूची बातमी कळतात मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे या भ्याड हल्ल्याचा शहरातून निषेध नोंदविण्यात येतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.