Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पालघर रेल्वे स्थानकावरील ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २० जून २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, घाटमाध्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Dhanshri Shintre

पालघर रेल्वे स्थानकावरील ओव्हरहेड वायर तुटली, अजूनही रेल्वे वाहतूक विस्कळीत

अजमेर बांद्रा ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्थानकावर सायरन सातत्याने वाजत असून प्रवाशांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द

सिद्धांत यांनी निविदेची अनामत रक्कम भरली नसल्यानं लिलाव रद्द

हॉटेलची निविदा प्रक्रिया सातव्यांदा झाली रद्द

25 टक्के पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द

आरोपांनातर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय.

कोरेगाव भिमा येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून

कोरेगाव भिमा येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून

उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मोठा फटका

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात बंधाऱ्याचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीमुळे बंधारा वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील धापे प्लेट वेळेत न काढल्याने पाण्याचा दाब वाढून बंधारा फुटला

शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पाणी साठवणुकीवर परिणाम होण्याची भीती

पाण्याच्या उपलब्धतेवर गडद संकट, पाणी टंचाईची शक्यता वाढली

भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू...

भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू झाले असून

भिवंडी तालुक्यातील गोरसई येथील ही घटना आहे

घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्तीव्यवस्थापन व अग्निशामक पथकाकडून दोघांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे

सागर परशुराम धुमाळवय 30 विवाहित व अक्षय परशुराम धुमाळ वय 25 असे पाण्यात बुडालेल्या दोघा भावांची नावे आहेत . शोध मोहीम सुरू आहे.

भक्तिभावाने पुणेकरांनी केलं दोन्ही पालख्यांचे स्वागत

भक्तिभावाने पुणेकरांनी केलं दोन्ही पालख्यांचे स्वागत

दोन्ही पालख्या पुणे शहरात आज मुक्काम करणार

तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करणार

माऊलींच्या पालखीचा पालखी विठोबा मंदिरात मुक्काम

धारकरी घेणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन

धारकरी घेणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन

संभाजी भिडे करणार माऊलींच्या पालखीचे दर्शन

भक्ती शक्तीचा संगम पाहायला मिळणार

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल पुणेकरांनी केलं स्वागत

पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्याने धमाका

अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली.

पालघर रेल्वे स्थानका नजीकची घटना.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत.

लांब पल्ल्याच्या गाड्या 30 ते पस्तीस मिनिटं उशिराने.

वाहतूक पूर्ववत होण्यास तासभर लागण्याची शक्यता.

रेल्वे प्रशासनाची टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगमवाडीत पोहोचली

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नगारखाना संगमवाडी पोहोचला

माऊलींच्या नगर खाण्याचं केलं महानगरपालिकेने स्वागत

काही वेळात संगमवाडी पालखी पोहोचणार

सांगली - खानापूरच्या भाळवणीमध्ये शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या..

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भाळवणी येत्या बिबट्या मृता अवस्थेत आढळून आला आहे.भाळवणी येथील घोलमळा रोडवर असाणारया एका शेतातल्या विहिरीजवळ हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.भाळवणी येथील शेतकरी संभाजी धनवडे हे आपल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी आले असताना त्यांना झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला,त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ग्रामस्थांना बोलावले,ग्रामस्थांनी खात्री केल्यानंतर हा बिबट्या मृत असल्याचे निदर्शनास आले.याबाबत वन विभागाला कळविण्यात आले आहे,मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही,पण सदर भागात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

रायगड - आंबा नदीत तीन तरुण बुडाले

० आंबा नदीत तीन तरुण बुडाले

० रायगड जिल्ह्यातील बेणसे येथील घटना

० पाण्यात बुडालेल्या तीन ही तरुणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ; विवाहितेची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बीडमधील गढी येथे संत मुक्ताईंच्या पालखीचं रिंगण, मुक्ताई पालखी पाडळसिंगी येथे मुक्कामी

संत मुक्ताईची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली असून गेवराई तालुक्यातील गढी येथे मुक्ताईच्या पालखीचे स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी रिंगण देखील पार पडलं. यावेळी दिंडीतील वारकरी तसेच ग्रामस्थ रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदूंगाच्या गजरानं परिसर दुमदुमला होता. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आलं होतं. आज ही दिंडी पाडळशिंगी येथे मुक्कामी असणार आहे.

पुणे जिल्ह्यात अपघातात तरुणाचा मृत्यू, चारचाकी चालक फरार

शिरूर गोलेगाव रोडवरील गोलेगाव येथील कानिफनाथ मंदिर परिसर येथील रस्त्यावरून कंत्राट कामगार धनुष राम केवट (वय २२) हा पायी चालला होता. समोरून येणाऱ्या चारचाकीनं ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये तरुण जागेवर जखमी अवस्थेत पडला. हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता उपचार सुरू असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या कारचा चालक फरार आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

जळगावात हिट अँड रन, मद्यधुंद चालकाने दिलेल्या धडकेत महिला ठार

जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या वंदना सुनील गुजराथी रात्री सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. शहराकडून भरधाव वेगात वाघनगरकडे जाणाऱ्या मद्यधुंद चालकाने ओव्हरटेक करीत वंदना गुजराथी यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की वंदना गुजराथी १५ ते २० फूट फेकल्या गेल्या. धडक देऊन भरधाव वेगाने पुढे जात त्या चारचाकीने आणखी दोघांना धडक दिली. इतकेच नव्हे तर वाघनगर परिसरात काही घरांच्या बाहेरील कुंडी आणि बाक देखील धडक देत तोडले. यात वंदना गुजराथी यांचा मृत्यू झालाय.

कोल्हापुरातील वाहतूक कोंडीवर महापालिकेची आक्रमक कारवाई

कोल्हापुरातील वाहतूक कोंडी संदर्भात महापालिका आक्रमक.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतले अडथळे हटवले.

मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू, राजगड पक्ष कार्यालयात बैठकीला सुरूवात

मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू.

केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर आता विभाग प्रमुखांची बैठक.

मनसेच्या राजगड या पक्ष कार्यालयात बैठकीला सुरूवात.

अभ्यासक्रमातील हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या आंदोलनाचा पुढची दिशा ठरवली जाणार.

अमित शहा मुंबईत दाखल, फडणवीसांसोबत बैठकीची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल झाले आहेत.शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट होण्याची शक्यता वर्तवली जात असून, दोघांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

कल्याण पश्चिम एसटी स्टँडची दुरवस्था उघड...प्रवाशांचा संताप

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनलगत असलेले एसटी स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावर आहे. एसटी स्टँडजवळ पावसाळ्यात पाणी साचत असून, त्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाल्याचे पाहायला मिळत आहे . एसटी येताच प्रवाशांना हा चिखल तुडवत एसटी पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे .तर दुसरीकडे महिलांसाठी प्रसाधागृह नाही, उभं राहायला शेड नाही, बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकरही नसल्याने महिला प्रवाशांमध्ये नाराजी आहे .

तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी नियुक्ती

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

खेड शहरात शिरली ८ फूट लांबीची मगर

खेड शहरात पुराच्या पाण्यामुळे एक ८ फूट लांबीची मगर शिरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कन्या शाळा परिसरात मगर दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमनं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काळजीपूर्वक ही मगर पकडली आणि तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिलं.

मावळात पावसाचा कहर, मळवंडी ठुबे धरण शंभर टक्के भरले

मावळ तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून मळवंडी ठुबे धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून 3.69 क्यूसेस इतका विसर्ग पवना नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे.

Pune Palkhi: पालखीच्या आगमनाची पुणेकरांना ओढ!

माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

पोलिस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन पालखीसाठी सज्ज

पुण्यात आज दोन्ही पालख्या मुक्कामी असणार

पुणेकरांकडून पालखीचे दर्शन करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात

पुण्यातील संगमवाडी परिसरात दोन्ही पालख्या एकत्र येणार

Godavari: गोदावरीच्या पात्रात न उतरण्याचं प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

- मात्र तरी देखील काही अतिउत्साही नागरिक आणि पर्यटक सेल्फी आणि फोटोसेशन साठी गोदावरीच्या पाण्यात उतरले

- कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी, रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची गरज

Nashik: नाशिकमध्ये गोदावरीच्या पातळीत पुन्हा वाढ

-

- काल आलेला पूर ओसरल्यानंतर आज पुन्हा गोदावरीची पाणी पातळी वाढली

- गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली

500 कोटी चा भ्रष्टाचार झाला आहे-  राजू शेट्टी

जेल मधील ज्या वस्तू मिळतात त्यात 500 कोटी चा भ्रष्टाचार झाला आहे

त्याचे पुरावे देऊन ही कारवाई नाही

मुख्यमंत्री याना या घोटाळ्याकडे पहायला वेळ नाही

जनतेचा पैसे आहेत त्यांची उधळपटी सुरू आहे

राज्याचे मुख्य सचिव यांनी हा विषय मुख्यमंत्री यांच्या कडे बोट दाखवत आहेत

नदीपात्रात वारकऱ्यांनी भाविकांनी उतरू नये, पुणे पोलिसांचे आवाहन

धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे भिडे पूल आणि नदीपात्र पाण्याखाली गेले आहे. खबरदारी म्हणून वारकऱ्यांनी आणि भाविकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी असून शहरातील प्रमुख रस्ते आज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

पालखी आज पुण्यात! पुण्यातील हे रस्ते वाहतूकीसाठी बंद, पर्याय मार्ग कोणते?

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नानापेठ, बेलबाग चौक, पासोड्या विठोबा मंदिर आदी भागांतील वाहतूक पूर्णपणे किंवा काही काळासाठी बंद राहणार आहेत. पालखी मार्गावर शहर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २० जून रोजी पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बोपोडी ते खडकी बाजार रस्ता, तसेच जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील काही भाग वाहतुकीसाठी बंद राहतील.

Nandurbar: भर पावसाळ्यात सातपुड्यात भीषण पाणीटंचाई...

पावसाळा असूनही दुर्गम भागात पाणीटंचाईची झळ कायम....

सातपुड्याच्या दुर्गम भाग असलेल्या अक्राणी तालुक्यातील बिलगाव, बर्डीपाडा भागात पाण्यासाठी आदिवासी बांधवांचे हाल....

हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा जीव घेणा प्रवास....

दोनशे फूट खोलदरीत उतरून आणावं लागतं पिण्याचे पाणी....

आदिवासी बांधवांना नदीच्या झऱ्यातून प्यावं लागतं दूषित पाणी...

अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रास्तारोको...

अकोल्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोका आंदोलन केलंय.. अकोल्यातल्या डाबकी रोड रस्त्याच्या विस्तारकरणाच काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र अजूनही रस्त्याच काम झालं नसल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.. या रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे.. याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज मनसेने हे रास्ता रोका आंदोलन केलेय. मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Amravati: अमरावती जिल्हा परिषदेच्या आठ शाळांना लागलं टाळं...

* 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा..

* गेल्या चार वर्षातील धक्कादायक आकडेवारी..

* विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीचं...

* पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात झाली होती शिक्षकांवर निलंबनाची कारवाई..

* आता अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न रबविण्याची मागणी..

बारामतीमधील ए आय कार्यक्रमाला अजित पवार यांनी मारली दांडी

शरद पवार यांच्या सोबत एकत्र कार्यक्रम येणे अजित पवार यांनी टाळलं

अजित पवार न आल्यामुळे चर्चा

शरद पवार,सुप्रिया सुळे,सुनेत्रा पवार यूगेंद्र पवार कार्यक्रमाला उपस्थितीत आहे

अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आजच्या शेवटच्या दिवस प्रचारासाठी बारामती परिसरात व्यस्त आहेत

हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेचा शालेय शिक्षण संचालकांना इशारा

महाराष्ट्रात पहिल्या येते पासूनच हिंदी विषय सक्तीचा करण्यात आला आहे मात्र शासनाच्या या निर्णयाला मनसे शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदी विषय शिकवला गेला तर महाराष्ट्र ध्रुव समजू असा इशारा दिल्यानंतर अंधेरी मनसे विधानसभेच्या वतीने विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षण संचालकांची भेट घेऊन इशारा देण्यात आला सोबतच मनसेकडून अंधेरी पश्चिम परिसरातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना पत्र देऊन हिंदी विषय शिकवण्यात येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली.

Jalgaon: जळगावच्या धरणगावच्या पिंपरी येथे मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करण्यात आले आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पिता पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गनिमी काव्यामुळे पोलीसही चक्रावले

आंदोलनामुळे गावात काही वेळ निर्माण झाली गोंधळाची परिस्थिती

बीडचे संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा शाळा प्रवेश

कुटुंबासह संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्यजित सैनिक शाळेत दाखल

संतोष देशमुख यांच्या पत्नी,मुलगी,भाऊ व वाहिनेसह कुटुंब देखील उपस्थित.

गणवेशात दाखल झालेल्या विराज आणि सत्यजितव कुटुंबाचे आमदार खोतांसह शाळे कडुन करण्यात आले स्वागत..

Raigad: रायगडच्या पालक मंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांच मोठ वक्तव्य

० एकनाथ शिंदे यांच्या रिक्वेस्टमुळे त्यांच पालक मंत्री पद थांबल

० त्यांच्या दबावामुळे आमच पालक मंत्री पद थांबल नाही

० दिलेल्या पालक मंत्री पदाला ब्रेक लागला हा महत्वाचा भाग

खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस थांबला

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग होणार कमी

काल रात्री खडकवासला धरणातून 15000 क्यूसेक्स पाण्याचा करण्यात आला होता विसर्ग

हा विसर्ग कमी करून आता 11924 क्युसेक्स इतका करण्यात येणार

खडकवासला धरणात पाणीसाठा वाढल्याने विसर्ग काल रात्री वाढवण्यात आला होता

पण आता धरण क्षेत्रात पाऊस थांबला असून पाणी पातळी ही कमी झाली आहे म्हणून विसर्ग कमी करण्यात येत आहे

Amravati: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणीटंचाई..

पावसाळा सुरू झाला असताना देखील मोथा गावात महिलाना हंडाभर पाण्यासाठी करावी लागते पायपीट..

गावाबाहेर 1 किमी अंतरावर असलेल्या विहिरीतून आणावं लागत डोक्यावर पाणी..

घोट भर पाण्यासाठी आदिवासींयांची पायपीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट जारी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने पाठ फिरवली आहे. अधून मधून पावसाच्या सरी सुरू असल्यातरी पावसाचा जोर पूर्णता कमी झाला आहे. मात्र भात पेरणी व लावणी करण्यासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेले दोन दिवस अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 24.27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कणकवली तालुक्यात सर्वाधिक 64 मिमी पाऊस कोसळला आहे दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक कमी 03 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 जून ते 23 जून पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसतंय

त्यामुळेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे सोलापुरात ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सत्कार केला

‘’छगन भुजबळ यांच्या पराभव केल्यानंतर बाळा नांदगावकर प्रचंड मतांनी निवडून आले, तेव्हा दोन भावांनी (राज-उद्धव) जसा जल्लोष केला होता तो जल्लोष परत यावा ही शिवसैनिक म्हणून विनंती‘’

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या सत्कारानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची विनंती

Nashik: नाशिक शहरात 1 जून पासून 272 मिलिमीटर पावसाची नोंद

- गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची यावेळी नोंद

- 1 जून ते 19 जूनपर्यंत शहरात 272 मिलिमीटर पावसाची नोंद

- यंदा वेळेत मान्सून दाखल झाल्याने गेल्या पाच वर्षातील उच्चांकी पावसाची नोंद

- यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्यातच गोदावरीला देखील आला आहे पहिला पूर

- काल दिवसभर 61 मिलिमीटर पावसाची झाली आहे नोंद

एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थिती

शासकीय कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जात आहे

त्यांची भेट होणार पण ती राजकीय नसेल

मी शासकीय कार्यक्रमाला जात आहे0 एकनाथराव खडसे

नदी पात्रात उतरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शिकवला धडा...

जीव धोक्यात घालून नदी पात्रात अंगोळ करत सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी काढायला लावल्या उटक बैठका....

पुन्हा नदी पात्रात उतरल्यास दिला कठोर कारवाईचा इशारा...

शेतात लावलेली गांजाची झाडे जप्त

शेतात लावलेली गांजाची झाडे पोलिसांनी केली जप्त

नाशिकच्या देवळा तालूक्यातील उमराणे येथे राजेंद्र विठ्ठल देवरे यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती देवळा पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी छापा टाकत शेतात अकरा फुट उंचीची एक लाख रुपयां पेक्षा जास्त किमतीची गांजाची सहा झाडे जप्त केली असून,प्रकरणी देवरे याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sawant Wadi: सावंतवाडीतील रस्ते पुन्हा उघडले, पहिल्याच पावसात खड्डे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकृष्ट डांबरीकरणामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि जनतेच्या रोषानंतर त्यावर ठेकेदाराने पुन्हा केलेली मलमपट्टी यावर्षी पहिल्याच पावसात उघडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यात ठिकठिकाणी पुन्हा एकदा खड्डे पाहायला मिळत आहेत. ठेकेदाराला या कामांचे बिल अदा केल्याने पालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांसमोर डागडुजी कशी करून घ्यायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

बुलढाण्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ..

बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात पेरणी आटोपली .. तर काही भागात पेरलेले बियाणे उगवले सुद्धा.. मात्र मागील आठवडा भरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे .. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या शेतात स्प्रिंकलर लावून उगवलेली पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केलीय .. तसेच काही भागात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरणी बाकी आहे .. हवामान खात्याने 22 जून नंतर पाऊस येईल असे सांगितले आहे .. मात्र तोपर्यन्त शेतकऱ्यांनी आपली पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. . ...

शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती दोन दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेचा आज समारोप आहे.

ए आय कार्यशाळा कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये एकाच मंचावर येणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे,खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे या कार्यशाळा समारोपाला उपस्थितीत राहणार.

Koyna: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार

धरणाच्या पाणी पातळीत आठवडाभरात मोठी वाढ

दक्षता म्हणून आज सकाळी 9 वाजता धरणातून पाणी सोडणार

1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार

Yavatmal: यवतमाळच्या बाभूळगाव शहरात सराईत गुन्हेगाराकडून गावात दहशत माजविण्याचा प्रकार

जामिनावर सुटलेल्या दोन गुंडांचा घरावर सशस्त्र हल्ला, 30 मिनिट धुमाकूळ घालून पाळले गुंड

दहशतीमुळे व्यापाऱ्यांनी बंद केली दुकाने

वैभव उर्फ जहरीला जांभुळकर विशाल उर्फ पच्चीस रायबल यांनी भाड्याने दिलेला ट्रॅक्टर परत का मागितला या कारणावरून एजाज अली यांच्या घरासमोर येत वाहनांची केली तोडफोड

घरासमोर देखील केला राडा बाभूळगाव शहरात भीतीचे वातावरण, कठोर कारवाई करण्याची मागणी

बाभूळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 333, 324, (4) 352, 351,(2) 351(3) 335 भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा केला दाखल

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाने मनसोक्त बरसून सौंदर्य खुलवलंय

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जलधारा धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. उंच कड्यांवरून खळखळून कोसळणारा हा धबधबा, सभोवतालचे दाट धुके आणि बहरलेला हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाच्या आगमनानंतर परिसरात निसर्ग सौंदर्य खुलून आलं असून, डोंगरदऱ्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटना निसर्ग सौदर्याची भुरळ पडणार आहे

हर घर झाड संकल्पनेला ग्रामस्थांचा प्रतिसाद.... कडकनाळ गाव होणार हरितगाव...

दिवसेंदिवस होणारी वृक्षांची तोड लक्षात घेऊन, लातूरच्या उदगीर तालुक्यातील कडकनाळ गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने , अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे... गावात हर घर झाड, या संकल्पनेच्याखाली प्रत्येक घरासमोर एक रोप लावण्यात आले आहे.. तर या वृक्षाचं संगोपन देखील ग्रामपंचायतीने संबंधित घर मालकावर दिली आहे... दरम्यान या अनोख्या संकल्पनेच परिसरात कौतुक केलं जात आहे...

Junnar News : डिंभे धरणाच्या कालव्यावर लोखंडी पुल जिर्ण..मुलांसह शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास

आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या डिंभे धरणाच्या डावा कालव्यावरील आठ ते दहा लोखंडी पुलांची स्थिती अत्यंत धोकादायक बनलीय

डिभे धरणाच्या कालव्यावर आजुबाजुच्या गाव वाड्यावस्ती,शेतशिवारात जाणारे येणेसाठी लोखंडी पुल उभारण्यात आले मात्र सध्या हे लोखंडी पुलांना गंज लागुन जिर्ण झालेत या जिर्ण झालेल्या लोखंडी पुलाची देखभाल-दुरुस्ती झालेली नाही. पुलांचे मध्यभागी असलेले सपोर्टचे खांब तसेच प्रवासासाठी टाकलेली लोखंडी चादर पूर्णतः सडल्यामुळे हे पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांना या पुलांवरुन धोकादायक प्रवास करावा लागतोय

बंधारा दुरूस्तीसाठी युवा सेनेचे अन्नत्याग आंदोलन

माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा वाहून गेल्याने मोठी गळती लागली आहे. बंधाऱ्याची दुरूस्ती करावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

Junnar: सततच्या मुसळधार पाऊसाने फुलशेतीचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेवंती फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेयसततच्या पावसामुळे शेवंती फुलांच्या झाडाच्या मुळांना कुज येत असून, फुलांमध्ये पाणी साचल्याने शेवंतीची गुणवत्ता घसरली आहे. परिणामी बाजारात फुलांना योग्य दर मिळत नाहीये. त्यामुळे शेवंती उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. प्रशासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांना चक्क डुप्लिकेट खताची विक्री, मध्यरात्री हिंगोलीत खत विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली मध्ये बोगस खतांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत हिंगोली शहरात खत विक्रेत्याचा गोडाऊन सील केला आहे, कृषी विभागाच्या अधिकाराच्या चौकशीत गोडाऊन मधील खत चक्क डुप्लिकेट निघाले आहे दरम्यान या प्रकारानंतर बळीराजाची फसवणूक करू पाहणाऱ्या हिंगोली शहरातील खत विक्रेत्याविरोधात थेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार माऊलींच्या पालखीचे दर्शन

पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात रात्री १० वाजता घेणार माऊलींचे दर्शन

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार

संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्यमंत्री यांनी देहूमध्ये घेतलं होतं दर्शन

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात येणार

हजारोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळा आज पुण्यात

दोन्ही पालखी २ दिवस पुण्यात मुक्कामी असणार

माऊलींच्या पालखीचा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्काम

तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठ्ठल मंदिरात

शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन एस टी महामंडळ आता विद्यार्थ्यांना करणार पास चे वाटप

विद्यार्थ्यांना सवलत पास मिळवण्यासाठी यापुढे एसटी स्थानकात रांगेत उभे राहण्याची गरज नाही

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एसटी महामंडळाकडून मासिक सवलत पास चे होणार वाटप

शालेय सवलत पास काढताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी ही मोहीम राबवली असल्याची माहिती

एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी हजारो पासेस दिले जातातr

विद्यार्थी व पालकांना एस टी डेपो मध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत असायचा ज्यामुळे वेळ खूप लागायचा

आता मात्र विद्यार्थ्यांचे सामूहिक अर्ज शाळेमार्फत तयार होणार

शाळा व महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची माहिती एसटी महामंडळाकडे दिली जाईल

मंजूर पास शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

खडकवासला धरणातून काल रात्री 15 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ

प्रशासनाने कालच नदीपात्रालगत गावांना आणि घरांना सतर्कतेचा इशारा

वारीच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांना आवाहन

मुठा नदीच्या पात्रात कोणी उतरू नये, जिल्हा प्रशासनाचे वारकऱ्यांना आणि भाविकांना आवाहन

आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढवलेला नाही

आषाढीसाठी महामंडळाच्या अडीचशे बसेस

वारकऱ्यांना तसेच भाविकांना पांडुरंगाचे दर्शनासाठी एसटी महामंडळाने यवतमाळच्या नऊ आगारातून 250 बसेसचे नियोजन केले आहे

जिल्ह्यातून दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला जातात

यंदाही जवळपास 12 ते 15 हजाराहून अधिक भाविक एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करण्याची शक्यता आहे

जिल्ह्यातील भाविक वारी पासून वंचित राहू नये म्हणून एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पंढरपूर वारीचे नियोजन केले आहे.

Pandharpur: विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मिळणार थंडावा

थकून भागून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता विठ्ठल मंदिरात येताच थंडावा मिळणार आहे.

मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

यामध्ये आता मंदिरातील वातानुकुलीत यंत्राणाही कार्यान्वीत करण्यात आली आहे.

विठ्ठल गाभारा,चौखांबी,सोळखांबी या भागात दहा ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे.

मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेद्वारे आता विठ्ठल मंदिरात 23 ते 24 अंश सेल्सिअस तापमान ठेवणे शक्य होणार आहे.

मंदिर वातानुकूलित झाल्याने भाविकांना उकाड्यापासून होणारा त्रास कमी होणार आहे.

कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस, वावे बेंडसे रस्ता वाहतुकीस बंद

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने देखील आपले रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे.

सतत तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे

वावे बेंडसे गावाला जोडणाऱ्या उल्हास नदीवरील पूल परिसरात पाणी वाढल्याने येथील वाहतूक थांबवण्यात आली.

उल्हासनदी, चिल्लार नदी, पेज नदी पूर्ण क्षमते वाहू लागली आहे.

मात्र तालुक्यातील वावे बेंडसे या दोन गावांना जोडणारा उल्हास नदीवरील पूल आणि परिसरात नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत.

शिंदे शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

नांदेड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

नांदेड शहरातील हनुमान गड परिसरात शिंदे सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, तसेच मिठाई वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा ठाकरेंच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल राणे यांची आत्महत्या

शेतावर अतिक्रमण करून चौघांनी मानसिक त्रास दिल्याचा आत्महत्या पूर्वी गोपाल राणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख...

चिठ्ठीत ज्यांचे नावे आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा केला दाखल...

गोपाल राणे यांच्या शेतावर अतिक्रमण करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप.

कौठा- गडगा महामार्गावर धोकादायक पुलावरून वाहतूक

नांदेड जिल्ह्यातील कंधार- नायगाव तालुक्याला जोडणाऱ्या कौठा गावाजवळचा पुल धोकादायक बनलाय.

तब्बल 60 वर्षांहून अधिक असलेला हा पूल जीर्ण अवस्थेत आहे. या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत.

पुलावरून अनेकदा वाहन खाली पडून अपघात देखील झाले आहेत.

दरम्यान कंधारचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी याच रस्त्यावरून पर्यटक मोठ्या संख्येने येजा करतात.

त्यामुळे या ठिकाणच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केलीय.

इंद्रायणी नदी वाहते दुथळी, शेतकऱ्यांच्या शेतात गेले पाणी, भात पिकाचे मोठे नुकसान

नाणे मावळ परिसरामध्ये इंद्रायणी नदी तिचे स्वतःच पात्र सोडून दुथडी वाहत आहे. या नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी गेल्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना निराशाच पदरी पडणार आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर यावर्षी भात पीक होते की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पीककर्ज वितरणात बॅंकाचा हात आखडताच,केवळ 27.66 टक्केच उद्दीष्टपुर्ती

खरीप पेरणीसाठी खते,बियाणे आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे माञ राष्ट्रीयीकृत बॅंकानी पीककर्ज वितरणात हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे वाढले आहेत.बॅकांनी आत्तापर्यंत केवळ 51 हजार 328 खातेदार शेतकऱ्यांना 458 कोटी 80 लाख रुपयांचे पिककर्ज वितरीत केले आहे.म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ 27.66 टक्केच पीककर्ज वितरीत केले आहे.अजुनही हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नसल्याची स्थिती आहे.बॅंकाना खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाचा 1 हजार 658 कोटी 57 लाख रुपये लक्ष्यांक असुन बॅंकानी आतापर्यंत 458 कोटी 80 लाड रुपये वितरीत केले आहेत तर यंदा खरीपासाठी पिककर्ज मिळालेले खातेदार शेतकरी 51 हजार 328 खातेदार आहेत.

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातील पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून 19 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

सतत पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी...

धबधबे,पाण्याचे ठिकाणे, तळी, नदी, धरण इथे जाण्यास पर्यटकांना मज्जाव...

साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT