वाढत्या तापमानामुळे राज्यभर आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशीच एक घटना वाशिमच्या शिरपूर–करंजी मार्गावर घडलीये. शिरपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी मालवाहू वाहनाला अचानक आग लागली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात चोरी करणाऱ्या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी दिला. एप्रिल महिन्यात आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात एका टोळीकडून कॉपर चोरीचा प्रकार घडला होता. चोरीसह या टोळीने तेथील वॉचमनला मारहाण करून डांबून ठेवले होते. या घटनेत पोलिसांनी तपास करून 10 आरोपींपैकी चार आरोपींना अटक केली. ही टोळी असून त्यांच्यावर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल आहेत.
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला केला. अग्निशमन दल आणि पोलीस तसेच एनडीआरएफच पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व येथे कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र केसरी व सहाय्यक पोलिस आयुक्त नरसिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली खासदार केसरी कुस्ती दंगल 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे देशभरातील नामवंत पुरुष आणि महिला पैलवान यांच्या कुस्ती दंगल स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आहे.
या ठिकाणी होणाऱ्या सर्वच कुस्त्या या निकाली कुस्त्या असणार आहेत. मुलांना चांगल्या सवयी चांगले गुण लागावेत अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते मुले व्यसनाधीन होऊ नयेत यासाठी या खासदार केसरी कुस्ती दंगल स्पर्धेचा आयोजन करण्यात आल्याचं खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.
इंस्टाग्राम केलेल्या पोस्ट प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल गुन्हा झालाय. लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे भाष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. रंजीत कासले बीडमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आहेत. फेसबुक व इंस्टाग्राम वर वेगवेगळे व्हिडिओ करून केले होते खळबळजनक दावे.
- सोलापुरातील कुंभारी येथे एसटीच्या लालपरी बसला भीषण आग
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ घडला प्रकार
- ही बस अक्कलकोटहून कुर्डुवाडीच्या दिशेने जात असताना घडला प्रकार
- गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर वाहन चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली
- त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.
- सुदैवाने या गाडीत कोणतीही जीवितहानी नसून आगीवार नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
- स्थानिक नागरिकांकडून बस विझवण्याचे प्रयत्न सुरू
इंस्टाग्राम केलेल्या पोस्ट प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल झाला गुन्हा
लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे भाष्य करताना केले होते आक्षेपारे वक्तव्य
रंजीत कासले बीडमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षक
फेसबुक व इंस्टाग्राम वर वेगवेगळे व्हिडिओ करून केले होते खळबळजनक दावे
पुण्यातील ऊरळी देवाची, आदर्श नगर येथे असलेल्या गोडाऊनला आग
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण
घटनास्थळी जवानांनी तीन एलपीजी, तीन ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टाळला
घटनेत कोणीही जखमी नसून आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अ. भा. समन्वित करडई संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधनात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत देशपातळीवर क्षेत्रवाढीस दोन नव्या करडई वाणांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) व पीबीएनएस १८४ या वाणांना केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
या वाणांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये (झोन-१) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून, पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यातील ऊरळी देवाची, आदर्श नगर येथे असलेल्या गोडाऊनला आग
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण
घटनास्थळी जवानांनी तीन एलपीजी, तीन ऑक्सिजन सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला
घटनेत कोणीही जखमी नसून आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अज्ञातांतर्फे फाडण्यात आल्यानं गावात तणावाचं वातावरण
संतप्त ग्रामस्थांनी गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलंय
पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केलाय
जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरा येथे एका व्यापाऱ्याने उघड्या जागेवर साठवलेला तब्बल 300 क्विंटल मक्याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे
अवकाळी पावसामुळे उघड्यावर ठेवलेल्या मक्याचे पावसात भिजून तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असून मका काळा पडला आहे
जळगावच्या चोपडा तालुक्यात धानोरा येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांचा सुद्धा मोठ नुकसान झाला आहे..
मुंबईतील टँकर चालकांचा संप मागे
मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या बैठकीत निघाला तोडगा
आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर टँकर असोसिएशनचा निर्णय
वॉटर टँकर असोसिएशनने पत्रकार परिषद घेत निर्णय केला जाहीर
आजपासून टँकर चालक कामावर रुजू होणार
धुळे शहरामध्ये आज देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. आज धुळ्यामध्ये ४२.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज एक अंशाने पुन्हा तापमान वाढलं असल्याचं दिसून येत आहे.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पारगाव सुद्रिक परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन केलं जातं. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर द्राक्ष बागातदार गणेश जगताप यांच्या द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झाला आहे.
कोणत्या धर्मादाय रुग्णालयात निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती खाटा (बेड) शिल्लक आहेत याची माहिती धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर दररोज मिळते. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याने पुण्यातील ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी कोणत्या रुग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळत नसल्याने गरजू रुग्णांना सवलतीच्या दरांतील उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.
पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण.
ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता.
राज्य महिला आयोगाकडे सादर होणार अहवाल.
उद्या संध्याकाळी पाच वाजता राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद.
ससून रुग्णालयाच्या अहवालात काय असणार याकडे लक्ष.
याआधी ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात तीन अहवाल राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार,
उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकांकडूनही लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढते. उन्हाचा चटका कमी करण्यासाठी सध्या संत्रा, मोसंबी या फळांची मागणी जोर धरताना दिसते मात्र यातील संत्रांची किंमत सामन्यांच्या कात्री लावणारी आहे. संत्र्याचे उत्पन्न कमी झाल्याने बाजारात आवक वाढून संत्र्यांचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या संत्राना चांगला दर मिळतोय. दुसऱ्या बाजूला, मोसंबी ची विक्री आणि मागणी मात्र जोरात आहे. मोसंबीचे उत्पादन वाढल्याने त्याचे भाव कमी झालेत. मोसंबी किरकोळ भावात ३० रुपये किलो आहेत मात्र दुसऱ्या बाजूला संत्री १०० रुपे प्रति किलोंच्या वर आहे. यंदा फळबागात संत्र्यांचे उत्पादन कमी झाल्याने संत्री बाजारात कमी आल्याने महाग आहेत.
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नित्याचेच झाले आहे. यंदाही काही दिवसांपूर्वी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले असून, पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यात परभणीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक बिंदू चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी देखील बिंदू चौकात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. देशाची लोकशाही जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने चालली पाहिजे असा मंत्र बाबासाहेबांनी दिला आहे तो आपल्याला पुढे चालवायचा आहे. संविधान वाचावं यासाठी जी काही पाऊल उचलावी लागतील ती पुढील काळात उचलावी लागतील. सध्या शासनाकडूनच धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतय. मात्र तसं होऊ नये सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार आपण केला पाहिजे असं छत्रपती खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
सोलापूर शहरामध्ये रात्री 12 वाजल्यापासून हजारो भीम अनुयायांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.हा जनसमुदाय आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपला आहे आपले प्रतिनिधी चेतन लिगाडे यांनी.यावेळी भीम अनुयायांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा देत,नाचून आनंदोत्सव साजरा केला.
टँकर नेण्यापूर्वी नोंदवही मध्ये सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक
पाण्याच्या टँकरचा काळाबाजार वाढला
मेसेज महापालिकेचे पाण्याचे टँकर काही भागात पोहोचत नसल्याच्या तक्रारी
या टँकरवर आता क्षत्रिय कार्यांच्या सहाय्यक आयुक्तांची नजर राहणार
टँकरच्या फेऱ्यांची नोंद असलेल्या नोंद पुस्तकावर संबंधित सहाय्यक आयुक्तांची साही घेणे बंधनकारक
उन्हाच्या जाळ्या वाढल्याने पुणे शहरातील पाण्याचा टँकरला मोठ्या प्रमाणात मागणी
फेब्रुवारीमध्ये 38522 टँकर द्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले तर हाच आकडा मार्च महिन्यात 47 हजार 896 वर पोहोचला
महापालिकेचे मोफत टँकर मागणीच्या ठिकाणी पोहोचत नसल्याचे तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे आज पहाटे श्री हनुमान यात्रा महोत्सव मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय.श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे रथमहोत्सव सोहळा पार पडला पहाटे ५ वाजता हनुमान मंदिरात महाआरती नंतर रथोत्सव सोहळा पार पडला फटाक्यांची आतषबाजी व वाजत गाजत हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते.श्री हनुमान जन्मोत्सव दिवसापासून मंदिर समितीच्या वतीने रथोत्सवाची जोरात तयारी चालू असते या महोत्सवात धाराशिव जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील भाविक देखील सहभागी झाले होते यावेळी मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सलगच्या सुट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे गजबजू लागलेत..सध्या या किना-यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळतेय.ऐन उन्हाळ्यात गारव्यासाठी पर्यटकांची पसंती कोकणाला मिळाल्यानं हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत.समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद , वाँटरस्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेतायत.गेले चार दिवस रत्नागिरीतील दापोली, कर्दे, हर्णे, गुहागर, आरे वारे, गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक पहायला मिळत आहेत.
- नागपूरच्या दीक्षाभूमीवर भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह
- राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३४ वी जयंती
- दीक्षाभुमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी
- आज नागपूरातील दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौकात विविध कार्यक्रम....
सोलापूर शहरातील दूषित पाणी, चेंबरमधील अडथळ्यांचा शोध घेण्यासाठी आज दोन रोबोट महापालिकेत दाखल होणार आहेत. मंगळवारी 15 ते 30 एप्रिल पर्यंत रोबोटच्या कामाची पद्धत जाणून घेऊन त्याच्या कामाची चाचणी होईल. महापालिका कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कामासाठी रोबोट उपयुक्त ठरल्यास महापालिका दोन रोबोट खरेदी करणार आहे..
नाशिक शहरासह जिल्ह्यात तीन दिवसांपासून तापमानात सुरू असलेली घसरण थांबली असून पारा पुन्हा चाळीशीजवळ पोहोचला आहे. पुन्हा कमाल तापमानात जवळपास तीन अंश सेल्सियसने वाढ झाली असून रविवारी ३८.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. तर मंगळवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागांना वर्तवली असून पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी एक प्रेरणा आहे, त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केलं, त्यांनी देशाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे संविधान व या संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केलीय.
सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे.मिरज तालुक्यातील काँग्रेसला,जनसुराज्य शक्ती पक्षाकडून खिंडार पाडण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील सोनी करोली एम येथील आजी-माजी सरपंच,उपसरपंचांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मिरज तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जोरदारपणे पक्ष बांधणी करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी होत असताना ,वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर १४ एप्रिलच्या रात्री १२ वाजता फटाके फोडत केक कापून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायाकडून जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले..यावेळी वाशिमच्या स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक विद्युत रोषणाईसह सुंदर सजावट करण्यात आली. त्यामुळं हा चौक उजळून निघाला होता.
हिंगोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे, राज्य व केंद्र शासनाने हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा या साठी अनेक योजना राबवल्या आहेत मात्र आजही जिल्ह्यातील दीडशे गावे पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी भटकंती करत आहेत औंढा तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा गावात तर सकाळ झाली की महिला पाण्याच्या शोधात डोक्यावर हंडे घेऊन बाहेर पडतात, या गावात जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण होऊन देखील मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचे संकट कायम आहे त्यामुळे आमचा पाणी प्रश्न कधी मिटणार असा सवाल महिला गावकरी प्रशासनाला विचारत आहेत
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे राष्ट्रीय चिन्ह असणाऱ्या अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती आणि त्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. फटाक्यांची आतिषबाजी करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अशोक स्तंभाची भव्य आणि आकर्षक सजावट पाहण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलेय.
उल्हासनगर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते.उल्हासनगर शहरात दरवर्षी १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं. यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात येतात. यावर्षीही हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता जमले होते. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांसाठी चहापाणी तसेच बिस्किटाची सोय करण्यात आली होती. यावेळी उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अवतडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, बहुजन नेते नाना बागुल यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि हजारो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. अंबरनाथ नगरपालिके बाहेरील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते.
अंबरनाथ शहरात दरवर्षी १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं. यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात येतात. यावर्षीही हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता जमले होते. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, तर विविध मंडळं, सामाजिक संस्था यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांसाठी विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेस नेते प्रदीप पाटील, माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, शिवसेनेचे संदीप भराडे, प्रवीण गोसावी, संघजा मेश्राम, धनंजय सुर्वे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि हजारो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
मुरबाड तालुक्यात गारापिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा पिका सह भाजीपाला कडधान्य पिकाचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय.
रविवारी संध्याकाळचा सुमारस मुरबाड तालुक्यातील टोकावडे, सरळगांव या परिसरात गारांसह मुसळधार पाऊस झाला. मुरबाड पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि कडधान्य पीक घेतली जातात. या अवकाळीमुळे पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होतीय. तसंच काढणीला आलेलं आंबा पीकही खराब होण्याची शक्यता आहे. जवळपास एक ते दीड तास गारांचा पाऊस सुरू होता.
बुलढाणा जिल्ह्यातील जलालपुरा येथे खंडोबाचा उत्सव मोठ्या उल्हासात पार पडला. खंडोबा मंदिरात चैत्र पौर्णिमा अर्थातच हनुमान जयंतीला 12 बैलगाड्या ओढण्याची दीडशे वर्ष जुनी पंरपरा आहे. गाडी ओढणाऱ्यांना गडकरी म्हटले जाते. त्यांचे विधिवत पूजन करून खामगाव शहरातून मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी गडकऱ्यांची हळद, माखणी सोहळा मंदिरात पार पडला जातो. बैलगाडी ओढण्यासाठी अठरा गडकरी असतात, सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. श्रध्दा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते. त्यामुळे परिसरातील भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. बारा गाड्या उडण्याची जुनी परंपरा अजूनही भोसले परिवाराने कायम ठेवली आहे.
जालन्यात किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी महेश विजय वाघमारे या तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडाने मारहाण केलीय. जालना शहरातील सौरभ किराणा दुकानात महेश वाघमारे हे किराणा समान घेण्यासाठी आले होते. यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जखमी महेश वाघमारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांनी महेश यांना मारहाण का केली याच कारण अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कदिम जालना पोलीस करीत आहेत.
वर्षभराचं धान्य घरात साठवता यावं, यासाठी मेहनत घेतलेल्या शेतकऱ्यांची स्वप्नं गारपिठीत धुळीस मिळाली. जोरदार गारपिटीने उभं पीक अक्षरशः जमिनीवर लोळलं. उन्हाळी बाजरी मातीमोल झाली या नैसर्गिक आपत्तीनं फक्त शेत नाही, तर शेतकऱ्याचं संपूर्ण जीवनच हादरून गेलं आहे. गारपिटीच्या तडाख्यात १५ शेळ्यांचा मृत्यू झाला या शेळ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार होत्या.हे फक्त अवकाळी पावसाचं संकट नाही, तर शेतकऱ्याच्या नशिबावर दरवर्षीचा कोसळणारं आभाळ आहे. आज पीक गेलं, पशुधन गेलय डोक्यावरच्या छताची दुरवस्था झाली
- नागपुरात अनुभव नसताना मुख्याध्यापक पदी मान्यता देऊन शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयाचा गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तिघांना सदर पोलिसांनी अटक केली.
- हे तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी आहे.
- यामध्ये कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन निलेश मेश्राम, उपनिरीक्षक संजय दुधाळकर, वरिष्ठ लिपिक सुरज नाईक असे अटकेतील लोकांचे नाव आहे.
- एकूण किती आरोपीची संख्या आता पाचवर पोहचली आहे.
- यात लवकरच मुख्याध्यापक पदी नेमण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील ही काही अधिकरी कर्मचारी यांचा या प्रकरणात समावेश असल्याचा अनुषंगानेही कारवाई केली जाईल अशी माहिती पुढे येत आहे.
- यात आतापर्यंत नेमका एकाच प्रकरणाचा खुलासा झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 570 पेक्षा अधिक शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आल्याचा प्रकार 2019 पासून सुरू असल्याची चर्चा आहे.
- त्यामुळे इतरही बनावट कागदपत्रे आधारे झालेल्या नियुक्ती तपास होणार ही एकाच प्रकरणात हे चौकशी चालनार याकडे लक्ष लागले आहे.
- उमरेड तालुक्यातील एमआयडीसी एम एम पी कंपनीतील भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाले... यामध्ये कंपनीतील ३ अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- यामध्ये जनरल मॅनेजर टी. एन. मूर्ती सेफ्टी ऑफिसर रमेश रामचंद्र भाजीपाले, शिफ्ट मॅनेजर अमित शंकराव बचाले असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची नाव असून अद्याप पर्यंत कोणालाही अटक नाही.
- औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे प्राथमिक अहवालात हा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचे समोर आले.
- कंपनीत काम सुरू असताना सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलेले आहे त्यामुळे ही कारवाईकलत उमरेड पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अद्वितीय, अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे. महिला, कामगार, शेतकरी, RBI स्थापनेतील योगदान ते पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळास भेट अशा विविध प्रसंगाचे वर्णन या देखाव्याद्वारे करण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समितीने कलाशिक्षक गणेश गोजरे सर यांना सोबत घेऊन हा देखावा तयार केला असून याची पंचक्रोशीतील नागरिक प्रशंसा करत आहे.
शिवना (ता. सिल्लोड) येथिल ग्रामदैवत आई श्री. शिवाई देवीच्या चैत्री यात्रेनिमित्त रविवारी संध्याकाळी पाचला निघालेल्या वगदी मिरवणुकीवर रेवड्यांची उधळन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. " बोल.. शिवाबाई की जय..! " च्या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीसाठी जवळपास वीस हजारावर भाविकांनी हजेरी लावली. यात माहिला भविकांचाही मोठा सहभाग होता. मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुभाष होळकर, उपाध्यक्ष विठ्ठल काळे, राजधर राऊत, श्रीधर काळे, विलास काळे, माजी उपसभापती अरुण पाटील, रतन राऊत, अनिल जाधव, रमेश जामदार, यांच्यासह सर्वच पदाधिकारी व ग्रामस्थानी सहभाग नोंदवला. अजिंठा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
:धाराशिव जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देण्यासाठी कांद्याची महा बँक व अनुऊर्जेवर आधारित 800 कोटीतुन अन्नप्रक्रियेचा मेगा प्रकल्प उभारणार असुन यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या माध्यमातून 250 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्वसामान्य नागलीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता मिञा च्या माध्यमातून राज्यात विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत.तर आर्थीक कायापालट करणारा हा प्रकल्प मिञा च्या माध्यमातून जिल्ह्यात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती मिञा चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषदेत दिली आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देश भरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. नांदेड मध्ये देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मध्ये रात्री पासूनच नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनु्यांनची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. दरम्यान आज दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळणार आहे. दिवसभर जिल्हा भरात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.शहरातील विविध भागातून मिरवणूका निघणार आहेत.दरम्यान जयंती निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानानं, स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आणि विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.