Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: पैशाच्या वादातून निर्घृण खून, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Priya More

Chhatrapati Sambhajinagar: पैशाच्या वादातून निर्घृण खून, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

अंगावर ऍसिड टाकून एकाचा खून तर एकावर चाकू भोसकून प्राणघातक हल्ला झाल्याचे घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. कागजीपुरा जवळ काल रात्री 11 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीचा चाकूने भोसकून प्राणघात हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर ऍसिड टाकून खून करण्यात आला. सदरील प्रकरणात 3 आरोपीस खुलताबाद पोलिसांनी ताब्यात देखील घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करत आहे.

Raigad News:  रायगड जिल्ह्यात तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांवर कारवाई

रायगड जिल्ह्यात तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिह्यातील रोहा शहरातील हि घटना असून नागरीकांच्या सतर्कतेमुळे हे तोतया इंकम टॅक्स अधिकारी गजाआड गेले आहेत. आपण इन्कम टॅक्स अधिकारी आहोत अशी बतावणी करत पाच जण रोहा शहरातील असिफ अन्सारी यांच्या घरात शिरले. आयडी दाखवून घरात प्रवेश केला मात्र अनावश्यक चौकशी आणि संशयास्पद आयडी कार्ड यामुळे अन्सारी यांना संशय आला आणि अन्सारी यांनी पोलिसांना फोन लावला. दरम्यान तीन जणांना पकडण्यात यश आले तर दोन जण फरार झाले. फरार झालेल्या दोघांचा शोध सुरु असून पकडलेल्या तीन जणांचे आयकार्ड, मोबाईल फोन रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Washim News: :जिल्हा परिषद मुख्य सीईओ वैभव वाघमारे यांच्या विरोधात 3000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन..

वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य सीईओ वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी या मागणीसाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी १ ऑक्टोबर पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केलंय,तीन हजार पेक्षाही जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत. वैभव वाघमारे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून असविधानिक काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय...

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना शाळेत विनाईल बोर्ड लावण्यासाठी स्वखर्चातून 50 हजार रुपये पर्यंत रक्कम खर्च करायला लावली, अंगणवाडी सेविकांना बोलकी अंगणवाडी करण्यासाठी लोकवर्गणी करायला जबरदस्ती केली, कार्यालयात येण्यासाठी उशीर झाला तर वाघमारे कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. यासारख्या त्यांच्या नियमबाह्य वागणुकीमुळे कर्मचारी त्रस्त झाले असून वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी जोवर बदली होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Baramati News: अजित पवारांना धक्का! माजी आमदार साथ सोडणार 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश थोरात हे आता लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी हाती तुतारी घेणार असून दौंड तालुक्याच्या विकासासाठी ही निवडणूक लढणार असल्याची त्यांनी म्हटलय. महायुतीमध्ये आपण सध्या असून ही जागा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनाच जाणार असल्याने आता आपण तालुक्यातील जनतेचा कौल लक्षात घेता निवडणूक रिंगणात उतरणार असून हाती तुतारी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे

Maharashtra Assembly Election: विधानसभेची मोर्चेबांधणी! मातोश्रीवरील बैठकांचे सत्र आज संपणार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक सत्राचा आजचा शेवटचा दिवस

२६ सप्टेंबर पासून दररोज विविध जिल्ह्यांच्या आढावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे

आज बारामती, मावळ, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील विधानसभा निहाय आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत

या लोकसभा मतदारसंघ तसेच मुंबईतील काही विधानसभांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत

या बैठकीसाठी बारामती, मावळ, पुणे, सातारा इथले प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत...

Chandrapur OBC Melava News: चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा,लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार

ओबीसी सेवा संघाच्या वतीने आज चंद्रपुरात सायंकाळी पाच वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याला प्रा. लक्ष्मण हाके, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र या मेळाव्यापासून खासदार प्रतिभा धानोरकर दूर आहेत. ज्या ओबीसी समाजाने लोकसभेत धानोरकर यांना भरभरून मदत केली, त्याच समाजाच्या मेळाव्यात खासदार नाहीत, हे चित्र अनेकांना खटकणारे ठरले. यातून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील समेटाच्या बातम्या वांझोट्या ठरल्याचे दिसून येत आहे.

Raigad News:  शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा शिवसैनिकांकडून निषेध

शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने पेझारी येथे निदर्शन केली. पेझारी येथील या निदर्शनाचे वेळी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मंगळवारी पेझारी येथील झालेल्या महिला मेळाव्यात चित्रलेखा पाटील यांनी खारेपाट भागातील तरुणांना एड्सची लागण झाली असल्याचे वक्तव्य केल होत. या वक्तव्या विरोधात हि निदर्शन होती. चित्रलेखा पाटील यांनी तरुणांचा अपमान केला असून या वक्तव्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून चित्रलेखा पाटील यांनी ग्रामस्थांची माफी मागावी अन्यथा त्यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी यावेळी दिला.

Pune News: पुण्यामधील दोन पोलीस शिपाई निलंबित

रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त झोन ४ यांनी निलंबित केले आहे.

पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर,आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.दोघेही विमानतळ पोलीस स्टेशन नेमणूकीला होते.

हा प्रकार १७ सप्टेबर रोजी विमाननगर येथे घडला होता. वंचित बहुजन सामािजक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

Dharashiv: शासनाच्या योजनांची माहिती देणारी गाडी मराठा आंदोलकांनी गावातून हाकलवून लावली

शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी गावात आलेली गाडी मराठा आंदोलकांनी हाकलवून लावली

धाराशिव च्या कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील प्रकार - मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी गावात आली होती गाडी.

धाराशिव-कळंब विधानसभेच्या भाजपाच्या इच्छुक उमेदवार डॉ.सरोजनी राऊत यांच्या वतीने शासनाच्या योजनांची करण्यात येतेय जनजागृती.

Nashik News:  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावरील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नाशिकमधील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावरील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न.

महात्मा फुले यांच्या अखंडातील ओळ वगळल्याने घेण्यात आला होता आक्षेप

वादानंतर काल महात्मा फुलेंच्या अखंडातील ओळी काढून टाकण्यात आल्या होत्या

आता तात्पुरत्या स्वरूपात बॅनरवर लावण्यात आला महात्मा फुलेंचा संपूर्ण अखंड

Nagpur News: नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह आढळले 

नागपूर - नरखेड तालुक्यातील मोवाड येथे पचोरी कुटुंबीयांच्या घरात चार मृतदेह आढळून आलेत

यातील तीन मृतदेहांचे हात पाय बांधले असून चौथा मृतदेह हा स्वतः लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे

यात जी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामध्ये तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर चौघाने स्वतः फाशी घेतल्याचं माहिती समोर येत आहे.

Mumbai News:  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांसाठी महिला टार्गेट?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांसाठी महिला टार्गेट?

मनसेतर्फे महिलांना साडी वाटप.

शिवतीर्थ येथे घाटकोपर पूर्व येथील महिलांना साडी वाटप.

सरकारच्या लाडकी बहिण योजनेसोबत मनसेचे महिलांना साडी वाटप.

Mumbai News: विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

विधानसभेबाबत राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

पुणे येथे ७ ऑक्टोबरला पुण्यात राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रचा आढावा.

पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांना तसेच महत्त्वाच्या नेत्यांना पुण्यात बोलवणार.

Wardha News: महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला राज्यपालांनी दिली भेट 

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला राज्यपाल यांनी दिली भेट

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासोबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आश्रमात येत केले अभिवादन

राज्यपालकडून आश्रमाची पाहणी

महात्मा गांधींच्या वस्तूंची पाहणी करत जाणून घेतली माहिती

महात्मा गांधींच्या कुटीत प्रार्थना करत वाहली श्रद्धांजली

Ratnagiri News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात.

पोलिसांकडून राजापूर न्यायालयात याबाबतची कागदपत्रे सादर.

पुढील मोजक्याच दिवसांत रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार.

गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं दिला होता शब्द.

Mumbai News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले.

शिवतीर्थ येथे राज ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची बैठक. बैठकीच कारण गुलदस्त्यात.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती.

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट.

आशिष शेलार आणि गणेश नाईक देखील अमित शहांच्या भेटीसाठी दाखल.

Mumbai News: भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला.

गणेश नाईक सह्याद्री अतिथीगृह येथे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल.

आशिष शेलार देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल.

Pune News: सुनील तटकरेंना घेण्यासाठी येणारं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं

पिंपरी चिंचवडमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर सुनील तटकेरांना घेण्यासाठी येत होतं

पुण्याहून मुंबईला येत होते हेलिकॉप्टर.

उड्डाणानंतर 3 मिनिटांत कोसळलं.

ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचं हेलिकॉप्टर.

HEMRL संस्थेच्या परिसरात कोसळलं हेलिकॉप्टर.

Mumbai News: अनंत अंबानी यांनी घेतली तेजस ठाकरेंची भेट

अनंत अंबानी यांनी घेतली तेजस ठाकरेंची भेट.

काल रात्री उशिरा मातोश्री येथे जाऊन घेतली भेट.

त्यानंतर अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

ही भेट रात्री दीडच्या सुमारास झाली.

Amravati News: अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा.

एम. बी.बी. एस.च्या प्रथम वर्षांसाठी 100 प्रवेश क्षमतेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजुरी.

20 ओक्टॉबरपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात.

1 नोव्हेंबर पासून महाविद्यालयाला होणार सुरुवात.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात सुरू होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण.

मुला मुलींसाठी वेगवेगळया वसतिगृहाची ही केली व्यवस्था.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Famous Actor: बॅालिवूडचा गोविंदा किती कोटींचा आहे मालक ? जाणून घ्या

Shahapur News : माळीण व इरसलवाडीच्या पुनरावृत्तीची शक्यता; कसारा येथे भूस्खलनाने घर कोसळले

Nagpur : तिघांचे हातपाय बांधले होते, मग स्वत: गळफास घेतला, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चौकशी होणार; राज्य सरकारचा निर्णय

Ayushman Bharat: आयुष्मान भारत कार्ड हरवलंय? टेन्शन घेऊ नका, ही सोपी प्रोसेस करा मोफत उपचार होईल

SCROLL FOR NEXT