Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: मोठी बातमी! महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलीसांना कारमध्ये 70 लाखांची रोकड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 4 November 2024: आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातले वातावरण, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीच्या बैठका, मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार जाहीर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Dhule News : मोठी बातमी! महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलीसांना कारमध्ये 70 लाखांची रोकड

महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर शिरपूर तालुका पोलिसांना कारमध्ये 70 लाख रुपयांची रक्कम आढळली आहे. कारमध्ये एवढी मोठी रक्कम कशासाठी नेत होते, याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. सांगवी चेकपोस्ट दरम्यान वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांना वाहनात 70 लाख रुपयांची रक्कम आढळली आहे.

पोलिसांनी कारसह रक्कम ताब्यात घेतली आहे. निवडणुकीच्या दरम्यान एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. ही रक्कम कशासाठी कारमधून चालवली होती, लवकरच पोलीस तपासात उघडकीस येईल, असा विश्वास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Kolhapur : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर

मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता संताप

अर्ज माघारी घेत असताना छत्रपती घराण्याने आपल्याला विश्वासात न घेतल्याची सतेज पाटील यांनी व्यक्त केली खंत

सायंकाळी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर सतेज पाटील यांना झाले अश्रू अनावर

Karad Crime : बंद घर फोडून शंभर तोळे सोने लंपास; लाखोंचे दागिने चोरल्याने कराड परिसरात खळबळ

कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे चोरी

बंद घर फोडून शंभर तोळे सोने चोरले

उद्योजक प्रतीक खाडे यांचे ओगलेवाडी येथील घरात चोरी

घरातले सदस्य बाहेरगावी असल्याचे हेरून केली चोरी

तब्बल शंभर तोळे सोन्याचे दागिने चोरल्याने परिसरात खळबळ

कराड शहर पोलीसात गुन्हा दाखल

श्वान पथकाला पाचरण करून तपास सुरु

Alibaug : बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांची भाजपमधून हकालपट्टी

० अलिबागमधील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांची भाजपमधून हकालपट्टी

० सहा वर्षांसाठी पक्षातून केल निलंबित

० पक्षविरोधी कारवाया केल्याचा भोईर यांच्यावर ठपका

० भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांची माहिती

० दिलीप भोईर यांनी अलिबागमध्ये महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज ठेवला कायम

Mumbai News : अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताच अंधेरीत मोहसीन हैदर सक्रिय; महाविकास आघाडी उमेदवाराला मिळाले बळ

विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताच मोहसीन हैदर हे प्रचारात सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळाले. मोसिन हैदर यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ जाधव यांना एक प्रकारे बळ मिळाले आहे.

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ जाधव यांच्या अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर येथील विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मोहसीन हैदर यांनी उपस्थिती लावून आपण नाराज नसल्याचे दाखवून देत प्रचारात सक्रिय झाले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना हैदर म्हणाले, अंधेरी पश्चिम विधानसभेची जागा आम्ही दहा हजार पेक्षा अधिक मतांनी जिंकणार आहोत. आमची लढाई ही सांप्रदायिकते विरोधात आहे.

'मुंबईत आम्हाला कमी जागा मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते कार्यकर्त्यांमध्ये राग होता मात्र हळूहळू कमी होत आहे आम्ही फक्त अंधेरीच नाही तर वर्सोवा देखील महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत असे हैदर यांनी म्हटले आहे.

Pune Ravet hit and run case   रावेत हिट अँड रन : २३ वर्षीय चारचाकी चालकाला अटक 

रावेत हिट अँड रन अपघातातील आरोपीला अखेर तीन दिवसानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आदित्य भोंडवे या 23 वर्षाच्या चारचाकी वाहनचालकाला रावेत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या रात्री अतिशय वेगाने चारचाकी वाहन चालवून आदित्य भोंडवे या वाहनचालकाने सोहम पटेल या 38 वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक देत उडवलं होतं. अपघातात सोहम पटेल या तरुणाच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Buldhan News : बुलढाण्यात सकाळी  20 लाख तर सायंकाळी 9 लाख रोकड पकडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे एका स्कुटीमध्ये 20 लाख रुपयांची रोकड सापडली होती. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा बुलढाणा पोलिसांनी तपासादरम्यान दोन व्यक्तीकडून 9 लाख रुपयाची रोकड त्याच ठिकाणी कारंजा चौकात पकडली. या दोन घटनांनी बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेत बुलढाणा पोलिसांनी पकडलेली लाखाच्या रोख रकमा जप्त केल्या असून एवढ्या रकमा कुठून कुठे नेल्या जात होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंची येत्या ९ तारखेला जाहीर सभा 

येत्या नऊ तारखेला कसब्यात राज ठाकरेंची सभा...

कसब्यातील मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

सभेची तयारी करण्याच्या मनसेकडून गणेश भोकरेंना सूचना

नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजता होणार सभा

कसबा मतदारसंघात गणेश भोकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात मनसेची पहिली सभा होणार कसब्यात

deolali News : देवळालीत शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम, महायुतीत होणार मैत्रीपूर्ण लढत

देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम असणार आहे. पक्षाने उमेदवारी रद्द करण्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. मात्र उमेदवार अथवा सूचक उपस्थित नसल्याने उमेदवारी कायम राहणार आहे. यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

Maharashtra Politics : कुर्ल्यातून मिलिंद कांबळे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला

कुर्ला विधानसभेतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला

कुर्ला विधानसभेतून ठाकरेंच्या शिवसेने विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता

शरद पवार यांच्या सूचनेनंतर मिलिंद अण्णा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे

Pimpri Chinchwad : महापालिका अधिकाऱ्याची गाडी दिव्यांग व्यक्तीने जाळली

पिंपरी-चिंवडमध्ये महापालिका अधिकाऱ्याची गाडी दिव्यांग व्यक्तीने जाळली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

कल्याण पश्चिम विधासभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम

कल्याण पश्चिम विधासभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला मात्र भाजप शहर अध्यक्ष वरून पाटील यांची माघार नाही

माघार घेण्यास 10 मिनटं उशीर झाल्याने माघार घेता आली नाही

वरून पाटील निवडणूक लढवणार

कल्याण पश्चिम मतदारसंघात चौरंगी लढत

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर , ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बासरे मनसे उमेदवार उल्हास भोईर ,अपक्ष उमेदवार वरून पाटील

Maharashtra Politics : रिपब्लिकन आघाडीच्या श्याम गायकवाड यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

रिपब्लिकन आघाडीच्या श्याम गायकवाड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. लोकसभा निवडणुकीत असाच पाठिंबा देण्यात आला होता. आता विधानसभेला सर्व संघटनांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. अर्जुन डांगळे यांच्या संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला.

Sangli News : सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोर शिवाजी डोंगरे यांनी घेतली माघार

भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी माघार घेतली. भाजपने उमेदवारी न दिल्याने शिवाजी डोंगरे यांनी उमेदवारी दाखल केली होती.S

Sada Sarvankar :  सदा सरवणरांना भेटीसाठी राज ठाकरेंचा नकार

राज ठाकरेंनी भेट नाकारली.

राज ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला.

राज ठाकरे म्हणाले मला भेटायचं नाही.

सदा सरवणर निवडणूक लढणार

दादर माहीममध्ये सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रवक्ते मधुकर मुसळे यांची माघार

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रवक्ते मधुकर मुसळे यांची माघार

देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची शिष्टाई यशस्वी

सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात भरला होता उमेदवारी अर्ज

सिद्धार्थ शिरोळे यांनी घरी जाऊन घेतली मधुकर मुसळे यांची आज सकाळी भेट

औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांचा उमेदवारी अर्ज मागे

औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.

नितीन सरदेसाई आणि समाधान सरवणकर यांच्यात मनसेच्या निवडणूक कार्यालयात बैठक सुरू

सदा सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला

माहिम मतदारसंघाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मी माघार घेतली तर अमित ठाकरे निवडूनच आले पाहिजेत, त्यासाठी समीकरण बघाव लागेल. मतदारसंघातील समीकरणावर चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरेंची भेट घेणार, असं सदा सरवणकर म्हणाले.

राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला

उमरेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर उमेदवार व शिवसेनेचे नेते राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

थोड्या वेळात ते त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील महायुतीच्या जागा वाटपात उमरेड ची जागा भाजपच्या वाट्याला गेली असून भाजपनं सुधीर पारवे यांना उमरेड मधून उमेदवारी दिली आहे.

उमरेड ची जागा भाजपला सुटल्यानंतर नाराज होऊन राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि मुलगी सिद्धी रमेश कदम यांची निवडणूकीतून माघार

Maharashtra News Live Updates: गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांनी काढली घोड्यावरून मिरवणूक

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार मंञी गुलाबराव पाटील यांची प्रचार रॅली रिधूर,फुकणी,गाळोदा,तुरखेळ,फेसर्डी,नांदगाव,पिलखेडा,डोक्साई या गावातून काढण्यात आली होती. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जळगाव च्या रिधूर येथे तर त्यांची चक्क घोड्यावरून वाजतगाजत मंञी गुलाबराव पाटील याची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीचे सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले गेले.यावेळी कार्यकर्तानी जल्लोष करीत प्रचार सहभागी झाले होते.

Nandurbar News: काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर

बंडखोरांच्या मन धरणीसाठी चक्क हेलिकॉप्टरने आले बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांची करणार मन धरणी करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची हेलिकॉप्टरने एन्ट्री

शहादा तळोदा मतदार संघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सुहास नाईक यांनी केली होती अपक्ष उमेदवारी

Dharashiv News: मी निवडणुकीतून माघार घेतली नाही,  अफवांवर विश्वास ठेवू नका: रणजीत पाटील

परंडा विधानसभा मतदारसंघातून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका: रणजीत ज्ञानेश्वर पाटील

विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, पक्षाकडून अद्याप कोणतही बोलणं झालेलं नाही

परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे

उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी फेटाळली

काही माध्यमात चुकीची माहिती प्रसारित केल्याने निर्माण झाला होता संभ्रम

Rashmi Shukla: केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे दिले निर्देश

केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे दिले निर्देश

काँग्रेस आणि इतरांच्या तक्रारी नंतर आयोगाने घेतला निर्णय

मुख्य सचिवांना ECI चे निर्देश

शुक्ला यांचा पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवण्याच्या सूचना

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत

नाराजी व्यक्त केली होती

Kalyan News: कल्याण पश्चिममधून नरेंद्र पवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

कल्याण पश्चिममधून भाजपचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

कल्याण पश्चिममधून शिंदेंचे विद्यामान विश्वनाथ भोईर महायुतीचे अधिकृत उमेदवार

कल्याण पूर्वमधून भाजपच्या गणपत गायकवाडांच्या पत्नीच्या विरोधात शिंदेंच्या महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत भरला होता उमेदवारी अर्ज

त्याला प्रत्युत्तर म्हणून कल्याण पश्चिममधून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

Mumbai News: मिरा रोडमधून गीता जैन उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, सूत्रांची माहिती

मिरा रोडमधून गीता जैन उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, सूत्रांची माहिती

त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार

२०१९ मध्ये देखील गीता जैन यांनी बंडखोरी करत नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता

यावेळेस देखील गीता जैन अपक्ष निवडणुकीच्या मैदानात

मिरा रोड मतदारसंघात यंदा देखील तिहेरी लढत दिसणार

कांग्रेसकडून मुजफ्फर हुसैन, अपक्ष गीता जैन आणि भाजपकडून नरेंद्र मेहतांना उमेदवारी

Mumbai Police: सरकारी यंत्रणांनीच थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये

सरकारी यंत्रणांनीच थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये

सरकारी आस्थापनांना दिलेल्या पोलीस सुरक्षेची बिल वर्षानुवर्ष थकीत

सरकारी यंत्रणांनीच मुंबई पोलिसांचे थकवले तब्बल सात कोटी रुपये

आरटीआय मधून झाला खुलासा

आयकर विभाग सगळ्यात मोठा डिफॉल्टर (थकबाकीदार)

आयकर विभागाने थकवले तब्बल ४.८५ कोटी रुपये

तर एमएमआरडीएने थकवले १.१० कोटी रुपये

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई पोलिसांचे ४५ लाख रुपये देणे बाकी

Mumbai Metro: मुंबईकरांच्या मतांसाठी भाजपने घेतला मुंबई मेट्रोचा ताबा

मुंबईकरांच्या मतांसाठी भाजपने घेतला मुंबई मेट्रोचा ताबा

मुंबई मेट्रोत भाजपची जोरदार जाहिरातबाजी

मेट्रोच्या आत व बाहेर भाजपकडून निर्णयांची पोस्टरबाजी

कोस्टल रोड, अटल सेतू, टोल फ्री निर्णयांचा भाजपकडून गवगवा

भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे

विकासाच्या अजेंड्यावर भाजपकडून मतांसाठी मुंबईकरांना सात

Mumbai News: अजित पवारांकडून बंडखोरी थंड करण्यासाठी हालचाली

अजित पवार यांच्या भेटीला प्रफुल पटेल, सुनिल तटकरे

अजित पवार याकडून बंडखोरी थंड करण्यासाठी हालचाली

महायुतीत बंडखोरी कमी करण्यासाठी हालचाली

Pune News: ...तर मनसे पक्ष म्हणून त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार

पक्षातील पदाधिकाऱ्याने जर परस्पर पाठिंबा देण्याचे ठरवले तर मनसे पक्ष म्हणून त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने जारी केले आदेश

पुण्यातील मनसे नेते बाबू वागसकर यांचे पत्र

काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाकडून पाठिंबा देण्याचे प्रकार घडल्या चे आढळून आले असल्याचे पत्रात नमूद

Mumbai News: भाजपचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या भेटीला विनोद तावडे

भाजपचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते विनोद तावडे दाखल

गोपाळ शेट्टींच्या मनधरणीसाठी विनोद तावडे दाखल

गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

Mumbai News: अंधेरी पश्चिम महाविकास आघाडी पक्षातील बंड थांबविण्यात वरिष्ठांना यश

अंधेरी पश्चिम महाविकास आघाडी पक्षातील बंड थांबविण्यात वरिष्ठांना यश

माजी नगरसेवक मोहसीन हैदर आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार

काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी काल मोहसिन हैदर सोबत केली चर्चा

मोहसीन हैदर हे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार

यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी झाल्या कमी

Ratnagiri News: रत्नागिरीत शिवसेना उबाठातील बंडखोरी शमवण्याचे वरीष्ठस्तरावरून प्रयत्न

रत्नागिरीत शिवसेना उबाठातील बंडखोरी शमवण्याचे वरीष्ठस्तरावरून प्रयत्न

उदय बने यांची एकनिष्ठतेची जी ख्याती आहे, त्याचा विचार केला तर ते निश्चितच फॉर्म मागे घेतील

शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना विश्वास

वरिष्ठ स्तरावरून बनेंशी बोलणं सुरू आहे, मीही बोललो आहे : विलास चाळके

बुलडाण्यामध्ये महायुतीत गायकवाड विरोधात शिंदेंमध्ये जुंपली

बुलडाण्यामध्ये महायुतीत गायकवाड विरोधात शिंदेंमध्ये जुंपली

शिंदेसेना विरोधात भाजप अपक्ष आरोप प्रत्यारोप

संजय गायकवाड यांनी विजराज शिंदेचा काढला बाप

23 तारखेला समजेल की कोणाच्या बापात किती दम

भाजपाचे विजयराज शिंदे यांनी दिले आवाहन

Nandurbar News: काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

शहादा तळोदा मतदार संघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांची करणार मन धरणी

शहादा तळोदा मतदार संघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सुहास नाईक यांनी केली होती अपक्ष उमेदवारी

नंदुरबार मधील विधान हॉटेलला होणार भेटी गाठी

सकाळी अकरा वाजता बैठक होणार असल्याची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरंच दारू पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त चावतात?

Maharashtra News Live Updates : भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची हकालपट्टी

Pankaja Munde Education: उपमुख्यमंत्र्याची लेक ते भाजपच्या नेत्या; पंकजा मुंडेचं शिक्षण किती?

Ananya Panday: अनन्याची कातिल अदा, फोटोंनी उडवला धुराळा

Spring Onion: कांद्याच्या पातीचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT