- थोड्याच वेळात हॅाटेल रिट्झ कार्लटन येथे आगमन होणार
- रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह देखील आज रात्री पुण्यात असणार
- सकाळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित रायगडला जाणार
- MMP केमीकल कंपनीत भीषण आग लागल्याची माहिती
- कंपनीत काही कामगार अडकले असण्याची शक्यता
- अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
- आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही...
- आजूबाजूचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
चेंबूर गोळीबार प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारा अफसर खानला धारावीतून अटक
चेंबूर zone ६ च्या पथकाने अटक केली.
नवी मुंबई डेव्हलपर गोळीबार केला होता.
अहमदाबादमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. आग लागल्यनंतर लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या.
जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी परभणीत अत्याधुनिक अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
आर्य पंप्स कंपनीने तयार केलेली ही मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहने आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नाशिकच्या मालेगावमधील तापमानात काही अंशी घट होत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी 43.2 अंशावर पोहचलेला उन्हाचा पारा काल 42.8 वर आला, तर आज त्यात आणखी घट झाली आहे. आज पारा 42.2 अंशावर स्थिरावला..
८ एप्रिल रोजी, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याला वाळलेल्या झाडीमुळे आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे भीषण आग लागली. संरक्षित राष्ट्रीय स्मारक असूनही, त्यात अग्निसुरक्षा उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांचा अभाव होता. ही दुर्घटना एक धोक्याची घंटा आहे. याबाबत तातडीने आवश्यक पावले उचलावेत अशी मागणी केलीय.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती.तहसीलदार जीवन बनसोडे अध्यक्षस्थानी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांबळे सचिव म्हणून उपस्थित होत्या. सभा पार पडली या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेल्यानंतर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला. या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळाले. आता याप्रकरणी भिगवण पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात
- नाशिक जिल्हा बँक आणि आगामी कुंभमेळ्यासंदर्भात कोकाटे घेणार आढावा
- गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत
- याच अडचणीतून जिल्हा बँकेला बाहेर काढण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न
- याच संदर्भात माणिकराव कोकाटे देखील आज घेणार आढावा बैठक
- विशेष म्हणजे बेकायदेशीर कर्ज वाटप संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील सहकार विभागाकडून कारवाईची टांगती तलवार
- त्यामुळे जिल्हा बँकेसंदर्भात आज काय निर्णय होतो? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
धुळ्यात तापमानाचा पारा कालच्या तुलनेत पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे, आज धुळ्यात 42 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काल एक अंशाने तापमान कमी नोंदविल्या गेले होते त्यामुळे धुळेकरांना दिलासा मिळाला होता, परंतु आज पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुळ्यात 40° पेक्षा जास्तीचे तापमान सतत नोंदविले जात आहे त्यामुळे धुळेकरांना तापमान वाढीचे चटके सहन करावा लागत आहेत.
पुण्यातील व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकी.
व्यावसायिकाकडे पाकिस्तानातून मागितली ५ कोटी रुपयांची खंडणी.
पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बोट क्लब रोड परिसरातील व्यावसायिकाला पाकिस्तानमधून व्हॉट्सॲप मेसेज.
३७ वर्षीय व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अनोळखी आणि अज्ञात मोबाईल धारकांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महायुती सरकारने निवडणुकी अगोदर दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, रब्बी व खरीप हंगामातील शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा, सोयाबीन कापूस सह इतर पीक हे हमी भावाने खरेदी करावे, यासह विविध मागण्या घेऊन आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कर्जमाफीची वारी, महायुती सरकारच्या दारी , याप्रकारे अनोखं आंदोलन केले. लोणार तहसील कार्यालय वर वारकऱ्यांच्या वेषात शेतकरी यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला दिले. येत्या १५ दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुंबई ते नागपूर महामार्गावर रस्ता रोखा आंदोलन करु, असा इशारा दिलाय.
14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती असून, त्याआधी हे नॉलेज सेंटर जनतेसाठी खुलं होणार आहे.
या केंद्रात डॉ. आंबेडकर यांचे साहित्य, जीवनकार्य, संविधान रचना, आणि सामाजिक योगदान यावर आधारित माहिती व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन, आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.
यावेळी वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था यावर चर्चा करत नियोजनात्मक बैठक घेण्यात आली.
हे नॉलेज सेंटर केवळ माहितीचा स्रोत न राहता, समानता, शिक्षण, आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास केडीएमसी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने एक एप्रिल पासून पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ केली आहे, तसेच नळ जोडणी अनामत रक्कमेत सुद्धा वाढ करण्यात आल्याने या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या उल्हासनगर शाखेतर्फे महानगरपालिका आयुक्तांनी पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, येथील जिजामाता चौकात स्थानिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेस चांगला प्रतिसाद देत आहेत, पाणीपट्टी बिल दरातील वाढ कमी करण्यात नाही आल्यास शहरभर तीव्र आंदोलन केलं जाईल , असा इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांनी यावेळी दिला.
उद्या शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने आज सोलापुर शहर आणि ग्रामीण कर यांचा भरवण्यात आला आहे मेळावा.
या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील आणि आणि शशिकांत शिंदे यांची आहे मुख्य उपस्थिती
दरम्यान मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख हे भर सभेतून गेले निघून
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मनमाणी कारभारामुळेच पक्षाची ताकद कमी झाल्याचा आरोप तौफिक शेख यांनी केला आहे
त्यामुळे येत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा सुद्धा कार्याध्यक्षांनी दिला आहे
दरम्यान उद्या शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय टाकणार असल्याचंही, त्यांनी स्पष्ट केलं आहे
अंबरनाथवरून सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते.
ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला.
मात्र लोकल वेगात असल्याने त्याला लोकलमध्ये चढता आलं नाही आणि तो घसरून थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये जाऊन पडला आणि त्याच्यावरून २ ते ३ डबे पुढे गेले.
या अपघातात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून आरपीएफने त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे.
मात्र जागा पकडण्यासाठी प्रवासी करत असलेली घाई कशी जीवावर बेतू शकते, हे या निमित्ताने पुढे आलं आहे.
3 वाजताची नियमित विमानाने रवाना
काही वेळात विमान रवाना होईल.
पहिली मध्ये असताना आईला पाहिलं होतं कोर्टाला सिद्दीने दिले उत्तर
मी आभारी आहे की कोर्टाची
मी आधीच एका पालकाला गमवाल आहे आणि दुसरा तिला न्याय मिळवण्यासाठी लढत होता त्यामुळे त्यांना शिक्षा मिळणे गरजे आहे
त्यांना सोडू नका त्यांना फाशी द्या त्यांनी माझ्या आईला मारलं आहे
पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सुपूर्द
मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडून आज या अहवालाची दखल घेतली जाणार
माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मदाय आयुक्तालय आणि राज्याच्या आरोग्य समिती या तिन्ही समित्यांचे अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द
सगळ्या अहवालांचे काय निष्कर्ष आले आहेत हे तपासून पुढील कारवाईची दिशा ठरणार
पुणे जिल्हा रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार कारवाईचे काय आदेश देते हे पाहणे महत्वाचे
याआधी ८ एप्रिल रोजी धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे
नागोठोड परिसरात स्थित असलेल्या मिरची बाजाराला मोठ्या आग लागली आहे...
आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धोक्याचे लोट पसरले आहे.....
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणच मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
मिरची बाजाराच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे....
प्रशांत कोरटकर जामिनावर बाहेर
कोरटकरांची कळंबा कारागृहातून सुटका
राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये (एनएचएम) निधीचा ठणठणात असल्याने अमरावती विभागातील सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुमारे २ हजार आशा वर्कर्स आणि एक हजार डॉक्टर्स, नर्स तसेच इतर कर्मचारी जिल्हाभरात कार्यरत आहेत. या सर्वांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या यंत्रणेत डॉक्टर्स, नर्स, समुपदेशक, वार्ड बॉय, आशा वर्कर्स अशी असंख्य पदे आहेत.अमरावती जिल्हाभरात आशा वर्कर्सचेच जाळे २ हजारावर पोचले आहे. याशिवाय डॉक्टर्स ते वाडबॉय अशी एक हजारची चमू आहे. या सर्वांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाविना काम करावे लागत आहे,मार्च संपून एप्रिलचे दहा दिवस लोटले तरी पगार करण्यात आला नाही
नवी मुंबई - अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांना फाशी की जन्मठेप यासंदर्भातील युक्तिवाद आज पनवेल कोर्टात होणार आहे.
यासोबतच मृत अश्विनी बिंद्रे हिच्या कुटुंबियांची बाजू देखील आज कोर्ट जाणून घेणार आहेत.
वकिलांचा युक्तिवाद आणि कुटुंबियांची बाजू जाणून घेतल्यानंतर आज पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार.
महात्मा फुले वाड्यात येऊन उदयनराजे असे बोलत असतील तर ते चुकीचे आहे. खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न उदयनराजे यांच्या कडुन गोऊ नये. अन्यथा कोण होतास तु काय झालास तु… असे म्हणावे लागेलहर्षवर्धन सपकाळ
धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत कुळथे आणि हरणमाळ परिसरात धाड टाकून तीन अवैध दारू हात भट्ट्या उद्ध्वस्त केल्या, पोलीस उप-अधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून, यात जवळपास एक लाख रुपये किमतीचा दारू, रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले,
वर्षभरापूर्वी ड्रग्ज बाबत माहिती मिळूनही कारवाई झाली नाही, खासदार ओमराजे निंबाळकर यांचा दावा
माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातलं नसत,वर्षभरापूर्वीच हातोडा घातला असता
पिटू गंगणे कोणत्या पक्षाचा कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पहा
धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नाव न घेता भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाना..?
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील कोर्ट रोड परिसरात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे, या कार्यक्रमात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते असलेल्या ज्योतिबा फुले यांच्या कार्याला या निमित्ताने उजाळा देण्यात आला,
कोल्हापूर मधील कळंबा कारागृह बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला मिळणार पोलीस संरक्षण
पोलीस संरक्षणात कोरटकर ला जिल्हा बाहेर सोडले जाणार
जुना राजवाडा पोलिसांनी अर्जावर दिली सहमती
अत्यंत गोपनीय पद्धतीने कोरटकर हलविण्याच्या हालचाली
दोन वेळा कोरटकर वर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
प्रशांत कोरटकर कडून न्यायालयाकडे सुरक्षेची केली होती मागणी
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आणि त्याच्या दोन साथीदारांना चार लाखांच्या लाच प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली. राज्य शासनाची जल जीवन मिशन ही योजना जिल्हा परिषदेमार्फत चालवली जाते. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती या दोन तालुक्यात 23 गावांमध्ये कामे करण्यात आली. या कामांचे बिल काढण्यासाठी अभियंता हर्ष बोहरे याने कंत्राटदाराला चार लाखांची मागणी केली, तर त्याचा वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार याने वीस हजार रुपये मागितले. या प्रकाराची तक्रार संबंधित कंत्राटदाराने एसीबीकडे केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. चार लाख वीस हजार रुपयांची ही रक्कम सुशील गुंडावार याने स्वीकारली. त्यातील चार लाख रुपये मतीन शेख नामक व्यक्तीच्या हाताने कार्यकारी अभियंता बोहरे याच्या घरी पाठवली. तिथे ACB पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी अभियंता बोहरे, वरिष्ठ सहायक गुंडावार आणि पैसे घरी पोचवणारा मतीन शेख या तिघांनाही अटक करण्यात आली.
कॉन्ट्रॅक्ट चे बेस्ट बस चालकांना वेळेवर पगार नाही आणि पगारात कापून पैसे दिले जात असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट चे बस चालक आज सकाळपासून संपावर आहेत.
गोराई बेस्ट बस डेपो बाहेर कॉन्ट्रॅक्ट चे बेस्ट बस चालक मोठा संख्या मध्ये एकत्र जमा होऊन निदर्शन करत आहेत.
या बस चालकांचा पीएफ कापून सुद्धा त्यांचा अकाउंट मध्ये जमा केला जात नसल्याचा चालकांचा आरोप आहे.
जोपर्यंत त्यांचा मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गोराई बस डेपो बाहेर चालक संपावर बसणार आहेत.
बेस्ट बस चालकांचा या संपामुळे बोरिवली पश्चिम,गोराई परिसर,दहिसर,कांदिवली या सर्व परिसरामध्ये बेस्ट बस मधून प्रवास करणारे प्रवाशांच्या मोठा हाल होत आहे.
प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता करायला सुरुवात
न्यायालयाने दिलेली जामिनाची ऑर्डर, जात मुचलक्याचे पैसे भरलेली कागदपत्रे, पोलिस संरक्षण मिळण्यासाठी चा अर्ज यासह अन्य कागदपत्र काही वेळात न्यायालयासमोर ठेवली जाणार
तासा भरात जिल्हा सत्र न्यायालयातून प्रशांत कोरडकर च्या जामीनाची कागदपत्रे पूर्तता पूर्ण होणार
जामिनाची ऑर्डर घेऊन कोरटकरचे सहाय्यक वकील जेल प्रशासनाकडे जाण्याची शक्यता
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तपास अधिकारी गळवे देखील उपस्थित
समृद्धी महामार्गावरचा वेग पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे.जामवाडी शिवारात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झालाय.नाशिकहून नागपूरकडे निघालेल्या आयशरने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आयशरचा चालक जागीच ठार झाला. तर ट्रकमधील एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोठ मोठ्या योजनांचा बोभाटा करून जनतेची मते मिळणाऱ्या महायुती सरकारला निवडणुकीनंतर मात्र समाजातल्या सगळ्याच घटकांचा सपशेल विसर पडलेला आहे. आधी लाडक्या बहिणींना सांगितले आम्ही 2100 रु. देऊ शकत नाही. नंतर शेतकरी बांधवांना सांगितले आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार मिळालेला आहे तोही आता आणि तो सुद्धा 56 टक्के. 44 टक्के पगारामध्ये कपात करण्यात आलेली आहे. हे 44 टक्के कधी मिळतील हेही सांगितलेलं नाही.
नांदेडच्या माहूरगड येथील रेणुका मातेचे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दर्शन घेतले.अंबादास दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी दानवे यांनी नांदेडच्या माहूर येथील साडेतीन शक्ती पिठापैकी पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. दानवे यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन मातेचे आरती केली. यावेळी त्यांच्या सोबत उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुळजापुरात 15 ते 20 पेडलरच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती
तुळजापुरातील काही खास हॉटेलमधून या ड्रग्जची विक्री व्हायची
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी विरोधात गुन्हा दाखल
ड्रग्ज प्रकरणातील 35 आरोपींपैकी 14 आरोपी अटक, तर अजूनही 21 आरोपी फरार
खून झालेल्या मुलीचे नाव संस्कृती रामचंद्र जाधव
घटनास्थळी रात्रभर पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध सुरू होता
सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू- पाटील, उप पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाच्या श्वान पथकाने रात्रभर शोध सुरू होता
पहाटे पाच वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला
कराड तालुक्यातील वाठार- रेठरे मार्गावरील घटना
यवतमाळ तहसील कार्यालयातील रजिस्टर मध्ये जन्माची नोंद करण्यासाठी चक्का शाळा सोडल्याच्या दाखल्यात खोडतोड केली ही बाब उघडकिस येतात निवासी तहसीलदार संजय गोरलेवार यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलिसांनी वाल्मीकराव महादेवराव मेंढेकार राहणार राधाकृष्णनगरी लोहारा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाल्मीक राव मेंढेकर यांचा 20 जुलै 1963 मध्ये लोहारा येथील त्यांच्या रायत्या घरी जन्म झाला होता मात्र यवतमाळ तहसील कार्यालयातील जन्ममृत्यू रजिस्टर मध्ये त्यांची नोंद होती जन्माची नोंद करण्याकरिता वाल्मीक राव मेंढेकर यांनी 31 सप्टेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला या अर्जासोबत त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता
त्यांच्या संपूर्ण कागदपत्राची तपासणी तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. तेव्हा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खोडतोड केल्याचे स्पष्ट दिसून आले
या दाखल्याबाबत तहसील प्रसादनाच्या वतीने पुन्हा चौकशी केली असता तो दाखला खोटा असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून ही बाब तहसीलदार योगेश देशमुख यांच्या लक्षात आणून दिली
दरम्यान खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यानुसार निवासी तहसीलदार संजय गोरलेवार यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून वाल्मीकराव मेंडकार यांच्या विरोधात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता झालीय. बालाजी उत्सवादरम्यान गावात विविध धार्मिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
गावामध्ये महादेवाची स्वारी आणि देवीच्या स्वारीमुळे उत्साहाचं वातावरणपाहायला मिळालं. बालाजी उत्सवासाठी बाहेरगावी नोकरीसाठी आणि व्यवसायानिमित्त गेलेले ग्रामस्थ आणि सासरी गेलेल्या लेकीबाळी देखील या उत्सवामध्ये आवर्जून सहभागी होतात. दरम्यान पारध येथील बालाजी महोत्सवाची सांगता आज पहाटे देवीच्या स्वारीने करण्यात आलीय.
चंद्रपुरातील तापमानात वाढ झाल्याने चौकाचौकातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी तीन तास बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतलाय. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या चंद्रपूरचे तापमान 43 अंशाच्या वर आहे. लाहीलाही करणारी ही ऊन ट्रॅफिक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांना चटके देणारी ठरते. यापासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी दुपारी तीन तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी एक ते चार वाजेदरम्यान शहरातील सिग्नल आता बंद ठेवले जाणार आहेत. चंद्रपुरात मागील आठवड्यात सर्वाधिक 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे नागरिक वाढत्या उष्णतेमूळ त्रस्त झाले आहेत. मात्र या उन्हाच्या तडाख्यापासून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा, यासाठी घेतलेला हा निर्णय वाहनचालकांना दिलासा देणारा आहे. पण ही सूट दिल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी वाहतूक पोलीस मात्र तैनात असणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी माहिती दिली.
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज घेणार सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक
- पहिल्यांदाच कृषिमंत्री कोकाटे घेणार आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक
- आत्तापर्यंत कुंभमेळा मंदिर गिरीश महाजन यांनीच घेतल्या आहेत कुंभमेळा तयारीच्या आढावा बैठका
- नाशिकच्या विभागीय कार्यालयात होणार आढावा बैठक
- तसेच जिल्हा बँक संदर्भात देखील कोकाटे आज घेणार आढावा
- गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बँक आहे आर्थिक अडचणीत
- याच संदर्भात आज कोकाटे घेणार आढावा, जिल्हा बँकेच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष सह पाच नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आ भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदे च्या हस्ते केला प्रवेश
नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी सह 5 नगरसेवक शिंदे गटात
“क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक्तीसाठी शिक्षणाची दारं खुली केली. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ठ रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली. आज दिसणारी सामाजिक न्यायाबाबतची जागरुकता, महिलांचा सर्वक्षेत्रातील आत्मविश्वासपूर्ण वावर, देशात निर्माण झालेली प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, केलेला त्याग आणि घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.
सेन्सर बोर्डमध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होणार आहे का याची शहानिशा केली जाते. संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे, लोकं काही बोलतात. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही.अजित पवार
शेतामध्ये भटकंती करत असलेल्या बिबट मादीचा व्हिडिओ स्थानिक शेतकऱ्याने मोबाईलमध्ये टिपला असून, तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या बिबट मादीने नुकतेच बछड्यांना जन्म दिला असून, भुकेलेल्या अवस्थेत ती शिकारीच्या शोधात शेतांमध्ये मुक्तपणे संचार करत आहे. अशा काळात बिबट मादी अत्यंत आक्रमक आणि हिंसक होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
ज्योतिबा फुले जयंती निमित्त मी शुभेच्छा देतो. या महापुरुषांच्या आदर्शन पुढे वाटचाल करायची आहे. जातीय सलोखा वाढणार आहे.महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने हे आवाहन मी करेल.अजित पवार
स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने मध्यरात्री बारा वाजता ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.यावेळी फुले यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महात्मा फुले आज जयंती साजरी होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखिल आयोजन करण्यात आले आहे.
- 37 जणांची 81 लाख रुपयांची फसवणूक
- सायबर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
- लोकांना गुंतवणुकीसाठी गोड बोलून आकर्षित केलं
- बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचे आमिष
- सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; सखोल तपास सुरू
- लोकांकडून पैसे उकळल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद केले
- फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदार फसवणुकीचे बळी
- आरोपींनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांशी संपर्क साधला
- महिलांनीही विश्वास संपादन करून फसवणुकीस हातभार लावला
- पोलिसांनी आर्थिक फसवणूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला
- गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
वर्धा जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्यचा त्यांच्या परिवारासह तरोडा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. यां घटनेत प्रशांत त्याची पत्नी, त्याचा मुलगा व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातं आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रशांत वैद्य यांच्या घरी जात कुटुंबीयांचे सांत्वन केले.पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये आता दोन दिवस ६०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी आणि शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मंदिर परिसर आणि संपूर्ण खुलताबादमध्ये ६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शिवाय,खुलताबादच्या दिशेने मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांना शनिवारी मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आहे. राजकीय नेत्यांकडून यावरून वादग्रस्त वक्तव्य झाले. नागपूरमध्ये तणाव निर्माण झाल्याने यंदाच्या हनुमान जयंतीला पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हनुमान जयंतीला दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नुकताच बंदोबस्ताचा आढावा घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी असतील.त्यांच्या नेतृत्वात २ पोलिस निरीक्षक, १७ सहायक निरीक्षक,उपनिरीक्षक, १६८ पोलिस अंमलदार, एक दंगा काबू पथक,जवळपास १०० पेक्षा अधिक एसआरपीएफचे सशस्त्र जवान, ३९८ होमगार्ड ४८ तास तैनात असतील.
RTO कडून पुणे शहरात गेल्या एका वर्षात ६६,६५३ बेशिस्त वाहनांवर कारवाई
पुणे शहरात आरटीओ'ने गेल्या वर्षभरात विनाहेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, मार्गिका बदल, परवानगी नसलेल्या ठिकाणी वाहन उभे करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, ट्रिपल सीट, आकर्षक वाहन क्रमाकांची पाटी वापरणाऱ्यांवर कारवाई केली आहे
आरटीओ कडून गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा दंड वसुल
आरटीओने वर्षभरात केलेली कारवाई
विनाहेल्मेट वाहन चालविणे – १९,६४५
अतिवेगाने वाहन चालविणे – १३,८१७
विम्याची मुदत संपलेली वाहने – ८,७४४
वाहनांचे दिवे बंद असणे – ५,७२९
आकर्षक वाहन क्रमांकाची पाटी – ३,५८०
मार्गिका बदल – २,३०४
वाहन चालविताना मोबाइलचा वापर – २,२४३
आसन पट्टा न वापरणे – ५,०८७
नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे – १,७७७
ट्रिपल सीट – १,४३५
पुण्यातील फुले वाड्यात साजरी होणार महात्मा फुले यांची जयंती
जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज फुले वाड्यातील समता भूमीला करणार अभिवादन
महात्मा फुले वाड्याला आकर्षक सजावट
तर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज १० हजार किलो मिसळच करण्यात येणार वाटप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आज फुले वाड्यात येऊन करणार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
छगन भुजबळ यांच्या हस्ते आज फुले वाड्यात महात्मा फुले समग्र वांग्मय या ग्रंथाचे देखील होणार प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी अटी- शर्थ घालून जामीन दिला. आज कोरटकरला कळंबा कारागृहातून सोडण्यात येणार आहे. शिवप्रेमी संतप्त असल्यामुळे पोलीस कोणत्याही क्षणी त्याला कोल्हापूरच्या बाहेर सोडतील. मात्र कोल्हापूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेत जुना आयरे रोड येथे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याच्या कामाच्या खोदकामादरम्यान केडीएमसीची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने उंचच उंच फवारे उडाल्याचे पाहायला मिळाले . तब्बल दोन तास हे फवारे उडत होते त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी प्रणव केने यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना माहिती देताच या पाईपलाईन वरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला . मात्र रस्त्याचे खोदकाम सुरू असताना संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार त्या ठिकाणी उपस्थित का नसतात असां सवाल करत ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाईप लाईन फुटली असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी केणे यांनी केला
उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि भन्तेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
सुभाष टेकडी परिसरात बौद्ध समाजबांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामुळं या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळं आमदार बालाजी किणीकर यांनी याचा पाठपुरावा करत पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणला आणि हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही दिवसांवर आलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी हजारो भीम अनुयायांनी उत्साहपूर्ण जल्लोष केला. येत्या १३ एप्रिल रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिलान्यास सोहळा पार पाडणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
महाड तालुक्यातील मांडले येथे धरण प्रकल्प होत आहे. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमात मार्ग दर्शन करताना जमिन विकू नका असे अवाहन मंत्री भरत गोगावले येथील शेतकऱ्यांना केले. नोकरीला जे मिळणार आहेत, त्याच्या डबल टिबल पैसे तुमच्याच शेतात कसे मिळवुन द्यायचे हि माझी जबाबदारी असल्याचे अश्वासक शब्द देखील गोगावले यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. शेतकरी शेती विकून नोकरीकडे वळत असल्याने गोगावले यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 47 गावे आणि 33 आदिवासी वाडयांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्याने तळ गाठलाय. धरणात जेमतेम 20 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यावर दोन महिने पाणी पुरवठा कसा करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतेय. धरणातील गाळ काढला जात नाही आणि पाणी वापरांवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे ही समस्या उद्भवते आहे. यावर स्थानकानी नाराजी व्यक्त केलीय. गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावं अशी मागणी होत आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने एक एप्रिल पासून पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ केली आहे, तसेच नळ जोडणी अनामत रक्कमेत सुद्धा वाढ करण्यात आल्याने या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा गड उल्हासनगर शाखेतर्फे महानगरपालिका आयुक्तांनी पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, येथील जिजामाता चौकात स्थानिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेस चांगला प्रतिसाद दिला, इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे छत्तीशे रुपयावरून आठ हजार रुपये, पत्र्याच्या किंवा कौलारू घरात राहणाऱ्या नागरिकांचे अठराशे रुपयावरून साडेसहा हजार रुपये तर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे बाराशे रुपयावरून तीन हजार रुपये, इतकी पाणीपट्टी बिलात दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, स्वाक्षरी करण्यात आलेले निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात येणार असून त्यानंतर पाणीपट्टी बिल दरातील वाढ कमी करण्यात नाही आल्यास शहरभर तीव्र आंदोलन केलं जाईल , असा मत मनसे राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांनी यावेळी व्यक्त केला
यवतमाळ ते नाकापार्डी एसटीबस मधील प्रवाशाने खर्रा खाऊन थुंकल्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी मिळून त्या तरुणास चांगला चोप दिला ही घटना वडगाव परिसरात घडली. याप्रकरणी घनश्याम मारुती मोकाशे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी तिंघा विरोधात गुन्हा दाखल केलाय.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर असून ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शालेय शिक्षण विभाग संबंधित आढावा बैठक घेणार आहेत या सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील करणार आहेत त्यातच नव्याने निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा जाहीर नागरिक सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची पदोन्नती व बदली करण्यात आली असून यात पदोन्नतीवर यवतमाळ जिल्ह्याला पाच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्राप्त झाले आहेत. आता एकूण वरिष्ठस्तर न्यायाधीशांची संख्या 18 झाली असून पूर्वी जिल्ह्याला तेरा न्यायाधीश कार्यरत होत. जिल्ह्यात पूर्वी कार्यरत असलेल्या 42 कनिष्ठस्तर दिवाणी न्यायधीशांपैकी सहा जणांची पदोन्नतीवर बदली झाली यामुळे येथील कनिष्ठस्तर न्यायधीशांची संख्या ही 36 इतकी झाली आहे.
जळगावजामोद शहरातील अतिक्रम काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे नगर परिषद च्या वतीने रस्त्यावरील वाढते अतिक्रम पाहता वाहन धारक व नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्याने नगर पालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या आधारे सर्वांना नोटीसी बजावण्यात आल्या होत्या आता अतिक्रमन काढण्यात येत आहे मात्र गोर गरिबांचे अतिक्रमन काढण्यात येत असल्याने रोष वाढला आहे.. धन दांडग्या व राजकीय लोकांचे अतिक्रमन काढण्यात येत नसल्याने सामान्यांनी रोश व्यक्त केला आहे ,सर्वासाठी नियम एकच लागू करून सर्वांचे अतिक्रमान काढण्याची मागणी नगर परिषदेकडे करण्यात आली आहे..
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील खडका गावातील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात गावातील महिलांनी एकत्र येत तीर्थपुरी पोलिसांना निवेदन देखील दिल आहे.गावात मोठ्या प्रमाणात देशी दारू विक्री सुरू असून व्यसनामुळे अनेकांचे आरोग्य बिघडत आहे तर गावामध्ये घरगुती हिंसाचारात देखील वाढ झाली आहे.त्यामुळं पोलिसांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण ओळख असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सव 12 ते 17 एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे.या याञेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम 13 एप्रिल रोजी पार पडणार असुन यासाठी राज्यभरातुन 15 लाखांहून अधिक भाविक येत असतात.यावेळी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तर प्रशासन,ट्रस्ट यांच्या वतीने याञा उत्सवाची देखील जय्यत तयारी केली आहे.याञेच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाची टिम,ठिकठिकाणी याञा शेड,पाण्यासाठी ट्रॅक्टर,वीजपुरवठा, तगडा पोलीस बंदोबस्त,यासह 85 सिसिटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.तसेच भाविकांच्या सेवेसाठी परीवहन विभागाच्या वतीने याञा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या 200 तर लातुर व बीड येथील 150 बसेसची सोय करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी निश्चित झाल्यानंतर आज पनवेल सत्र न्यायालयात या आरोपीना शिक्षा जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे 11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्याकांडातील आरोपीना 11 एप्रिल रोजीच शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे सात वर्षे या हत्याकांडाचा खटला सुरु होता. ठोस पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना दोषी ठरवले असून राजू पाटील याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती. आज पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार आरोपीना शिक्षा जाहीर करणार असून आरोपीना नेमकी काय शिक्षा होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय.
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे तर अजूनही साठ हजार शेतकरी या नोंदणी प्रक्रियेच्या बाहेर आहेत त्यामुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या पीएम किसान योजनेला मुकण्याचा धोका वाढला आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवेचा वापर करून शेतकऱ्यांना जलद गतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडी चा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सेवा, शेतकरी योजनेचा लाभ पारदर्शकतेने मिळणार आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली आहे. येत्या 11 मे पर्यंत सरकारने राज्यातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा, मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली आहे.
पंढरपुरात छावा क्रांतीवीर सेना पदाधिकार्यांची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कर्जमाफीसाठी सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. छावा क्रांतीवीर सेनेचे पंढरपुरात 11 मे रोजी राष्ट्रीय महाधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या तयारीचा आढावा ही या बैठकीत घेण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे तर अजूनही साठ हजार शेतकरी या नोंदणी प्रक्रियेच्या बाहेर आहेत त्यामुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या पीएम किसान योजनेला मुकण्याचा धोका वाढला आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवेचा वापर करून शेतकऱ्यांना जलद गतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडी चा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सेवा, शेतकरी योजनेचा लाभ पारदर्शकतेने मिळणार आहे.
- पहिली ते नववीच्या परीक्षा लवकर घेण्याबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अद्याव प्रतिसाद नाही...
- न्यायालयाच्या निर्देशानंतरही भर उन्हाळ्यात परीक्षा घेण्यावर परिषद ठाम आहे का? पालकांचा सवाल
- विदर्भात उष्णतेचा पारा 42° पर्यंत गेला असताना देखील विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असंवेदनशील
- भर उन्हात पाल्यांची परीक्षा होणार असल्याने पालकांमध्ये संताप,
- नागपूर चंद्रपूर मार्गावरील बुट्टीबोरी उड्डानपुल दुरुस्तीचं काम रखडलं, नागरिकांना होतो वाहतुकीस अडथळा, रोज वाहनाचा रांगा
- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एक उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तब्बल 3 महिन्यांहून अधिक काळ लागत असल्याचा नागरिकांचा संताप
- नागपूर ते चंद्रपूर, वर्धा आणि हैदराबादला जोडणाऱ्या अत्यंत व्यस्त बुटीबोरी उड्डाणपूलवर २४ डिसेंबर २०२४ पासून वाहतूक बंद
- आता तर या पुलाचीा दुरुस्ती चक्क जुलैपर्यंत लाबण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे....
- नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपूल साडेतीन वर्षांतच खचल्याने ‘एनएचएआय’वर टीका
- व्हीएनआयटीकडून तपासणीनंतर पुलाच्या डागडुजीचे अतिशय संथगतीने काम सुरू
- आधी दुरुस्तीचे काम ९ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ते पूर्ण करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
- नाशिकच्या मुंबई नाक्यावरील महात्मा फुले आणि सावितीबाई फुलेंच्या स्मारकाला आकर्षक सजावट
- स्मारकाच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
- रात्री समीर भुजबळांकडून महात्मा फुले आणि सावितीबाई फुलेंना अभिवादन
- आज संध्याकाळी छगन भुजबळांच्या उपस्थितीत मिरवणूक
- पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जातांना एकाने व्हिडीओ काढत पोलीस कर्मचाऱ्यास हेल्मेट का घातले नाही असा प्रश्न विचारला?
- मात्र पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्हिडीओ काढणाऱ्याचा कानशिलात लगावल्याचं संभाषण रेकॉर्ड
- नागपुरातील जरीपटका ते मानकापूर भागातून जातांनाचा हा व्हिडीओ झाला व्हायरल
- पोलीस कर्मचाऱ्यांला नियमांची आठवण करून दिल्यानं राग अनावर झाल्याचं प्रकार आला समोर,
- मात्र दात दुखत असल्यानं हेल्मेट न घातल्याच पोलीस कर्मचाऱ्यांन सांगितलं,
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर सातारा जिल्ह्यात पुन्हा सक्षम विरोधक म्हणून काँग्रेसला उभारी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदाची खांदेपालट होणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. सध्या तरी जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत रणजीतसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, अजित पाटील चिखलीकर अशा निष्ठावांतांपैकी एखाद्याला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. काँग्रेसची धुरा सांभाळून जिल्ह्यात पक्षाची सक्षम बांधणी करणारा व प्रसंगी आर्थिक झळ सोसणाऱ्या निष्ठावंतला जबाबदारी दिली जाणार का ?याबाबतची उत्सुकता आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेतली जाणार आहे. या माध्यमातून विद्यापीठाचा मुख्य परिसर, उपपरिसरासह महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही विद्यापीठ मुख्य परिसर, धाराशिव उपपरिसरासह संलग्नित सर्व महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे. पुढील महिन्यात परीक्षेचे स्वरूप करणार निश्चित करण्यात येणार आहे. विद्यापीठात ४५ तर उपपरिसरात ११ विभाग आहेत. त्यात विद्यापीठ कॅम्पस व उपपरिसरात १३ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहेत. विविध विभागांमध्ये २ हजार ८०० प्रवेश क्षमता आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ४ जिल्ह्यांत १५२ महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. महाविद्यालयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास ३२ हजार प्रवेश क्षमता आहे. यासाठी आता एकत्रित प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या मार्फत राबवण्याचे काम विद्यापीठाच्या वतीने केला जाणार आहे.
* आता नागपुरात मेट्रोचे दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सुरू असून हा टप्पा 2027 अखेरपर्यंत पूर्ण होणार..
* कामठी,भंडारा ,हिंगणा, वर्धा या चारही मार्गांवर 6 हजार 708 कोटीच्या गुंतवणुकीतून 43.8 किमी चे बांधकाम सुरू आहे..
* यामध्ये एकूण 32 स्टेशन राहतील सद्यस्थितीत 20 % टक्के काम पूर्ण झालेत..
* बुट्टीबोरी, हिंगणा, कन्हान ट्रान्सपोर्ट नगर पर्यंत 20 किमी लोखंडी बॅरेकेटीग करण्यात आले आहे..
* 43.8 किमी किमी मेट्रो मार्गाच्या भू तांत्रिक सर्वेक्षणाचे काम एका महिन्यात पूर्ण होईल सोबतच 20 स्थानकाचे काम सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.