संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि शिष्टमंडळाने सीआयडी पथकाची भेट घेतली. या भेटीनंतर कुणालाही सोडणार नाही, असं आम्हाला सांगितलं गेलं, असं धनंजय देशमुख यांनी सांगितले.
धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबाची एका तासापासून सीआयडी, एसआयटी आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय ? यावर माहिती घेण्यासाठी देशमुख कुटुंबीयांनी केज येथील शासकीय विश्राम गृहावर अधिकाऱ्यांची भेट घेतली.
शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल
शिवसेनेच्या सर्व कार्यकारणी बरखास्त होणार
शाखा प्रमुखांपासून सर्व अधिकाऱ्यांची होणार पदनियुक्ती
पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेत खांदेपालट
११ जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरात एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. हा प्रकार निदर्शनाला येताच हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदाराने प्रसंगावधान दाखवत त्याला रोखले. त्याच रागातून त्याने पोलीस अंमलदार राजू शिवाजी पवार यांना मारहाण केली. आरोपीला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पवार यांच्या निवास्थानी आज भेट दिली. यावेळी त्यांनी पवार यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. तसेच त्यांचा गौरव करण्यात आला.
लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण.
ही घटना एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या इस्ट हेवन सोसायटीजवळ आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे.
वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
नंदुरबार शहरातील सुंदर कार्यालयासमोर असलेल्या एचडीएफसी बँकेत अचानक लागली आग.
बँकेतील एसीचा ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
आग लागल्याचं बँक कर्मचाऱ्यांना वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला
बँकेचे कामकाज आपटून बँक कर्मचारी बँक बंद करत असतानाच घडली घटना
बँक कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने आग विझवण्यात यश
एसआयटीच्या तपासी अधिकारी DYSP किरण पाटील या बीडच्या केज येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल.
काही वेळात देशमुख कुटुंब देखील शासकीय विश्रामगृहावर दाखल होणार आहे.
देशमुख कुटुंबाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास कुठपर्यंत आलाय ? याची माहिती मागविण्यात आली आहे.
तर याच माहिती देण्याच्या पार्श्वभूमीवर सीआयडी, SIT आणि बीड पोलीस अधीक्षक देशमुख कुटुंबाशी भेट घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत.
नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर दाखल गुन्ह्यात 'सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न' हा कलम समाविष्ट.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई.
नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यानं त्यांच्या पालकांवर कारवाई.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर २६ गुन्हे दाखल होते त्यात ७ आरोपींना केली अटक.
एकाच दिवशी वापरकर्त्यांवर २४ गुन्हे दाखल करत ३३ आरोपींवर कारवाई.
नागपूर शहरात पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट केला.
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा मैदानात रोड रोलर फिरवून मांजा नष्ट करण्यात आला.
नष्ट केलेल्या नायलॉन मांज्याची किंमत १८ लाख रुपये इतकी होती.
- सुशील वाल्मीक कराड याच्या विरोधात दाखल असलेल्या सोलापूर कोर्टातील फिर्यादीवर सुनावणीला आजपासून सुरुवात
- सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश
- सुशील कराड आणि त्याच्या साथीदारविरोधात सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद दाखल आहे
- याबाबत आज कोर्टात सुनावणी झाली असून 20 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर केल्या सूचना
दोषी आरोपींवर कोणत्याही प्रकारची हयगय करू नका
शेगाव तालुक्यातील केस गळती होत असलेल्या भागात केंद्र सरकारच्या आयुष विभागाचं पथक पोहचलं.
आयुष च्या पथकात चेन्नई व मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचा समावेश.
आयुष विभागाच्या होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ञांकडून केस गाळणाऱ्या व टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी सुरू.
अद्याप ICMR च पथक या भागात पोहचले नाही. ICMR च पथक उद्या सकाळी येणार असल्याची तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती.
संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली
घरात कुटुंबीयांसोबत बसलेल्या असताना अश्रू झाले होते अनावर
तातडीने रुग्णालयात हलवण्याची आली वेळ
केज येथील रुग्णालयात करणार दाखल
खंडणी व खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी
खंडणी प्रकरणातील पंधरा दिवसाच्या कोठडीनंतर खून प्रकरणात दोन दिवसाची मिळाली होती पोलीस कोठडी
कोठडीची मुदत संपली असल्याने आज पुन्हा एकदा केले होते न्यायालयासमोर हजर
विष्णू चाटे याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
चाटे याचा मोबाईल कसा काय सापडत नाही
अद्याप एक आरोपी फरार आहे, त्याला कोण सापडत नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून द्यावा
देशमुख कुटुंब आज भयभीत आहे
खंडणीतील आरोपींवर मोकका लावला नाही म्हणून देशमुख कुटुंब भयभित आहे
देशमुख कुटुंबाच्या आंदोलनाची घेतली प्रशासनाने दखल
थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात देशमुख कुटुंब पोहोचणार
एसआयटीचे व सीआयडी चे वरिष्ठ अधिकारी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात देशमुख कुटुंबाची घेणार भेट
गुन्ह्याच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबाने मागितलेली माहिती देण्याची शक्यता
Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरात होणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीपर्यंत होईल, पण कोल्हापुरात होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर
टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई
आर्थिक गुन्हे शाखेची पोईसरमध्ये छापेमारी
दादर पाटोपाट आता पोईसरमधील टोरेस कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेचा छापा
-नाशिकच्या येवल्यात तीन दिवसीय मकरसंक्रांत पतंग उत्सवाला सुरवात झाली आहे,पतंग उत्सवासाठी तरुणाईची धूम सर्वत्र पहावयास मिळत असून,सण आणि उत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या येवला शहरात तीन दिवस येवलेकर संपूर्ण कुटुंब तसेच बाहेरगावी कामानिमित्त गेलेले तर परदेशात स्थायिक झाले या उत्सवासाठी दाखल झाले आहे,
सकाळ पासूनच ठीक ठिकाणी गच्ची वरती पतंग उडवण्यासाठी डीजे च्या तालावर तरुणाई सज्ज झाले आहे संक्रातीचा आकर्षण म्हणजे खास देश-विदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यात दाखल होत असतात
कल्याण डोंबिवली परिसरात अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांनी फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे .डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्यात .कल्याण पूर्व टाटा नाका परिसरात त्याला सापळा रचत अटक केली .पप्पू राठोड असे या गांजा तस्कर तरुणाचे नाव आहे .त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे .पप्पू राठोड विरोधात या आधी देखील गांजा विक्री बाबतचे गुन्हे दाखल आहेत.
जगात अनेक मोठ्या शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. जगभरातील प्रत्येक मोठ्या शहरात वाहनांची संख्या वाढल्याने कमी अंतर कापण्यासाठी खूप वेळ लागतो. ‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आता समोर आला आहे. या मध्ये १० किलोमिटर हे अंतर कापण्यासाठी पुण्यात ३३ किलोमिटर २२ सेकंद इतका अवधी लागत असल्याचे निरीक्षण या संस्थेने नोंदवले असून जागतिक वाहतूक कोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागला आहे. नेमकी या वाहतूक कोंडीचे कारण काय आहे.
विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून धाराशीव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य व बार्शी तालुका परिसरात आलेला वाघ तीन आठवड्यांपासून पशुपालकांच्या गायी, वासरांचा फडशा पाडत आहे. त्यामुळे या वाघाला पकडण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद प्रतिसाद पथक धाराशिव येथे रवाना झाले आहे. हे पथक वाघाचा ठावठिकाणा घेऊन त्याला जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे. या पथकाने गेल्या काही वर्षात तब्बल 81 वाघांची बचाव मोहीम यशस्वी केली आहे. तीन आठवड्याच्या कालावधीत वाघाने बार्शी व धाराशिव परिसरात १६ जनावरांची शिकार केली आहे. वाघाच्या उच्छादामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रामलिंग अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्याच्या पत्नीने कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप शिव परिवहन वहातूक कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी पत्रकार बैठक घेत केलाय. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत संतोष शिंदे यांनी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केलाय. इतकंच न्हवे तर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेला एसटी बँक निरीक्षक राहुल रमेश पुजारी हा सदावर्ते यांचा वसुली एजंट असल्याचा आरोप करत त्यांनी मिरज शाखेतील कर्मचारी अनिल कोळी आणि अपहार केलेला आरोपी यांचे फोन संभाषण ऐकवीले.
आजपासून सुरू होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रे निमित्ताने मुरबाड तालुक्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, सीसीटीव्ही आणि वाॅच टाॅवर द्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी रायगड, रत्नागिरी आणि जिल्हा मुख्यालयातील असे ४०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी दोन दामिनी पथक, एक क्राईम पथक, २०० होमगार्ड आणि ग्राम सुरक्षा दल अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान कर्जत म्हसा मार्गे मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णता बंद ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्त तैनात केल्या नंतर पोलिसांचा माॅपड्रील घेऊन पोलिसांना विविध सूचना करण्यात आल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप गीते यांनी दिली.
किल्ले रायगडच्या संवर्धन कामात पुरातत्व विभागाचा अडसर येतोय. अधिकारी चांगलं काम करीत असले तरी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारने त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. दानवे यांनी आज किल्ले रायगडला भेट देवून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. त्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. रायगड परिसरातील 21 गावांचा विकास सुनियोजित पद्धतीने व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या संदर्भात आपण राज्य सरकारशी चर्चा करू असं दानवे यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद..
सायबर चोरट्यांनी कोथरुड भागातील एकाची फसवणूक केली.शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता.शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. तक्रारदाराला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. परताव्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तक्रारदाराने चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील गाढे सावरगाव येथील शेतकऱ्याने मोसंबीला भाव नसल्याने दोन हेक्टर मोसंबी बागावर कुऱ्हाड चालवली आहे. गाढे सावरगाव येथील भागवत डोंगरे या शेतकऱ्याने 740 मोसंबीच्या झाडांची बाग तोडून टाकली आहे. मागील काही वर्षापासून मोसंबी उत्पादक शेतकरी विविध समस्यांचा सामना करत आहे. सध्या मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ होत असून मोसंबीला बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने या शेतकऱ्याने दोन हेक्टर मोसंबी बागावर कुऱ्हाड चालवली आहे..
राणेंनी दिलेल्या धमकीला न घाबरता चिपी विमानतळावर येत्या 15 दिवसात विमान वाहतूक सुरु न झाल्यास शिवसेना तारीख जाहीर करून विमानतळाला टाळे ठोकणारच असा प्रति इशारा नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी वैभव नाईक यांना टाळ ठोकून दाखवाच तुमच्या घराला टाळ ठोकीन असा इशारा दिला होता या इशाऱ्यावर बोलताना वैभव नाईक यांनी मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही. विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टीना विरोध करत राहणार. शिवसेना लवकरच तारीख जाहीर करेल आणि टाळ ठोकण्याचा कार्यक्रम करेल. त्यापूर्वी मुंबईची विमान वाहतूक सुरू करा असा इशाराच वैभव नाईक यांनी दिला आहे
लक्ष्मण हाके यांना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी धमकी
लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन
जरांगे यांच्या समर्थकांकडून फोन वरून धमकी
हाकेंच्या पत्रकार परिषद पुर्वी फोनहून अरेरावी
- उमरेड विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश
- उमरेड विधानसभा क्षेत्रातील दोन्ही पंचायत समिती क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश
- पंचायत समिती सभापती, उपसभापती सह असंख्य कार्यकर्त्याचा भाजप पक्ष प्रवेश..
- आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत या पक्षप्रवेशामुळे होणार भाजपला होणार फायदा..
- काँग्रेसमध्ये आता नेतृत्व राहिला नाही आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर भाजपच विकास करु शकतो. म्हणुन पक्ष प्रवेश झाल्याच माजी आमदार राजु पारवे यानी सांगितलं...
आनंदराज आंबेडकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या पत्नीसह आईची भेट
आईसह पत्नीशी साधला संवाद
तपासा विषयी केली विचारपूस
आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहोत दिला शब्द..
अकोल्यात चायना मांज्याने ऐका महिलेचा पाय कापलाय.. जवळपास महिलेच्या पायाला 45 टाके लागले आहेये.. अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे ही घटना घडली आहेये.. कलावती मराठे नामक महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाली आहे.. या महिलेचा मांज्याने इतका पाय चिरला गेला आहे की तिच्या पायाला 45 टाके पडले आहेत....
सांगलीच्या मिरज तालुक्यातील पद्मावती मंदिरातील चोरीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे.चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करत त्याच्याकडून साडे नऊ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. अक्षय मोरे,असे या चोरट्याचं नाव असून दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातल्या आरग येथील पद्मावती मंदिरामध्ये चोरी करत देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले होते.
४७ वर्षीय मुलाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. घटनेची माहिती आईला मिळताच आईनेही नऊ तासात प्राण सोडले. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका या गावात घडली. अवघ्या नऊ तासाच्या अंतराने मायलेकांचा मृत्यू झाल्याची घटना गावात पसरतात गावामध्ये शोककळा पसरली. पांडुरंग नामदेव गवळी वय ४७, निर्मलाबाई नामदेव गवळी वय ७० वर्ष रा. ता. सोयगाव तिडका असे मृत मायलेकांचे नाव आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलीस आणि सीआयडी यांच्याकडून सुरू असून वस्तुस्थिती समोर येईलच. त्यात जर वाल्मीक कराडचा संबंध असेल, तर त्यालाही त्यात घेतलं जाईल, त्याला सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना पत्रकारांशी बोलताना भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली.
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला, आमदाराचा नामदार झाला, आता पालकमंत्रीही व्हावा, अशी सगळ्यांचीच इच्छा असून जे ईश्वराला प्रिय आहे ते होईल. चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून दिली आहे. पालकमंत्री ठरत नसल्यामुळे कोणतीही विकासकामं अडलेली नसून लोकांची कामं सुरूच आहेत. जानेवारी अखेरपर्यंत पालकमंत्री पदांचं वाटप होईल, असंही गोगावले म्हणाले. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधताना भोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रयागराज - सकाळी ९ वाजेपर्यंत ६० लाख नागरिकांनी केले स्नान
कुंभ मेळ्याला आज पासून सुरुवात
सकाळी ५ वाजून ३ मिंट हा आजच्या पवित्र स्नानाचा मुहूर्त होता
कुंभ मेळ्यात एकूण ६ स्नान असणार यापैकी पाहिले स्नान आज
लाखो भाविक प्रयाग राज मध्ये दाखल
अतिशय दुर्दैवी अपघात आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे.- भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करून लवकरच पोलीस आणि आरटीओ विभागाची बैठक घेणार आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईच्या सूचना देऊ. अनेकदा ट्रक, ट्रेलरना मागे टेल लॅम्प नसतात, हे अतिशय गंभीर आहे.मंत्री गिरीश महाजन
मागील वर्षी भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. यानंतर यंदा देखील शेतकऱ्यांवर तीच वेळ आली असून कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्याने नांदेड जिल्ह्यातील 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात हजारो हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र जुन जुलै माहिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. तसेच कापूस फुटताना देखील अवकाळी पावसाने नुकसान झाले. शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. गेल्या वर्षी कापसाला 8 हजार 800 ते 9 हजार 200 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. मात्र या वर्षी पावसाने भिजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांकडून 7 हजार ते 7 हजार 200 रुपये इतकाच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापुस घरात साठवून ठेवला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड वरील विजयनगरी सिग्नल जवळ पहाटे 2 वाजून 45 च्या सुमारास ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली.
या धडकेत एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास कासारवडवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी, तसेच ३०२ च्या गुन्ह्यात आरोपी करावं.. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा, अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे..
गेल्या ४८ तासांत बदलत्या हवामानामुळे किमान व कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवेली तालुक्यात एक ते दोन अंशांनी वाढ
किमान तापमान १३.६ तर शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानत १५.५ अंशांवर पोहचले.
शहरासह जिल्ह्यात सततच्या हवमान बदलामुळे कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती झालेली आहे.
मागील आठ दिवसांत किमान तापमानही एक ते दोन वेळाच ९ अंशापर्यंत खाली आले.
त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी पडलीच नाही. त्यातही एनडी, पाषाण, औंध, वारजे, कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरातच काहीसा थंडीचा जोर असून, अन्य परिसरात थंडी गायब आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन तर काही भागांत तीन अंशांनी घट झाली आहे.
त्यामुळे १० अंशांवर असलेले किमान तापमान १३ अंशांवर, तर जास्तीत जास्त २० अंशांवर किमान तापमान पोहचले.
मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे काही भागात गारवा जाणवत होता.
पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे, आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे
संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे तरी देखील अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आंदोलन करणार आहे या प्रकरणाचा तपास केला जातो परंतु आम्हाला अद्यापही एकदाही याबाबत माहिती दिली नाही नेमका तपास कसा होतो याबद्दलच आम्हाला प्रश्न निर्माण झाले असून यावर सीआयडी चे अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्याने आता आम्ही आंदोलन करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.
पुणे पिंपरी चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रा.लि. चिंचवड या इलेक्ट्रीक दुचाकी शोरुम मध्ये पीडीआय टेक्निशियन म्हणून काम करणारा आकाश गौतम कांबळे, राहणार मिरज तालुक्यातील शिंदेवाडी याने शोरुममधील 5 लाख रुपये रोख रक्कम चोरी करून फरार झाला होता.. त्याला मिरज शहर पोलिसांना जेरबंद केले आहे. पण मिरज शहर ठाण्यामध्ये त्याला आणले असता तिथूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. या चोरट्याचा पोलीस पाठलाग करून पकडल्याचे सी सी टिव्ही मध्ये कैद झाले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचे स्पष्ट आहे . या सर्व घटनेचा कर्ता धर्ता वाल्मीक कराडच आहे. असं असताना वाल्मीक कराड याला मोका का लावला जात नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला केलाय. वाल्मीक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबीयांचा संयमाचा बांध फुटणे साहजिक आहे. अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. वाल्मीक कराड याला मोका लावला नाहीतर आपण स्वतःला संपवू असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सरकारला दिलाय. त्यावर ते बोलत होते.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक व तेलंगनातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या नळदुर्ग मैलारपुर येथील श्री खंडोबा याञेला रवीवार पासुन प्रारंभ झालाय दरम्यान धाराशिव सोलापूर व लातुर जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर काठ्या दाखल होत आहेत.दरम्यान याञेसाठी मंदीरावर आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे.याञेचा आजचा मुख्य दिवस असुन लाखो भाविक आज दाखल होण्याची शक्यता आहे तर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजराने मंदीर परीसर दणाणला आहे.पुजा,नवस,दंडवत भंडारा उधळणीसह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान या याञेसाठी प्रशासनाने व मंदीर समीतीने जय्यत तयारी केली आहे.
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या मक्याचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेय. बाजारात मक्याची आवक चांगली होगा असून मालाला उठाव नसल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे चित्र पहायला मिळतंय. सध्या बाजारात मक्याच्या कणसाची एक गोणी 400 रुपयांना विकली जात असून आठवड्याभरातच यामध्ये 100 रुपयांची घसरण झालेय. पुढील काही दिवस दर कमीच राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केलेय.
१४ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दीन आहे. नामविस्तार दिनानिमित्त उद्या १४ जानेवारी रोजी विविध पक्ष,संघटनांतर्फे अभिवादन फेरी काढून विद्यापीठ गेटसमोर जाहीर सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे.मकई गेट ते विद्यापीठ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.रविवारी पहाटे सहा ते रात्री बारापर्यंत हा बदल लागू असेल.मात्र हे नियम पोलिस अधिकारी,अग्निशमन दल,रुग्णवाहिका,आरोग्यसेवा, दंडाधिकारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी लागू नाही. नामविस्तारदिनी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस कर्मचारी असणार आहेत.नामविस्तारदिनी शहरभर कार्यक्रम आहेत.त्यामुळे शहरासह विद्यापीठ परिसरात १ हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
चिपी विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकतो असा सज्जड दम खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिला आहे. चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक येत्या पंधरा दिवसात सुरू न झाल्यास चिपी विमानतळाला टाळे ठोकणार अशा पद्धतीचा इशारा वैभव नाईक यांनी प्रशासनाला दिला होता. वैभव नाईक यांच्या या इशाऱ्याचा नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी वैभव नाईक यांच्यावर एकेरी टीका करताना टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळ ठोकलं नाही तर नारायण राणे नाव सांगणार नाही असा दम सुद्धा भरलाय.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा 'अक्षता सोहळा' आज पार पडणार आहे.हिरेहब्बू वाड्यापासून वाजतगाजत मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक सिद्धरामेश्वर मांडोरापर्यंत निघते.मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडा सोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळी पार पडतो.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक सामील होतात.
पन्हाळा पोलिसांनी बकरी चोरणाऱ्या टोळीला गजाआड केले. या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही वरून या चोरट्यांचा छडा लावल्या असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली आहे.
- ५ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- आत्तापर्यंत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना पोलिसांनी केलं तडीपार
- रविवारी नाशिक पोलिसांनी ३ ठिकाणी छापे टाकत १ लाखांचा नायलॉन मांजा केला जप्त
- नायलॉन मांजा विक्रेत्यांसह आता नायलॉन मांजा वापरणारे देखील रडारवर
- इमारतींच्या टेरेसवर जाऊन तपासणीचे पोलिसांना आदेश
- जीवघेणा नायलॉन मांजामुळे मागील काही दिवसात नाशिकमध्ये १९ घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी
अवघ्या कांही वेळात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवात
हिरेहब्बू वाडा ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत निघणार भव्य दिव्य मिरवणूक
सात मानाच्या नंदी ध्वजासह सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखी आणि योगदंडासह निघणार मिरवणूक
आज सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्राथिनिधिक स्वरूपात पार पडणार विवाह सोहळा
संमती कट्ट्यावरती लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार अक्षता सोहळा
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना मागील काही दिवसा पासुन गोबरवाही पोस्टे. हद्दीतील बावनथडी नदी पात्रातुन रेती चोरी होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या सदर रेती चोरी मध्यप्रदेश भागातील माफीया चोरुन घेवुन जावुन त्यांच्या भागात साठा करुन ती पुन्हा बेकायदेशीर मार्गाने विक्री करीत असे. काल रात्री मध्यप्रदेशातुन काही अवैध वाहतुक करणारे टिप्पर गोबरवाही पो.स्टे. हद्दीतून जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहीती पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना भेटल्याने त्यांचे आदेशान्वये गोबरवाही पोलिसांनी पाळत ठेवली असता 03 टिप्पर लेंडेझरी ते रोंगा रोडवर मिळून आल्याने टिप्पर क्र. 1) एमएच 31/ एफसी 8360, 2) एमएच 40/ सीटी 2357, 3) एमएच 40/सीटी 6221 व त्यांचे चालक नामे 1) सागर रमेश मेश्राम, वय 24 वर्ष, रा. कन्हान ता. कन्हान 2) शिवकुमार बाळकृष्ण कोडापे, वय 37 वर्ष, रा. नरखेड जि. नागपुर 3) उमेश जयसिंग चौरे, वय 47 वर्ष, रा. खापरखेडा जि. नागपुर यांना ताब्यातुन एकुण किमती 1,06,20,000/- रु चा माल मिळुन आल्याने त्यांचेवर अप क्र. 11/2025 कलम 303 (2), 3(5) भा.न्या.सं. सहकलम 48(8) महा. जमिन महसुल अधिनीयम सहकलम 7.9 पर्यावरण सरंक्षण अधिनीयम अन्वये कार्यवाही केली.
राज्यात महायुतीची सत्ता आली.मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही.मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.आता छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ऍक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. मराठवाड्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक ही मोहीम समता परिषदेकडून राबविण्यात येत आहे. धाराशिव इथ समता परिषदेची आढावा बैठक पार पडली या बैठकीत परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी पुढील रणनीती पदाधिकाऱ्यांना सांगितली.धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 शाखांचे उद्घाटन करण्याचं यावेळी ठरवण्यात आले.
महापालिकेच्या वतीने 2024 मध्ये दहावी मधील विद्यार्थ्यांना मौलाना अब्दुल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अर्थसाह्य योजनेअंतर्गत देणार शिष्यवृत्ती
13638 अर्जुन पैकी 11000 विद्यार्थ्यांचे अर्ज ठरले पात्र
संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होणार
मागील अनेक वर्षांपासून महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे राबवण्यात येते योजना
दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पंधरा हजार रुपये तर बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये अर्थसहाय्य
छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर थेट गुन्हा केला जाणार असल्याचा इशारा संभाजीनगर शहर पोलिसांनी दिलाय. महिनाभरात छत्रपती संभाजीनगर शहरात २५ जणांना दुखापती झाल्या आहेत. मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये,म्हणून पोलिसांनी शहरात ध्वनिक्षे कांद्वारे जनजागृती सुरू केली आहे.त्याचबरोबर नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगणारे बॅनरही लावण्यात आले आहेत.नायलॉन मांजामुळे सुमारे २० जण जखमी झाले आहेत.या पाश्र्वभूमीवर शहरात पोलिस नायलॉन मांजाविरुद्ध जनजागृती मोहीम राबवत आहेत.नायलॉन मांजा वापरणारे आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.आतापर्यंत ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यापैकी ६ जणांवर कलम ११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.नायलॉन मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी दिला होता.आता पोलिसांनी जनजागृती सुरुवात केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बीतील गुह आणि हरभरा धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली तरी दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहेत.त्यामुळे गुह आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत (एसटी) पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात २०० इलेक्ट्रिक बस येणार
पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचा निर्णय
प्रस्तावित स्वारगेट, दापोडी ‘चार्जिंग स्टेशग्स’वर एकाच वेळी ३६ बस चार्ज होणार
महामंडळातील जुन्या बस मोडीत काढून इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर
सध्या पुणे विभागात ६६ इलेक्ट्रिक बस आहेत
स्वारगेट आणि दापोडी येथे ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्यासाठी आवश्यक परवानग्यादेखील पूर्ण
जळगाव नवीन वर्षात जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. हा दर २०२३ ला ९२५ होता, तो आता ९३० झाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून, २०२३ च्या मानाने २०२४ मध्ये मुलींच्या जन्मदरात काही अंशी वाढ झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी, तसेच ३०२ च्या गुन्ह्यात आरोपी करावं.. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा, अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे..
येत्या काळात पुणे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येणार असून उद्याोजक, कंपन्या पुण्यात आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत रांजणगाव येथे प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक उत्पादन संकुलाचे (मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली.
स्टोरियन एचके’ आणि ‘आयएफबी’ या दोन मोठ्या कंपन्यांकडून या संकुलाची उभारणी सुरू असून येत्या काळात ५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात येईल. सेमीकंडक्टरशी निगडित विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. शिवाय देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढेल असं ही ते म्हणाले.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेला उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली. यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. पिडीत महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
आपल्याला जमीन खरेदीसाठी पैसे लागणार असल्याचे सांगत त्याने तिच्याकडून तब्बल ३८ लाख रुपये उकळले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली
मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. शेतातील भात काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. मावळच्या कासारसाई मधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ एक एकर क्षेत्रात साहो जातीच्या गावरान टोमॅटो ची लागवड केली. मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे.
सांगोला येथे राज्यातील रामोशी बेडर समाजाला संघटीत करण्यासाठी स्थापन केलेल्या जय मल्हार संघटनेचे वार्षिक अधिवेशन राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडले. अधिवेशनात आगामी काळात रामोशी,बेडर यासह बारा बलुतेदारांना एकात्रित करून त्यांना राजकीय समाजिक न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला स्थान मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे.
दुष्काळी सांगोला तालुक्यातील अकोला गावातील दिनेश खटकाळे या तरूण शेतकर्याने संमिश्र पालेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. संमिश्र पिक लागवड शेती त्यांना फायद्याची ठरली आहे.
तीन एकर शेतीवर त्यांनी 35 प्रकारच्या विविध पालेभाज्या आणि 40 प्रकारच्या विविध फळ झाडांची लागवड केली आहे. याबरोबरच त्यांनी फळ बागेत अंतर्गत पिक म्हणून मसाल्याची लागवड केली आहे.
सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या पालेभाज्यांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे शेतीतून मिळणार्या वार्षिक उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते रायगड जिल्हयाच्या दौरयावर आहेत. सकाळी ते किल्ले रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायाना अभिवादन करतील. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे जे काम प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे.त्याची अधिकारयांकडून माहिती घेतील. पाचाड इथं जिजाऊ समाधी दर्शन, चवदार तळयाला भेट दिल्यानंतर ते दरडग्रस्त तळीये गावाला भेट देणार आहेत. ते सुरू असलेल्या पुनर्वसनाच्या कामाची ते पाहणी करतील या विषयावर ते ग्रामस्थ आणि अधिकारयांशी चर्चा करणार आहेत.
गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा प-या याठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला.मात्र या बंधा-यात पाणीच साचत नसल्यानं गावावर पाणी भिषण टंचाईची टांगती तलवार उद्भवणार आहे.कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधा-यात पाण्याची साठवणूक होत नाही.याच पाण्यावर भाजीपाला करणा-या शेतक-यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळेत नाही त्यामुळे बंधा-यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत.
जळगाव दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या तेहरीम अहमद नासीर अहमद भुसावळ या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, इतर दोनजण ताब्यात असून, त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
भुसावळ येथे १० जानेवारी रोजी या तरुणाचा खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून कट रचून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कटात सहभागी संशयित यांना पोलिसांनी बल्लारशाह येथून अटक केली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.