Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates : ठाकरे सेनेला धक्का; दोन माजी आमदार एक जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 5 March 2025: आज बुधवार दिनांक ५ मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीतील वाद, स्वारगेट एसटी डेपो अत्याचार प्रकरण, दत्ता गाडे, धनंजय मुंडे राजीनामा, अर्थसंकल्पीय अधिवेशन, माणिकराव कोकाटे सुनावणी अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

सोलापूर : ठाकरे सेनेला धक्का; दोन माजी आमदार, एक जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

सोलापूर शहर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.त्यांचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि माजी आमदार शिवशरण पाटील हे तीन नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने अमर पाटील आणि उत्तमप्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले आहे. तर अमर पाटील यांनी अंतर्गत गटबजीला कंटाळून राजीनामा देत असल्याच जाहीर केलं आहे.

Chandrapur : चंद्रपूर शहरालगत मोरवा येथे भीषण आग

चंद्रपूर शहरालगत मोरवा येथे भीषण आगीची घटना घडली. ईगल नामक ढाब्याच्या मागे एक भंगाराचे अवैध गौदाम होते, ते आगीच्या भक्ष्यस्थानी आले. याच भागात डिझेल आणि ऑईलची चोरी होते. ते साठवून ठेवलेल्या अवैध साठ्यालाही आग लागल्याची प्राथमिक आहे.

त्यामुळे आगीचा डोंब उसळला. ऐन महामार्गालगत असलेल्या या अवैध डिझेल आणि भंगार गोदामाला लागलेली आग भीषण असून त्याच्या ज्वाला दूरवरून नजरेस पडत आहेत. ही नक्की कुणाच्या मालकीची जागा आहे, इथे अवैध धंदे कुणाचे चालतात, आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तर चंद्रपूर आणि लगतच्या नगर पालिकांमधून बोलावण्यात आलेले अग्बिबंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

Beed : परळीत संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅण्डल मार्च

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परळी शहरात कॅण्डल मार्च करण्यात आला. शहरातील जिजामाता उद्यान ते मोंढा मार्केट यादरम्यान हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

Kolhapur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा

बी एन एस एस 168 प्रमाणे बजावल्या नोटीसा

सांगवडे येथे उद्या सायंकाळी शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीची बैठक

बैठकीला सांगवडे, हलसवडे सह पंचक्रोशीतील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी राहणार उपस्थित

पुण्यात आंबिल ओढ्यात इलेक्ट्रिक दुचाकीने घेतला पेट

आज दुपारी एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या गाडीला आग लावून मोठा धूर पसरला होता

इलेक्ट्रिक दुचाकीच्या डिकीत अचानक आग लागल्याने धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे

अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांची पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी

मुळा नदी पात्रात संभाजी पोलीस चौकीच्या पाठीमागे अनधिकृत होर्डिंग उभारण्यात येत होते

त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी काम थांबवण्यासाठी गेले असता, त्यांना दमदाटी करुन हाकलून देण्यात आलं

महापालिका कर्मचार्यांबरोबरच पोलीसांनाही आरेरावी

महापालिका आयुक्त आले तरी मी थांबत नसतो, अशी दमदाटी करणार्या कार्यकर्त्याची भाषा

या घटनेनं शहरातील अनधिकृत होर्डिंगचा विषय पुन्हा चर्चेत

आझाद मैदानात समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांचा एल्गार

समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांचं काम बंद आंदोलन

आझाद मैदानात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी

उध्दव गटाचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्या मुंबईतील बैठकीत संजय कदम यांची ठरली पक्षांतराची भूमिका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम लवकरच पक्ष प्रवेश करतील

रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन

संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उध्दव गटाचे पराभूत उमेदवार

राजन साळवीनंतर आणखी एक नेते उध्दव ठाकरेंची सोडणार साथ

नीलम गोऱ्हें विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव

मविआकडून विधीमंडळ सचिवाकंडे प्रस्ताव

चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीत निर्माणधीन इमारतीमध्ये आग

नवीन इमारत बांधणीसाठी लावण्यात आलेल्या लाकडी बाबूंना लागली भीषण आग

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत शिवसेना शिंदे गटाचे निषेध आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या किटुंबियांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटा तर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी केलेय. मागणी पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय.

पुण्यात काळेपडळ पोलिसांकडून अवैध गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त

काळेपडळ पोलिसांनी=हांडेवाडी ट्रेन पार्क,उरुळी देवाची येथील सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचा अवैध गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करून तेथील पत्र्याचे शेड उद्ध्वस्त केले आहे.

याप्रकरणी अजित संतोष जयस्वाल ( रा काळेपडळ हडपसर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ संतोष जयस्वाल हा एका पत्र्याच्या शेडमध्ये दारू काढून विक्री व वाहतूक करीत असल्याची माहितीवरून पोलिसांनी छाप्यामध्ये ४४ कॅनमध्ये भरलेली ३ लाख ८ हजार ९०० रुपये किमतीची १६४० लिटर गावठी दारू जप्त करून तेथील पत्र्याचे शेड उध्वस्त करण्यात आले.

अधिक तपास काळेपडळ पोलिस करत आहेत

Buldhana News: शेगावात झोपड्पट्टीवर चालला बुलडोजर, ३०० पोलिसांचा ताफा तैनात

शेगावात झोपड्पट्टीवर चालला बुलडोजर !

३०० पोलिसांचा ताफा तैनात २ दिवस चालणार कारवाई काही जणांना पोलिसांकडून नोटिसेस

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील तालुका क्रीडा संकुला वरील अतिक्रमण काढण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे.

मंगळवारीसकाळ पासून क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालविल्या जात अडून झोपडपट्टी वासी बेघर झाले आहेत.

तसेच जेसीबी द्वारे सुद्धा अतिक्रमण काढण्यात येत आहे.

आज आणि उद्या असे दोन दिवस हि कारवाई चालणार असून कायदा व सुवयवस्था अबाधित राखण्यासाठी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकऱ्यांसह ३०० पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Solapur News: राज्यातील सर्वधिक तापमानाची नोंद झाली सोलापुरात

राज्यातील सर्वधिक तापमानाची नोंद झाली सोलापुरात

सोलापूर शहरातील तापमान पोहचल 39.4 अंश सेल्सीअसवर

सोलापूरमध्ये दिवसेंदिवस वाढतोय उन्हाचा कडाका,तापमानात होतायत नवनवे विक्रम प्रस्थापित

पुढील कांही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

सोलापूर जिल्हा प्रशासन उष्माघात कृती आराखडा राबवणार

दुपारच्या सत्रात नागरिकांनी घराबाहेर नपडण्याचे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन

या कडक उन्हाचा सोलापुरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..

Pune News: नागरिकांनो काळजी घ्या! यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा

पुणे -

यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा

महाराष्ट्र तापणार नागरिकांना काळजी घ्या

राज्यात पुढील काही दिवस उष्ण तापमान असणार .सोलापूर मध्ये जास्त तापमान ३९,° नोंद झाली आहे.

हे तापमान प्रत्येक ठिकाणी वेगळ आहे.पुढील दोन दिवसात तापमान कमी होईल .. नंतर ते वाढणार आहे.

सध्या राज्यात पाऊस कुट होईल असा अंदाज नाही.एक दोन राज्यात पाऊस असल..

मार्च ,एप्रिल ,मे जास्त तापमान जास्त असल ..तापमान सरासरीपेक्षा जास्त अस्त.

चार पेक्षा जास्त उष्ण लहरी आसण्याच्या श्यकता आहे.

पुण्यातील लोहगाव,चिंचवड,कोरेगाव पार्क, मगरपट्टा या भागात जास्त तापमान असणार आहे.

Kolhapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात येणार

कोल्हापूर -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात येणार

उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इंडिया आघाडी मुख्यमंत्र्यांविरोधात करणार आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अप्रत्यक्ष संरक्षण देणाऱ्या राज्य सरकार विरोधात इंडिया आघाडीचा आंदोलन होणार

इंडिया आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा ताफा आढावण्याचा निर्णय

Bhandara News: भंडाऱ्याच्या चिखला मॅग्नीज माईन्समधील दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू

- भंडाऱ्याच्या चिखला मॅग्नीज माईन्समधील दुर्घटनेत दोन कामगारांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू

- मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत आणखी काही कामगार दबून असल्याची व्यक्त होत आहे भीती

- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथे असलेल्या मॉइल्स मॅग्नीज खाणीत दुर्घटना

* गदेघाट मधील तिसरी लेवल कोसळल्याची दुर्घटना

* चिखला मॉइल्सची २४४५ नंबरच्या फेसमध्ये घडली ही दुर्घटना

- मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्याकरिता सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्स मध्ये कामाकरिता गेले होते.

- अंडरग्राउंडमध्ये 100 मीटरच्या आत ही दुर्घटना घडली

- यात एका कामगारांचा मृत्यूदेह बाहेर काढला असून एकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.

- आणखी कामगार दबून असण्याची भीती होत आहे व्यक्त...

Jalna News: जालन्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रस्तारोको आंदोलन

जालना -

जालन्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रस्तारोको आंदोलन

जालन्यातील रामनगर साखर कारखाना येथे रास्ता रोको आंदोलन...

जालना - मंठा रोडवरील रामनगर येथे मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलय...

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन....

रस्ता रोको आंदोलनामुळे जालना - मंठा रोडवर वाहनाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीना फाशी द्या,  बुलडाण्यात कडकडीत बंद 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजिनामा द्यावा लागला

तसेच हत्येतील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने राज्यातील प्रत्येकांचे मन सुन्न झाले असल्याने नागरिक आक्रमक झालंय

त्यानुसार जिल्ह्यातील देऊळगावराजा शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते

त्यानुसार आज सकाळपासून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत..

देऊळगावराजा शहरातील मुख्य चौकात नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले

Raigad News: रायगडमध्ये होळीच्या उत्सवाला प्रारंभ, 10 दिवस चालणार होळीचा उत्सव

रायगडमध्ये होळीच्या उत्सवाला प्रारंभ, 10 दिवस चालणार होळीचा उत्सव

शहरी भागात एकच दिवस होळी लावली जाते मात्र ग्रामिण भागात होळीचा सण दहा दिवस साजरा केला जातो.

त्या प्रमाणे काल मंगळवारी रात्रीपासून रायगडमध्ये होळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

होळीच्या ठरल्या जागेवर खड्डा खणून त्या ठिकाणी होळी पेटवून या उत्सवाला प्रारंभ झाला.

दहा दिवसांनी 13 तारखेला मोठा होम लागून या उत्सवाची सांगता होणार आहे.

हे दहा दिवस रात्री बच्चे कंपनी मौज मजा करतात, घोषणा देतात.

Pune News: पुण्यात PMPL ला पोलिसांच्या "दे धक्का", PMPL चा भोंगळ कारभार समोर

पुणे -

पुण्यात PMPL ला पोलिसांच्या "दे धक्का"

PMPL चा भोंगळ कारभार

भर रस्त्यात पीएमपीएल ची बस पडली बंद

जंगली महाराज रस्त्यावर काल संध्याकाळी प्रवाशांची वाहतूक करणारी PMPL बस अचानक बंद पडल्याने गोंधळ

पोलिसांच्या आणि प्रवाशांच्या मदतीने बस ढकलून करण्यात आली सुरू

काल संध्याकाळी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर घडला प्रकार

Pune News: स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरण, विशेष सरकारी वकील दिला जाणार

पुणे -

स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरण

या प्रकरणात लवकरच विशेष सरकारी वकील दिला जाणार

विशेष सरकारी वकिलांकडून मांडली जाणार पीडित तरुणीची बाजू

येत्या २, ३ दिवसात पुणे पोलिसांकडून राज्य सरकारला विशेष वकील यांचे नाव पाठवण्यात येणार

राज्य सरकारकडून होणार विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती

१२ मार्च रोजी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची पोलिस कोठडी संपत आहे

Ahmednagar:  संतोष देशमुख हत्येचा निषेधार्थ जामखेड कर्जत श्रीगोंदा बंद

संतोष देशमुख हत्येचा निषेधार्थ जामखेड कर्जत श्रीगोंदा बंद

अहिल्यानगर

अँकर - बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत आणि श्रीगोंदा जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही उमटले आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे. यामध्ये घटनेमध्ये राजकीय हस्तक्षेप असून सर्व आरोपींना त्वरित अटक करावी.या मागण्यासाठी जिल्ह्यातील कर्जत , श्रीगोंदा तालुक्यात आज बंद पाळण्यात आला आहे.

Hingoli News: रेल्वे चढताना दुर्लक्ष केलं तरुणाचा बळी गेला

हिंगोली -

रेल्वे चढताना दुर्लक्ष केलं तरुणाचा बळी गेला

हिंगोली वाशिम रेल्वे मार्गावरील माळशेलू स्थानकावर घडली घटना

परीक्षा देऊन घरी परतणारा तरुण स्थानकावर पाय घसरून पडला

Kolhapur News: राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचे दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत

कोल्हापूर -

राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचे दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत

लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदी पात्रात

दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा आरोप, दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याच्या तक्रारी

मळीमिश्रित दूषित पाण्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका

स्थानिक नागरिक पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन लक्ष वेधणार

Breaking: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, कळंबमध्ये आंदोलक आक्रमक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा,कळंबमध्ये आंदोलक आक्रमक

धनंजय मुंडे यांची पाठराखन केल्याचा आरोप करत अजित पवार यांच्या राजीनाम्याची ही मागणी

धनंजय मुंडे आणि सरकार विरोधात घोषणाबाजी

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंद,मुस्लिम समाजाचा ही बंदला पाठिंबा

Pune News: पुण्यात धनजय मुंडे यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक

पुणे -

पुण्यात धनजय मुंडे यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक

धनंजय मुंडे यांच्या पुण्यातील घर आणि संपर्क कार्यालय समोर मराठा समाजाच आंदोलन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे पाठीशी घातल्याचा मराठा समाजाचा आरोप

धनंजय मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येतीय

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Jalna News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेधार्थ जालन्यातील जाफराबाद शहर कडकडीत बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेधार्थ जालन्यातील जाफराबाद शहर कडकडीत बंद

व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाजारपेठेत शुकशुकाट

सरपंच संतोष देशमुख हत्येची फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप

सर्व धर्मीयांकडून जाफराबाद शहर बंदची हाक

Shahapur News: गुरे चोरणारी टोळी पैकी एकाला अटक

शहापूर तालुक्यातील गेल्या अनेक महिन्यांपासून गुरे चोरणारी टोळी सक्रिय होती .

शेती उपयोगी अनेक गाय व बैल रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत गुरे चोरणारी टोळी गुरे चोरीत असत.

रात्रीच्या सुमारास किन्हवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोळखांब भागातून असीची गाडीत गुरे चोरुन नेत असताना किन्हवली पोलिसांनी पकडी आहे.

यात सात गुरे होती तर गाडी चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करीत आहेत.

Ratnagiri News: अखेर दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल

रत्नागिरी- अखेर दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल

दापोली नगरपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे

शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव केला दाखल

महिला नगरध्यक्ष असल्याने अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी १४ नगरसेवकांची आवश्यकता

दापोली नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळ

दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेकडे १४ भाजप आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येक १ असे १६ नगरसेवकांचे संख्याबळ महायुतीचे

कृपा घाग दापोली नगरपंयातीच्या नवीन नगराध्यक्षांच्या शर्यतीत नाव आघाडीवर

Pune News: पुण्यात मद्यधुंद बस चालकाने तरुणाला उडवले

पुणे -

पुण्यात मद्यधुंद बस चालकाने तरुणाला उडवले

रात्रीच्या सुमारास घडला प्रकार

वाघोली कडे जाणारा बस चालक होता दारूच्या नशेत

मद्यधुंद पीएमपीएल बसचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले

वाघोलीकडे जाणाऱ्या बसची धडक

तरुणाच्या डोक्याला गंभीर मार

उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात

Satara News:  आनेवाडी टोलनाक्याजवळ खासगी बसने घेतला पेट

सातारा -

आनेवाडी टोलनाक्याजवळ खासगी बसने घेतला अचानक पेट

बस मध्ये कॉलेज चे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती

घटने मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हाणी नाही

महामार्ग पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले

पोलिस प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

Beed: वाल्मीक कराडच्या अडचणीमुळे वाढ होणार, संपत्ती जप्त करण्यासाठी SIT कडून न्यायालयात अर्ज

बीड -

आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीमुळे वाढ होणार.

वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयात अर्ज.

वाल्मीक कराडने आयफोन मधील डिलीट केलेला डेटा एसआयटीने रिकव्हर केला.

आरोपी वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एस आय टी कडून कडून मोठ्या हालचाली.

आरोपी वाल्मीकरांकडे मोठ्या महागड्या आठ गाड्या आहेत

Jalna News: जालन्यात किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद, वादाचे रूपांतर हाणामारीत

जालन्यात किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद, वादाचे रूपांतर हाणामारीत

एकमेकांच्या घरावर दगडफेक, २ गाड्या फोडल्या

जालना शहरातील गांधीनगर भागातील घटना, दोन्ही कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी

Pune News: पुण्यात सर्वाधिक सायबर फसवणूक, वर्षभरात 8 हजार 947 गुन्हे

पुणे -

पुण्यात सर्वाधिक सायबर फसवणूक

पुण्यासह राज्यभरात सायबर फसवणूकीचे प्रकार वाढत असून,

गेल्या वर्षभरात 8 हजार 947 सायबर फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

या गुन्हे अंतर्गत तब्बल 7 हजार 634 कोटी 25 लाख 46 हजार 508 रुपयाची फसवणूक झालीय

पुण्यात सर्वाधिक 6 हजार 7 कोटी 93 लाख 4 हजार 398 फसवणूक

तर मुंबईत 4 हजार 849 गुन्हे दाखल असल्याची माहिती विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून समोर आली आहे

Dharashiv News:  धाराशिवमधील ढोकीत कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यू

धाराशिवमधील ढोकीत कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यू

भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले कोंबड्याचे अहवाल पॉझिटिव्ह , कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी कोंबड्या नष्ट केल्या जाणार, कोंबड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध

कोंबड्या मृत आढळल्यास पशुवैद्यकीय विभाग व ग्रामपंचायतला कळविण्याचे आवाहन

कावळ्याच्या माध्यमातून ढोकीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव,दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

दरम्यान पहिल्या बर्ड फ्ल्यू संशयित रुग्णाचा पुणे प्रयोगशाळेत पाठवलेला अहवाल निगेटिव्ह

Yavatmal News: सोयाबीनला ८ वर्षातील सर्वात कमी दर

यवतमाळ - सोयाबीनला आठ वर्षातील सर्वात कमी दर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकावे लागत आहे.

नाफेडची खरेदी बंद झाल्याने खाजगी बाजारात सोयाबीनचे दर तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयांपर्यंत खाली आले आहे.

हे दर गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी दर असून तूर हरभराच्या दरातील घट झाली असून तूर तसेच हरभराच्या दरात प्रत्येकी दोनशे रुपयांची घट झाली आहे.

सध्या तूरीला 7200 तर हरभऱ्याला 4800 रुपये दर मिळत आहे.

Dhananjay Munde: गेल्या आठवड्यातच अजित पवारांनी धनंजय मुंडेंनी दिली होती कल्पना

पुणे -

गेल्या आठवड्यातच अजित पवारांनी धनंजय मुंडेंनी दिली होती कल्पना

राजीनामा द्यावा लागेल अश्या अजित पवारांनी दिल्या होत्या धनंजय मुंडेंना स्पष्ट सूचना

अधिवेशनात राजीनामा द्यावा लागेल अशी धनंजय मुंडेंना अजित पवारांनी गेल्या शुक्रवारीच दिली होती कल्पना

याची माहिती मिळाल्यानेच करुणा मुंडे यांनी केलं होतं ट्वीट

Pune News: धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या

पुणे -

धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या

पुण्यात मराठा समाजाची मागणी

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी मराठा समाज आग्रही

यासह धनंजय मुंडे यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी अशा मागणीच मराठा समाजान दिलं निवेदन

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देत पुण्यातील सकलक मराठा समाजाची मागणी

Nashik News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य आज ठरणार

नाशिक -

- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य आज ठरणार

- कोकाटेंना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल

- १ मार्चला झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी दिला होता ३ दिवसांचा वेळ

- माणिकराव कोकाटे यांची शिक्षा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड आणि शरद शिंदे यांना उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यासाठी दिला होता ३ दिवसांचा वेळ

- कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात केलं होतं अपील

- कोकाटेंना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता

- आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT