खरंच दारू पिणाऱ्या व्यक्तींना डास जास्त चावतात?

Surabhi Jagdish

डास

डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे अनेक आजार होतात. तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांना डास जास्त चावतात तर काही लोकांना कमी चावतात.

दारू पिणाऱ्यांना डास जास्त चावतात?

एका अहवालात असं नमूद करण्यात आलंय की, जे लोक दारूचे सेवन करतात त्यांना मद्य न पिणाऱ्या लोकांपेक्षा जास्त डास चावतात.

संबंध

दारू, डास आणि माणूनस यांचा काय संबंध आहे आणि दारू पिणाऱ्या लोकांना डास चावण्याची शक्यता का असते?

अहवाल

2002 मध्ये अमेरिकेच्या जर्नल ऑफ मॉस्किटो कंट्रोल असोसिएशनने एक अहवाल प्रकाशित केला. मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये डास चावण्याची शक्यता वाढते, असं या अहवालात म्हटलंय.

असं का होतं?

दोन गोष्टींच्या वासामुळे डास माणसांच्या जवळ येतात असा दावा आहे. पहिला कार्बन डायऑक्साइड आणि दुसरा ऑक्टॅनॉल किंवा मशरूम अल्कोहोल.

वास

या दोन गोष्टींमुळे डास जवळ येतात श्वासोच्छवासाच्या वेळी कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, तर अल्कोहोल घेतल्यावर शरीरात ऑक्टॅनॉल तयार होते. दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला ऑक्टॅनॉलचा वास येतो आणि कार्बन डायऑक्साइडही सोडतो.

डास चावणं

अशा परिस्थितीत दारू पिणाऱ्यांना डास चावण्याचं वाढण्याची शक्यता आहे. तथापि, शास्त्रज्ञ हे स्पष्ट कारण मानत नाहीत.

घरात दररोज दिवा कोणत्या दिशेला लावला पाहिजे?

light | saam tv
येथे क्लिक करा