जालन्यात चक्क एका शेतकऱ्यांने सरकारी विहिरीत खाट टाकून आंदोलन सुरू केलं आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात हे अनोखा आंदोलन शेतकऱ्याने सुरू केल आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. कारभारी मसलेकर, असं या आंदोलक शेतकऱ्याचे नाव असून निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अस आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात सरकारने कोणतीही कर्जमाफी केली नसल्याचं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
आरोपीला दोन दिवसात अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू संतप्त जमावाने इशारा दिलाय. तालीम परिसरात अद्यापही मोठ्या संख्येने जमाव झालाय. राहुरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राहुरी शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
गौरव आहुजाला सिग्नल वर लघुशंका आणि अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पुणे सत्र न्यायालयाने आहुजाला जामीन दिलाय. पुण्यातील या घटनेमुळे एकच संताप व्यक्त करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊला प्रवास करत होते. परंतु विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटला ब्रेकमध्ये समस्या आढळल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या विमानाचे आग्रा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी नवी अपडेट समोर आलीय. फॉरेन्सिक टीमने कोरटकरचे आवाजाचे नमुने घेतले आहेत. आवाजाचे नमुने घेण्याचे काम ५ तास सुरू होतं. प्रशांत कोरटकर हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकमधील आणखी एका रिक्षा चालकाचा गैरप्रकार समोर आलाय. अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सांगली मध्ये प्रचंड वादवादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली आहे.
सचिन पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या तपास पथकाचे प्रमुख होते. सचिन देशमुख यांच्या तडकाफडकी बदलीने खळबळ उडालीय. मुंबईतील सुरक्षा रक्षक महामंडळामध्ये सचिन पाटील यांची बदली झालीय.
कामरा म्हणून जो नादान प्रकार चाललाय,यावरून विधानसभेत जो धुडगुस चाललाय तो लोकशाहीला शोभणारे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिलीय.
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज शेवटचा दिवस होता, आता 30 जूनला पुढील अधिवेशन होणार असल्याचे जाहीर झाले आहे.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या एच ए कंपनीच्या झाडी हा; झुडपाला आज संध्याकाळ दरम्यान भीषण आग लागली आहे.
या आगीत एच ए कंपनी मधील मोठ्या प्रमाणात झाडी झुडप आणि साठवून ठेवलेला भंगार सामान जळून खाक झाला आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन जवळपास दहा अग्निशमन बंब च्यासाह्याने आग आटोक्यात आणली आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत सांगितले. त्यावर, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी, ६४ तलाव मत्स्यव्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.
राहुरी तालुक्यातील चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात चक्क दोन बिबटे अडकलेत.. शेतकरी रामेश्वर कारभारी आघाव यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात भक्ष्याच्या शोधात आलेले हे दोन बिबटे एकाचवेळी पिंजऱ्यात जेरबंद झाले.
या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून तीन ते चार बिबटे मुक्त संचार करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाचवेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती..
विधानभवनात कामकाज सुरु असताना बत्ती गूल झाली आहे. विधानभवनातील लिफ्ट, लाईव्ह प्रक्षेपण बंद पडलं आहे.
शालेय पोषण आहार खाल्ल्याने विद्यार्थिनींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास
पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या विद्यामंदिर माळवाडी प्राथमिक शाळेतील प्रकार उघड
कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थिनींना उपचारासाठी करण्यात आलं
सहा विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाब झाल्याने नागरिकांनी धरलं प्रशासनाला धारेवर
दररोज शालेय पोषण आहारातून दगड अळ्या आणि निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा पालकांचा आरोप
पुणे विभाग गेल्या २५ दिवसात तब्बल २९ हजार जणांचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ८८ कोटी ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवर असल्यामुळे आता विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. परिमंडलातील विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात येतोय.
कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वाडी येथून चार वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनांनंतर आरोपी हा फरार झाला. याबाबत त्याच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मृत मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कांदिवली पोलिसांच्या पथकाने दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला सुरत येथून अटक केली. अक्षय अशोक गरूड, (२५ वर्षे,) असं आरोपीचं नाव आहे. हा फिर्यादी यांचा नातेवाईक असल्याचे तपासातून समजते. सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने लहान मुलाचे अपहरण करून खून का केला याबाबत तपास करत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. नाशिकच्या मनमाड पाठोपाठ नांदगाव पोलिसात देखील आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना शहर नांदगाव यांच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मुंढवा परिसरात असलेल्या केशव नगर लोणकर चौक याठिकाणी तीन दुकानांना आग लागल्याची घटना घडलीय
- अग्निशमन दलाची दोन अग्निशमन वाहने व जवान यांनी आग आटोक्यात आणली.
- दुकानातील साहित्य जळाले असून जखमी कोणी नाही.
- आगीचे नेमके कारण समजू शकले नाही
- संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव.
- आरोपी साठे याच्या विरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये 354 अन्वे गुन्हा दाखल आहे.
- साठे याच्यावर सध्या पुण्याच्या असून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते.
- उपचार सुरू असताना पोलिसांचा देखभालित असलेला साठे सकाळी ससून रुग्णालयातून पळाला
- याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळीवारासह अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे.
जत तालुक्यामध्ये वादळ वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबाग शेतीचा मोठा नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त झाले आहे, काही ठिकाणी तयार झालेल्या द्राक्ष घडांसह द्राक्ष बागा कोसळल्या आहेत.
हाता तोंडाशी आलेल्या व काही दिवसातच तोडणीसाठी आलेल्या द्राक्षबागा जमीनदस्त झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
त्यामुळे शासनाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तर या वादळी वाऱ्यामुळे बेदाणा शेडवरील ताडपत्री तरच अनेक ठिकाणी घरांची पत्रे देखील उडून गेलेले आहेत.
नांदेडच्या माहूर तालुक्यात जंगलातील पाणवठे आतापासूनच आटले आहेत, त्यामुळे पाण्याच्या शोधात निलगायीचे कळप मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातून उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या निलगायींच्या कळपाकडून होत आहे, या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतेय.
कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक करणार शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
आज संध्याकाळी मुंबईत होणार प्रवेश
निलम गोरहे यांच्या पुढाकाराने होणार प्रवेश
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सोनवणेला प्रत्यक्षात काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे
या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम त्याचबरोबर विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे तर आरोपीचे वकील विकास खाडे हे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.
ही सुनावणी विशेष मकोका त्यासमोर होणार आहे आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे हजर करणार आहेत.
या प्रकरणांमध्ये सात आरोपी अटकेत आहेत तर आठवा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.
अहिल्यानगरला पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आज मुंबई येथे संदेश कार्ले हे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर विधानसभेसाठी तिकीट मागितले होते
मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही, तसेच अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाचे 24 नगरसेवक असताना तिकीट श्रीगोंदा मतदारसंघात दिले.
त्यामुळे कार्ले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील भेटायला वेळ देत नसल्याने कार्ले यांनी ठाकरे गटाला राम राम करत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायला तयार नाही.आज शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.
बच्चू कडू हे आज बुलढाणा बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या शिवनी आरमाड येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे.. दरम्यान शेतकरी कैलास नागरे यांनी परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी दिलेला लढा या संदर्भात बच्चू कडू यांनी कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली..
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हे आज बीडमध्ये आहेत.
काही वेळामध्ये लिस्ट न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होणार असून या पार्श्वभूमी वरती एस आय टी चे प्रमुख डॉक्टर बसवर असतील हे सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भेटीसाठी शासकीय विश्राम नगर येथे दाखल झाले आहेत
सरकारी वकील उज्वल निकम आणि डॉक्टर बसवराज तेली यांच्यामध्ये मध्ये चर्चा सुरू आहे.
अकोल्यात 12 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात अडीच हजार किलो रांगोळीतून साकारले बाप्पा... जगातील सर्वाधिक गणपतीचा अद्वितीय संग्रह असलेल्या नंद उद्यान व गणपती संग्रहालयाच्या प्रांगणात हा गणपती साकरण्यात आला.. तब्बल 12 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात तब्बल अडीच हजार किलो रांगोळीचा वापर हा गणपती साकारला आहे.. अकोला शहरातल्या सुप्रसिद्ध चित्रकार व कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी गणपतीचे भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून साकारले. त्यांच्या अप्रतिम कलाकृतीने गणेशभक्ती आणि रांगोळी कलेचा सुंदर मिलाफ घडवलाय..
राज्यात उष्णतेची लाट येत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात घेण्यात याव्यात, परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यंदा वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले
पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे
सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ला विकास आराखडा बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळात दिली.
‘सिंहगड किल्ला विकास आराखड्यासंदर्भात सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याबाबत कार्यादेशही (वर्क ऑर्डर) देण्यात आला आहे.
या रकमेतून राजाराम महाराज समाधी परिसर, वाडा संवर्धन, कंत्राटी पद्धतीवर स्वच्छतागृह बांधकाम आणि देखरेख, कल्याण दरवाजा दुरुस्ती अशी विविध कामे प्रस्तावित आहेत. यातील काही कामे सुरू झाली आहे
महाड विधान सभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत
० राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुद्द्यावर अजितदादा यांच्या सोबत होणार चर्चा
० महाड मतदार संघातुन सुमारे शंभर पेक्षा अधिक स्नेहल जगताप समर्थक अजितदादांच्या भेटीसाठी मुंबईत येणार
चांगल्या मोबदल्याचे अमिष दाखवून लोकांची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक करून दुबईत पसार झालेल्या रियाज बंदरकर याला रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. कोची विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील रियाज बंदरकर चांगल्या परताव्याची हमी देऊन अनेक जणांना फसव्या ठेव योजनेत गुंतवणूकीस भाग पाडत होता. सुरवातीला लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्याने चांगला परतावाही दिला होता. नंतर मात्र तो लोकांनी गुंतवलेले १ कोटी ७८ लाख रुपये घेऊन तो दुबईत पसार झाला होता. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.. रात्री 9 च्या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट होऊन रत्नागिरी तालुक्यातील पाली, खानू, वळके, चरवेली, नाणीज, जाकादेवी या भागात अवकाळी पाऊस पडला. तसेच संगमेश्वर तालुक्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.. पावसामुळे मुंबई-गोवा व मिऱ्या नागपूर या राष्ट्रीय महामार्गांवर काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला.. या अवकाळी पावसाचा फटका आंबा, काजूला बसण्याची शक्यता आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी रायगडमध्ये शिवसैनिकांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्या बाहेर कुणाल कामरा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमधील बंडावर अक्षेपाहार्य भाषेत विडंबन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या वेळी पत्राद्वारे करण्यात आली.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी 32 लाख 30 हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात मागितली लाच
- २ लाख १० हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना ACB ने रंगेहाथ पकडलं
- लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने सुरगाण्यात खळबळ
राज्यातील पाच आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सचिवपदी बदली झाली आहे..सांगली चे आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी झाली आहे..सांगली महापालिका पदभार स्वीकारल्या नतंर अनेक जाचक निर्णयामुळे मुळे नागरिकांसह नेते मंडळीच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडली असल्याची चित्र आहे.वाढीव घरपट्टी चा मुद्दा सद्या ऐरणीवरील आहे..मनमानी कारभार अशी त्यांची छाप असल्याचे बोलले जात आहे.पण अचानक बदली झाल्याने मनपा क्षेत्रात उलट सुलट चर्चा आहे.नेमकं कोणतं प्रकरण भोवलं का आणि काही कारण आहे .हे मात्र अद्याप समजलं नाही.
अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या वेशीवर MMRDA च्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अज्ञातांनी मशिनरीला आग लावण्याची घटना घडलीय. या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी ठेकेदाराने केलीय.
148.68 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दिवसाला 900 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाच्या जागेत सध्या शेड उभारण्याचं काम सुरू असून त्याच्या बाजूला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे. मात्र यासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार आसपासच्या गावकऱ्यांनी सोमवारी केली होती, तसंच हा प्रकल्प बंद पाडण्याचाही इशारा दिला होता. यानंतर सोमवारी रात्रीच या प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कॉम्प्रेसर मशीनला अज्ञातांनी आग लावली. याबाबत ठेकेदाराने बदलापूर पश्चिम पोलिसांकडे तक्रार केली असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सेलु येथे गावात बस सेवा उपलब्ध नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात ये - जा करण्यासाठी मोठा ञास सहन करावा लागत आहे.सेलु गावातुन चौफुला येथे बस पकडण्यासाठी तब्बल ३ ते ४ किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागत आहे त्यातच कधी उशीर झाला तर बस निघुन जाते त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे कळंब ते वाशी मार्गे सेलु बस सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
साईभक्तांसाठी एक मोठी बातमी आहे.. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या मुळ 'चर्म पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील आठ शहरांमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान हा दर्शन सोहळा संपन्न होईल..
सांगलीच्या पलूस येथे एका शेतकऱ्याच्या एक एकर शेतावरील मिरची पिकावर तण नाशक फवारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.यामुळे शेतकरी
महेश पांडुरंग महाजन यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.महेश यांनी त्यांच्या आईसोबत प्रचंड कष्टाने एक एकर क्षेत्रात गादी पध्दतीने मल्चिंग पेपर आधारे मिरची पिकाची लागवड केली होती.सध्या हे मिरची फुलकळ्यांनी बहरून गेला होते, पुढील आठ दिवसांमध्ये सदर मिरची पीक तोडनीला येणार होते. तत्पूर्वीच अज्ञातांकडून महेश महाजन यांच्या बहरलेल्या मिरची पिकावर तण नाशकची फवारणी करण्यात आली आहे, त्यामुळे एक एकरावरील मिरची पिकाची शेती करपून गेली आहे.सदर घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली असून नुकसानग्रस्त पिकाची महसूल व कृषी विभागाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा यावरून वाद
- नाशिक आधी की त्र्यंबकेश्वर आधी यावरून शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमने सामने
- त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नामकरण करण्याची केली होती मागणी
- तर नाशिकच्या साधू महंतांनी व्याकरण आणि अन्य संदर्भ देत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हेच नामकरण बरोबर असल्याचं सांगत त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या मागणीला केलाय विरोध
- नाशिकच्या साधू महंतांच्या भूमिकेनंतर त्र्यंबकेश्वरमधील साधू महंत आक्रमक
- कुंभमेळा त्र्यंबकेश्वरलाच भरतो, नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज
- तंत्रकौलाचार्य पंडित मयुरेश दिक्षित यांचा महंत सुधीरदास दास यांना टोला
- नाशिक त्र्यंबकेश्वर वाद न करता या वादाला पूर्णविराम देण्याचा देखील सल्ला
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील ग्रामस्थ श्रीकृष्ण खुने यांनी कळंब पंचायत समिती कार्यालयासमोर गेली दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.गावातील मंदीराच्या जागेत केलेले अतिक्रमण काढावे,दलीत वस्ती मध्ये केलेल्या कॉंक्रीट रस्त्याची अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्यामुळे चौकशी करावी,गावात पाणीपुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केले असुन जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा खुने यांनी दिलाय.
- टीव्ही डीबेटवर नागपूर दंगलीबाबत पक्षाची बाजू मांडल्याने भाजप प्रवक्ते यांना जीवे मारण्याची धमकी
- भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी
- अजय पाठक यांच्याकडून नागपूरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार
- जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केलीय
- अजय पाठक नागपुरात घडलेल्या दंगलीवर प्रसारमाध्यमांकडे पक्षाची बाजू मांडतात
- दंगलीबाबत त्यांनी एका विशिष्ट गटावर आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवर ९७ या कोड क्रमांकावरून एक फोन आला
- ‘जो तूम कर रहे हो, वह ठीक नही हैं, इसलिये तुम्हारे साथ जो होगा वह ठीक नही होगा’, अशी धमकी देण्यात आली
- पोलिसांनी तक्रार अर्जाची नोंद घेतली आणि पुढील तपासासाठी तो अर्ज सायबर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला.
कर्नाटकातुन येणाऱ्या आंब्याच्या आक्रमणामुळे कोकणातील हापूस संकटात सापडला आहे. बाजारात कर्नाटकी आंब्याची मोठी आवक झाली असून ग्राहकांना तो कोकणचा हापूस म्हणून विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असताना हापूसच्या विक्रीवर त्याचा परीणाम होता दिसून येते आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे. APMC बाजारात कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवावा अशा सूचना व्यापाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी पणन विभागाकडे केली आहे.
नांदेड येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने केलेल्या तपासणीत ४१ पैकी १२ फटाका कारखाने प्रथमदर्शनी आढळलेल्या गंभीर ञुटी च्या आधारे बंद ठेवण्याचे दिले आदेश
स्फोटके भरण्यासाठी लोखंडी साहीत्याचा वापर करणे,तुटलेले दरवाजे,पञ्याचे छप्पर असणे, कामगारांची सुरक्षा नसणे आदी मुद्दे आढळल्याने करण्यात आली कारवाई
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्पोट होवुन ८ कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती या पाश्र्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले कारखाना तपासणीचे आदेश
महसुल विभागाच्या दोन पथकाकडुन देखील करण्यात येत आहे तपासणी, यामध्ये महसुली अटी,नियम याची तपासणी करण्यात येत असुन याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.
मोसंबीच्या आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसापासून मोसंबीच्या भावात चढ उतार सुरू असून सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या मोसंबीला कमीत कमी 13 हजार रुपये तर 23 हजार रुपये टन असा दर मिळत आहे. बाजारसमितीत दररोज 100 ते 120 टन मोसंबीची आवक होत असून जालन्याची मोसंबी जयपूर कोलकत्ता दिल्ली या ठिकाणी पाठवली जाते,मात्र सध्या उत्तर भारतातील मार्केटमध्ये आंध्र प्रदेशातील मोसंबीची आवक वाढल्याने झाल्याने जिल्ह्यातून होणाऱ्या मोसंबीचे भाव आगामी काळात वाढण्याची शक्यता कमी आहे.आंध्र प्रदेशातून येणाऱ्या मोसंबीचे भाव हे जालन्यातील मोसंबीपेक्षा कमी असल्याने त्याचा परिणाम स्थानिक मोसंबीच्या भावावर पडत असल्यानं जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केकच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झाली होती यानंतर एस आय टी कडन एक अर्ज करण्यात आला होता कीं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालया ऐवजी बीड न्यायालयात चालवावा आणि अर्जाला मंजुरी देत तो खटला बीडमध्ये चालवण्यासाठी विशेष न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आणि आज त्याची पहिली सुनावणी बीड न्यायालयात होत आहे या अगोदरची सुनावणी केज न्यायालयात झाली होती पहिल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे के जेथे हजर होते तर दुसऱ्या सुनावणीच्या दरम्यान बीडच्या न्यायालयात स्वतः सरकारी वकील उज्वल निकम हे हजर आहेत त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील या सुनावणीच्या दरम्यान हजर असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वतः उज्वल निकम आज बीडच्या न्यायालयात हजर राहणारा असून यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- बाजार समिती ५ दिवस बंद राहणार असल्याने कांद्याचे लिलाव देखील राहणार बंद
- मार्च एंड मुळे बाजार समिती ५ दिवस राहणार बंद
- २८ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत ५ दिवस बाजारसमिती बंद
- शुक्रवारी व्यापारी नसल्यानं, शनिवारी अमावस्या, रविवारी साप्ताहिक सुट्टी, सोमवारी ईद आणि मंगळवारी बँक व्यवहार बंद असल्यानं ५ कांदा लिलाव बंद
- बाजारसमिती ५ दिवस बंद राहणार असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण
भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ केली आहे.
गाडी क्रमांक ०९०२५ बलसाड दानापूर साप्ताहिक विशेष गाडी २३ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर - बलसाड साप्ताहिक विशेष गाडी १ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९०४५ उधना - पटना साप्ताहिक विशेष गाडी २७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०४६ पटना- उधना साप्ताहिक विशेष गाडी २८ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट - मेहबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९५७६ मेहबूबनगर - राजकोट साप्ताहिक विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९१२९ बांद्रा टर्मिनस - रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९१३० रिवा - बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २७ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- आणखी एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची नागपूर महानगरपालिकेची तयारीत होते. मात्र सुनावणी पर्यंत स्टे मिळाला...
- नागपूर दंगलप्रकरणात आरोपी शेख नाझिम याचे बिनाकी येथील बांधकाम अवैध असल्याची पाठवली होती नोटीस
- शेख नाझिमच्या आईने आरोपीच्या आईने नोटीसला काल उच्च न्यायालयात आव्हान दिले.
- न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत नोटीसला अंतरिम स्थगिती दिली
- शहरात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली होती
- त्यानंतर उच्च न्यायालयात बुलडोझर कारवाईला स्थगिती दिली
- आता बिनाकी येथील शेख नाझिम या आरोपीच्या नातेवाईकाच्या नावाने जागा आहे, या जागेवर म्हाडाकडून २० जानेवारी १९९३ रोजी बांधकामाची परवानगी देण्यात आली होती
- महापालिकेची नोटीस दंगलीमधील आरोप झाल्यावर सुडाच्या हेतूने पाठवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला.
- नागपुरात भंडारा रोडवरिल बिडगाव नाका क्रमांक पाच जवळ असलेल्या गुलशन ट्रेडर्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीजच्या गोदामांना रात्री भीषण आग..
- आगीत गोदामातील बारदाना, प्लॅस्टिक बॅगचे साहित्य जळून खाक..
- कळमना, लकडगंज, सक्करदरा मिहान- एमआयडीसी हिंगणा अग्निशमन केंद्रातून पाचहून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल..
- आग विझवण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत मोठी कसरत करावी लागली...
- आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदु नववर्षदिनी, गुढीपाडव्याला रविवार ३० मार्च रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि तिथून माधव नेत्रालय येथे जाणार आहेत.
- पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली.
- या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा आणि पोलिस प्रशासनाद्वारे पाहणी करण्यात आली तसेच आवश्यक ते निर्देश देण्यात आले.
पुण्यातील रामनगर, बावधन येथील यंत्रगीत व सानिया सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले ७ ते ८ दिवस झाले पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे पाणी वारंवार रस्त्यावर तुंबून शेवाळ निर्माण झाले आहे. शेवाळ झाल्याने रास्ता निसरडा झाला आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, रहिवाश्यांना चालणेही कसरीतीचे झाले आहे.
क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नाही. नागरिकांच्या जीवाशी न खेळता हे पाणी वाया जायचे थांबवावे जर येत्या ४८ तासामध्ये पाणी लाईन दुरुस्त झाली नाही तर होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन मनसे ने दिल .
शिरूर येथील सतीश उर्फ खोक्या भोसले वरती वेगवेगळ्या प्रकारची पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये तो न्यायालयीन कोठडीमध्ये असून जिल्हा कारागृहामध्ये तो आहे मात्र तिसऱ्या गुन्ह्यांमध्ये वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये सतीश रुपये खोक्या भोसलेच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला होता या छाप्यामध्ये त्याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणाऱ्या जाळ्या शिकार करण्यासाठी लागणारे हत्यारे आणि वन्य प्राण्यांचे काही मास आढळले होते या प्रकरणी त्याच्यावर त्यांनी तर आरोपींवरती वनविभागाकडून कोणाला हक्क करण्यात आला होता आणि याच पुण्यामध्ये वनविभागा सतीश रुपये खोक्या भोसले जिल्हा कारागृहांमध्ये ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे तशी शक्यता वर्तवली जात आहे त्याला ताब्यात घेऊन शिरूर येथील न्यायालयामध्ये हजर करून त्याची कोठडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकाच महिन्यामध्ये बाजार समितीमध्ये जवळपास 131 कोटी रुपयांच्या बेदाण्याची खरेदी विक्री झाली आहे.
सध्या रमजान ईद, गुढीपाडवा सण तोंडावर आले आहेत. त्यामुळे बेदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला बेदाणा विक्रीसाठी आणला जातो. गेल्या एक महिन्यांमध्ये जवळपास 4 हजार 700 टन बेदाण्याची विक्री करण्यात आली आहे. या विक्री मधून जवळपास 131 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. काल झालेल्या बेदाणा सौदे बाजारात अडीच हजार टन बेदाण्याची आवक झाली होती. उच्च प्रतिच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रति किलो सहाशे रुपयांचा दर मिळाला तर सरासरी तीनशे रुपयांचा भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी दिली.
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत काणे,पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे,युवा नेते विनोद गंगणे आदी राजकीय नेत्यांची नावे आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या २५ झाली आहे.यातील १२ आरोपी फरार आहेत तर १३ गजाआड आहेत दरम्यान मागील महीन्यात १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तामलवाडी टोलनाका जवळ ड्रग्स कारवाई केली होती त्यानंतर तब्बल दिड महीन्यांनी पोलिसांनी चार गोपनीय नावे जाहीर केली आहेत.यातील चार ही आरोपींना फरार घोषीत केले आहे.या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके नेमले असुन शोध घेण्यात येत आहे.ड्रग्स तस्करी प्रकरणात तुळजापूरातील आणखी काही लोक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन आरोपींची संख्या देखील वाढु शकते.
शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे तू आमचा मित्र ओंकार देशमुख याला का भिडलास?" असे म्हणत तरुणावर सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने पोटात, डोक्यात आणि पाठीत वार करत सौरव राठोड ला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन विधिसंघर्षित बालकाचाही समावेश असून, त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील तीन महिन्यांसाठी विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा फुल्ल झाल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजांची आॅनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली. काल पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासातच विठुरायाची नित्य व चंदन उटी पूजा फुल्ल आहेत. पूजेच्या नोंदणी मधून मंदिर समितीला 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास मधील टरबूज बाग झाली मातीमोल
एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जातं असल्याने फळपिकांना तग धरणे झाले होते मुश्किल
त्यात अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग झाली नेसस्तनाबूत
बार्शी तालुक्यातील राळेरास मधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांची साधारण एक एकर टरबूजाला याचा आर्थिक फटका बसलाय
यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काची १२६ प्रकरणं असून हे वारसदार लवकरच अंबरनाथ नगरपालिकेत विविध पदांवर नोकरीला लागणार आहेत. मात्र नोकरी लागण्यापूर्वीच अंबरनाथ पालिकेतील आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांची दलाली करणाऱ्या काही जणांकडून या लाभार्थ्यांना गाठत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. ही पैसे वसूली करण्यासाठी चक्क अंबरनाथ नगरपालिकेच्याच आवारात खुर्च्या टाकून सायंकाळच्या वेळी काही लोक बसत असल्याचंही बोललं जात होतं. याप्रकरणी स्वतः मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सोमवारी वारसा हक्काच्या सर्व लाभार्थ्यांची पालिकेत बैठक घेत त्यांना कुणालाही एकही रुपया देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. यानंतर मंगळवारी मनसेचे शहर संघटक बबलू खान यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देण्याची मागणी केली असून गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शासकीय सर्व्हिस रोडच्या जागेवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता उभारलेल्या संकुलावर कारवाई करण्याची मागणी करीत आ. साजिद खान पठाण यांनी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी लावली. सदर प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री ना. बावनकुळे यांनी बाबाजानी आणि टीमची बरीच अनधिकृत प्रकरणे समोर येत असून हा आकडा तीस प्रकरणांच्या जवळपास असल्याचे नमूद करीत या सर्व प्रकरणांची चौकशी आता एसआयटी नेमत करणार असल्याची घोषणा केली.
अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राऊंडजवळ घंटागाडी कामगार कचरा आणून टाकतात आणि त्यातलं भंगार वेगळं करून तो डम्पिंगवर नेला जातो. या कचऱ्यात स्प्रिंग वाल्या गाद्या, सोफे, टायर अशा वस्तू आल्यास त्यातून धातू वेगळा करण्यासाठी रेल्वे रुळाच्या बाजूला नेऊन जाळल्या जातात. त्यातून मोठा धूर निघून तो थेट रेल्वे लाईनवर जातो, ज्यामुळे आजवर अनेकदा रेल्वेसेवेला फटका बसला आहे. समोरच्या हाल्याचा पाडा, दत्तकुटीर या परिसरात लोकांच्या घरातही हा धूर शिरतो, त्यामुळं नागरिकही त्रासले आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी घंटागाडी कामगारांना समज द्यावी, अशी मागणी केली जातेय.
सोलापूर शहराच्या नई जिंदगी भागातील शांती नगरमध्ये प्लास्टिक कारखान्याला लागली भीषण आग
या भीषण आगीमध्ये संपूर्ण कारखाना झाला जळून खाक
कारखाना आगीपासून वाचवण्यासाठी अग्निशमक दलाने केले पूर्ण प्रयत्न,मात्र संपूर्ण कारखाना जळून झाला खाक
आग सध्या पूर्णतः विझली असून,आगीचे कारण अस्पष्ट,यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही,मात्र कारखानदाराला बसला मोठा आर्थिक फटका
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मुंबईत आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश.
काळा खडक येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देहूरोड मध्ये नको.हा प्रकल्प रद्द करा यासाठी मावळच्या मुक्ताई चौकात नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात स्थानिक नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.. काळा खडक येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन होणार आहे. मात्र त्याचे पुनर्वसन देहूरोड मधील विकास नगर किवळे या ठिकाणी करण्याचा घाट महापालिकेने केलेला आहे. झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले पाहिजे मात्र मात्र या झोपडपट्टीतील नागरिकांना विश्वासात न घेता त्या झोपडपट्टीचे पनर्वसन आमच्या देहूरोड मध्ये नको.. यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी म्हणून किवळे रावेत ला जाहीर करता. आणि या स्मार्ट सिटी मध्ये पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवतात हा कुठला न्याय. यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे असा सवाल नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला विचारला आहे.. किवळे हा भाग आता विकसित झालेला आहे आम्ही या ठिकाणी नऊ ते दहा वर्ष झाले राहतोय मात्र आता या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवत आहे तेही आमचे बांधवच आहे मात्र त्यांना इतरत्र कुठेही जागा द्या...
पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरातील सामाजिक सलोखा व एकके कायम राहण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला सर्व जाती-धर्माचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी युवा नेते यास अनेक मंडळाचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. मागील आठवड्यात एका तरुणाने शिवाजी महाराजांबद्दल अक्षता वक्तव्य केलं होतं. या सारखे खुलसड प्रकार पर्यटन स्थळी घडू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद यासारखे अनेक कार्यक्रम काही दिवसात होणार. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती... पंधरा ते वीस वर्ष वयोगटातील मुले आक्षेपार्थ पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करतात. राजकीय लोक समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही कुठेही औरंगजेबाचा समर्थन किंवा प्रचार करण्याचा प्रयत्न करत नाही.. लोणावळ्यात शांतता प्रस्थापित राहू द्या आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. रमजान ईद सुरू आहे मात्र हिंदू धर्माचे लोक सर्वात प्रथम इच्छा शुभेच्छा आम्हाला सकाळी सकाळी देतात....
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ११७ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) नियुक्ती करण्यात आली
पीएमआरडीएने या गावांचा विकास आराखडा तयार केला असून त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणीही घेतली आहे.
हा आराखडा आता मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे, असे असतानाही एमएसआरडीसीने या गावांचा पुन्हा नव्याने विकास आराखडा (डीपी) करण्याचे काम हाती घेतले आहे.
रिंगरोडच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटरच्या अंतरातील ११७ गावांच्या म्हणजे ६६८ चौरस किलोमीटर परिसराच्या विकासाचे अधिकार राज्य सरकारने 'एमएसआरडीसी'ला दिले आहेत.
पुणे - स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू
गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही.
गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप चाचणीचा अहवाल मिळालेला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.