Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का,नगरसेविका फुगेंचा पक्षाला रामराम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 31 October 2024: आज गुरूवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीच्या बैठका, दिवाळी सण यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का,नगरसेविका फुगेंचा पक्षाला रामराम

भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा भाजपला आणखी एक धक्का मिळालाय. भाजपच्या नगरसेविका भीमाताई फुगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय. ⁠आज शरद पवार यांच्या निवासस्थानी भीमाताई फुगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक नगरसेवकांनी या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भोसरीमध्ये भाजपाला धक्का बसला.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघांत ६४८ अर्ज वैध

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघांत ६४८ अर्ज वैध, तर १०९ अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ७५७ अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल झाले.आता याबाबतचे अंतिम चित्र येत्या ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील २१ मतदार संघातील १ हजार २७२ उमेदवारांनी २ हजार ५०६ अर्ज खरेदी केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात दाखल केलेल्या अर्जाची संख्या खूपच कमी आहे,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मतदारसंघ वैध अर्ज अवैध अर्ज

जुन्नर १७ ०

आंबेगाव २६ ५

खेड आळंदी. २९ ५

शिरूर ३६ ६

दौंड २० २

इंदापूर ४६ ६

बारामती ४२ ४

पुरंदर ३३ ७

भोर. २० ११

मावळ १७ ९

चिंचवड १९ ५

पिंपरी ४१ ४

भोसरी २५ ८

वडगाव शेरी. ३२ २

शिवाजीनगर २६ ४

कोथरूड ३२ ४

खडकवासला ३१ ८

पर्वती ३२ ५

हडपसर ४६ ५

पुणे कॅन्टोन्मेंट. ३६ २

कसबा पेठ २२ ७

एकूण ६४८ १०९

अजित पवार यांनी बंडखोर उमेदवार नाना काटेंची घेतली भेट

चिंचवड विधानसभेमधून गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटात सुरू असलेल्या बंडखोरीला शमविण्या साठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बंडखोर उमेदवार नाना काटे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. या वेळी अजित पवार यांनी नाना काटे यांनी आपला विधानसभा विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीचे काम करण्याचे सांगितल आहे. मात्र अजित पवारांच्या भेटीनंतरही नाना काटे हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 नोव्हेंबरपासून करणार राज्यव्यापी दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. महायुतीचा धर्म पाळत राज्यातील अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिथे आहेत तिथे सुद्धा शिंदे यांच्या सभा होणार आहेत.

Diwali Celebration: पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये जवानांनासोबत साजरी केली दिवाळी

गुजरातच्या कच्छमधील सर क्रीक भागातील लक्की नाला येथे BSF, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांसोबत पंतप्रधान यांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ठिकाणी जवानांनासोबत दिवाळी साजरी करतात.

Mahayuti: महायुतीत राज्यात दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमनेसामने

महायुतीत राज्यात दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमनेसामने

मोर्शी मध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार

सुत्रांची माहिती

मानखुर्द शिवाजी नगर मध्ये महायुतीत शत्रूपूर्ण लढत

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय

मानखुर्द शिवाजी नगर येथे भाजप नवाब मलिकांचे काम करणार नाही

मानखुर्द मध्ये भाजपची साथ शिवसेनेला असेल

राष्ट्रवादी काँग्रेस कडून ऐनवेळी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिल्याने पेच

इतर ठिकाणी बंडखोरांची समजूत काढली जाणार

Pune News: राष्ट्रीय समाज पक्षाचे ११९ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार रिंगणात

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने छाणनी नंतर महाराष्ट्रामध्ये अधिकृत वैद्य ११९ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार रिंगणात

तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत सुद्धा अधिकृत उमेदवार रिंगणात.

तब्बल १०० पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांकडून अटक

तब्बल १०० पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पापासिंग दयालसिंग दुधानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

पुण्यासह सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी केली घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापासिंग बी.टी कवडे रोड, वानवडी परिसरात थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाला मिळाली होती. पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हडपसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर यापूर्वी मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधून तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर १०० पेक्षा जास्त घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेतपोलिसांकडून त्याच्या इतर साथीदारांचा सुद्धा शोध सुरू आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही वेळात अँजिओग्राफी होणार

प्रकाश आंबेडकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पुढील काही वेळात आंबेडकर यांची अँजिओग्राफी करण्यात येणार

पुढील दोन ते तीन तासांनी हॉस्पिटल प्रशासनाकडून जाहीर होणार मेडिकल बुलेटीन

कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये, गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, आंबेडकर कुटुंबीयांचे आवाहन.

Jalna News: अंतरवाली सराटीत बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखल

अंतरवाली सराटीत बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखल

थोड्याचवेळात बैठकीला होणार सुरुवात

वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी अंतरवाली सराटित दाखल

मनोज जरांगे यांनी केलं सज्जाद नोमानी यांचं स्वागत

राजरत्न आंबेडकर सुद्धा अंतरवाली सराटीत बैठकीसाठी दाखल

Jalna News: मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मनोज जरांगेच्या भेटीला

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मनोज जरांगेच्या भेटीला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली जरांगे यांची भेट

नुकतेच अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांनी देखील जरांगे पाटील यांची घेतली होती भेट

त्यानंतर आता शरद पवार गटाचे उमेदवार ही जरांगे यांच्या भेटीला

Solapur News: सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

माजी आमदार आणि जेष्ठ माकप नेते नरसय्या आडम काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्र्यात

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेसला सुटल्याने नरसय्या आडम आहेत नाराज

माकपच शिष्टमंडळ हे 4 तारखेला घेणार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट

Pune News: पुण्यात चोरट्यांची दिवाळी, ५ दुकान फोडून १.२५ लाख रुपये लंपास

पुण्यात चोरट्यांची दिवाळी

पुण्यातील FC रोड, JM रोडवरील कपडे, आईस्क्रीम आणि शूजची दुकाने चोरट्यांनी फोडली

पुण्यातील या प्रमुख रस्त्यांवरील एकूण ५ दुकानात चोरी

चोरट्यांनी लंपास केली १.२५ लाख रुपयांची रक्कम

डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं घटनास्थळी उपस्थितीत

फोडलेल्या ५ दुकानातून एकूण १.२५ लाख रुपये लंपास

२ अट्टल चोरट्यांकडून ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय

Jalna News: मराठा मुस्लिम दलितांचं समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक - मनोज जरांगे

मराठा मुस्लिम दलितांचं समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक आहे..

आजचा दिवस आमच्या साठी महत्वचा आहे..

आजच्या बैठकीत समीकरण जुळले तर गोर गरीब सत्तेत बसतील...

गोर गरिबांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे..

गोरगरीब समाजाचे लेकरं मोठे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं...

योग्य वेळ आल्यावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे..

Nagpur News: नागपूर पोलिसांनी जप्त केले नदी किनारी फेकलेले 800 आधारकार्ड

नागपूर पोलिसांनी जप्त केले नदी किनारी फेकलेले 800 आधार कार्ड

- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील काठावर वेणा नदीत परिसरातील घटना

- स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यावर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली

- पोलिसांनी स्पॉट पंचनामा करत फेकलेले आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केले

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाजपच्या गळाला

मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाजपच्या गळाला

काँग्रेस नेते रवि राजा भाजपमध्ये करणार प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश

Pune News: पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार

पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली

अश्विनी कदम या नावाचे तीन उमेदवारी अर्ज

तिन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वैध

महाविकास आघाडीकडून अश्विनी नितीन कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे

अश्विनी नितीन कदम नावाचे दोन उमेदवार तर अश्विनी अनिल कदम नावाचा एक उमेदवारी अर्ज

Pune News: लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने उद्या पुणे मेट्रो सायंकाळी ६ पर्यंतच धावणार

पुणे मेट्रो उद्या सायंकाळी ६ पर्यंतच

लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने उद्या पुणे मेट्रो सायंकाळी ६ पर्यंतच धावणार

संध्याकाळी ६ पर्यंत सुरू असलेली पुणे मेट्रो त्यांच्या निर्धारित वेळेत म्हणजेच सकाळी ६ पासूनच सुरु होणार

महामेट्रो च्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी निमित्त हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Mumbai News: महायुतीत बंडखोरी चालणार नाही,  अजित पवारांच्या बंडखोर उमेदवारांना सूचना

महायुतीत बंडखोरी अजिबात चालणार नाही

अजित पवारांच्या नाराज बंडखोर उमेदवारांना सूचना

अजित पवार दोन दिवसात पक्षातील बंड करणार थंड

प्रत्येक मतदारसंघातील नाराज उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवाराशी अजित पवार स्वतः चर्चा करण्याची शक्यता

आजपासून नाराजांना फोनवर आणि प्रत्यक्ष भेटायला सुरुवात होण्याची शक्यता

Pune News: फुटीनंतर पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई

फुटीनंतर पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई

पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २ तर एकनाथ शिंदेंच्या सेनेला १ जागा

उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून कोथरूड विधानसभा मधून चंद्रकांत मोकाटे आणि खेड आळंदी मधून बाबाजी काळे तर शिंदे सेनेकडून पुरंदर मधून विजय शिवतारे यांना उमेदवारी

पुणे शहर आणि जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आणि युती मध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंच्या सेनेला जागा देण्यासाठी विचार झाला नाही का?

काही वर्षांपूर्वी एकत्रित असलेल्या सेनेचे शहरात २, जिल्ह्यात २ असे ४ आमदार, एक खासदार, राज्यात मंत्री पद असे वैभव होते

दोन्ही सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर

Nagpur News:  भाजप उमेदवार समीर मेघे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार

- भाजप उमेदवार समीर मेघे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार

- निवडणुक प्रतिज्ञापत्रानुसार समीर मेघे यांच्याकडे एकूण 261 कोटी रुपयांची संपत्ती

- समीर मेघे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार

- तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस मधून निलंबित आणि पश्चिम नागपुरातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले नरेंद्र जिचकार यांच्याकडे 157.23 कोटी रुपयांची संपत्ती

Mumnbai News: भाजप 110 ते 115 जागा जिंकणार, मोहित कंबोज यांचा दावा 

भाजप 110 ते 115 जागा जिंकणार

भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा

23 नोव्हेबर रोजी भाजप कार्यालयात पुन्हा दिवाळी साजरी होणार

निवडणुकी आधीच मोहित कंबोज यांचे भाकीत

ट्विट करत मोहित कंबोज यांचा 152 जागांपैकी भाजप 110 ते 115 जागा जिंकणार असल्याचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : अडीच लाखाचा बनावट मद्यसाठा जप्त; म्हसावद पोलीसांची कारवाई

Maharashtra Assembly Election : खोटी माहिती, व्हिडिओ, बातम्या शेअर करताना सावधान; अन्यथा...

Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

NEET मध्ये मोठ्या बदलांची तयारी; परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात अन् अटेम्पट होतील मर्यादित

Raver Vidhan Sabha : तृतीयपंथीयाचे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात पहिलं 'पाऊल'; रावेर मतदारसंघातून उमेदवारी

SCROLL FOR NEXT