Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live: महाड MIDC मधील ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीत स्फोट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 December 2024: आज गुरूवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील थंडीची लाट, मुंबई बोट अपघात, हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस, संसदेत वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

महाड MIDCमधील ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीत स्फोट

महाड MIDC मधील ॲस्टेक लाईफ सायन्सेस या कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाला. RB साईड नामक नवीन प्लॅन्ट मधील रिॲक्टरमध्ये स्टीमचा प्रेशर वाढल्याने हा स्फोट झाल्याचे कंपनी प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. दुपारची शिफ्ट सुटल्याने कामगार बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी स्फोटादरम्यान उडालेल्या पत्र्यांमुळे 10 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.

या स्फोटामुळे प्लॅन्टमधील यंत्रसामुग्री आणि इमारतीच्या काचा आणि पत्रे फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. महाड MIDC पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देत पहाणी केली असून फॅक्ट्री इस्पेक्टर यांच्या पहाणीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहीती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ, १२ जण ताब्यात

आक्रमक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलीस कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्यासह 12 कार्यकर्ते ताब्यात आहेत. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. भाजप कार्यकर्त्यांनी पेवर ब्लॉकने कार्यालयाच्या काचा फोडल्या. आक्रमक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठ्यांचा चोप दिला.

विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरण; पुण्यातील नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक

पुण्यातील नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने विद्यार्थ्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकाला अटक

कर्वेनगर परिसरातील असणाऱ्या नामांकित शाळेचे संस्थाचालक यांना अटक करण्यात आलीय.

अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे.

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ बीडच्या अंबाजोगाईत निदर्शने करत जेलभरो आंदोलन

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज बीडच्या अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर, निदर्शने करत जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत करावी व घरातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावे, घटनेतील पीडीत महिलांना १५ लाखाची मदत दिली पाहिजे, या घटनेतील पोलीस निरीक्षकावर ३०२ चे गुन्हे दाखल करावे, यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दरम्यान यावेळी ५० आंदोलकांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोर राडा, भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी राडा केला. भाजप कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फोटोवर शाई फेक केली. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमने-सामने आले.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला भीषण आग

मुंबई-अहमदाबाद येथील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकला आग लागलीय. हा ट्रक मुंबईकडे जात होतो मात्र आगीत संपूर्ण ट्रक जळून राख झालाय. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झालेले नाही. शॉर्टकटने आग लागल्याचां प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोल्हापुरात गर्भलिंग प्रकरणी छापे, सापडला अवैध गर्भपाताच्या औषधांचा साठा

कोल्हापुरात गर्भलिंग प्रकरणी छापे टाकण्यात आले आहे. फुलेवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयावर छापे टाकण्यात आले. अवैध गर्भपाताच्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा सापडला आहे.

मुंबई मेट्रो 3 अंतिम टप्प्यात; बीकेसी ते कुलाबा मेट्रो २०२५ पर्यंत होणार

मेट्रो 3 बाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीय. बीकेसी ते कुलाबा हा तिसरा टप्पा मे 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मेट्रोतून रोज 17 लाख लोक प्रवास करतील.

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तिकर यांचा आरोप होता. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने निर्णय दिलाय. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी अमोल किर्तीकर EVM मतमोजणीत एका मताने आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतमोजणीत ४८ मतांनी वायकर यांचा विजय झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४ मते, तर किर्तीकर यांना ४,५२,५९६ मते.

Pune News: पुणे तिथे काय उणे ! पिंडाला कावळ्या ऐवजी अगोदर कबुतर शिवतंय, अनोखं आंदोलन

पुण्यात जे घडतं त्याची चर्चा जगात असते, उगीच म्हणत नाहीत पुणे तिथे काय उणे... आता अशाच एका आंदोलनाची चर्चा शहरात चविणे चर्चीली जातं आहे. पुण्यात पिंडाला कावळ्या ऐवजी अगोदर कबुतर शिवतंय म्हणून एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक अनोखे आंदोलन केलंय.

एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाबा भिडे पुलाच्या पुढे नदीपात्राच्या रस्त्यावरती श्री अष्टभुजा दुर्गामाता मंदिरासमोर कबूतरांचा (पारवे) थवा असतो त्या ठिकाणी जे नागरिक येऊन कबुतरांना खाण्यासाठी अन्न/धान्य टाकतात. त्या पक्षीप्रेमींना मंडळाच्या वतीने पुणेकरांच्या आरोग्यासाठी हात जोडून विनंती करण्याचा उपक्रम करण्यात आला.

यावेळी येथे आलेल्या काही पक्षीप्रेमींना आम्ही हात जोडून विनंती केली व यापुढे कबुतरांना पुणेकरांच्या आरोग्यासाठी खाण्यासाठी अन्न टाकणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली. त्यावेळी त्यांना आम्ही पुण्यातील दशक्रिया कार्यक्रमाला पिंड ठेवतो त्या पिंडाला आता सर्वप्रथम कबूतर शिवते व नंतर कावळा शिवतो अशी परिस्थिती सध्या पुणे शहरातील आहे. या कबुतरांच्या विष्ठेमुळे घातक प्रकारचे विषाणू पसरत असून यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार उद्भवले आहेत. महापालिकेने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी अन्न खायला घालण्यास बंदी आणली असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी नदीपात्रामध्ये असलेल्या कबुतरांच्या तीन ठिकाणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ कबुतरांना अन्न न घालण्याचा व दंडात्मक कारवाईच्या इशारा देणारा फलक लावावा अशी मागणी केली आहे. याबाबत प्रशांत वेलनकर यांच्याबरोबर बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.

Amit Shah: अमित शहा यांच्याविरोधात बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने..

काल संसदेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण देशात केला जात आहे..

तसाच जाहीर निषेध बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली .. याप्रसंगी अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी करत अमित शहा मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आसूड मोर्चा,प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी....

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून केलेल्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून निर्घृण हत्या करत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने पूर्ण समाजमन ढवळुन निघाले आहे संपूर्ण बिड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात असुरक्षिततेचे सावट आहे घडलेल्या गुन्ह्याची व्याप्ती बघता कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच गुन्हेगाराना पाठीशी घालत आहेत शिवाय गुन्हेगावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपीना अटक करावी, घटनेचा मुख्यसूत्रधार शोधावा, खून खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरील मोर्चा बाजार समितीच्या मैदानांवरून मुख्य चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालया समोर मोर्चा धडकला यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे दिसून आले.

मंत्री संजय राठोड यांना पालकमंत्री पद नको, वाशिममध्ये शिंदे सेनेकडून विरोध

मंत्री संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्री पद नको...

वाशिममध्ये शिंदे सेनेकडूनच विरोध.... कार्यकर्ते उतरले रस्त्यावर...

संजय राठोड विरुद्ध घोषणाबाजी...

संजय राठोड यांच्या विरुद्ध वाशिममध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक...

वाशिमच्या पाटणी चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने....

भावना गवळी यांना मंत्रीमंडळात समावेश करा...

कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीच्या राड्यात मनसेची एंट्री

दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे .मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो. गाडीला अंबर दिवा लावून फिरतो. सोसायटीत इतकी दहशत की, कोणीही त्याच्या विरोधात बोलत नाही. दोन दिवसात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरु. शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिसात हजर करु असा इशारा पोलिसांना दिला आहे . खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.

व्हीओ :- कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱयांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. सोसायटीतील लोकांना माराहाण केली. विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहे. या प्रकरणी खकडपाडा पोलिसानी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहे .दरम्यान या सोसायटी मधील नागरिकांनी आरोपी केला आहे की ,अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करताे. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बाेलले तर तो त्याला दमबाजी करतो. काही दिवसापूर्वी एका किरकोळ कारणावरुन त्याने एका तरुणीला तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकी दिली होती. या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अमरनात वाघमोडे यांनी सांगितले की, धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरपाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात मनसेनेही एंट्री केली आहे. अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भिती दाखवितो. या बाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिले शुक्ला यांची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु आहे. दोन दिवसात त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ

विरार मधील पेल्हार पालिका समिती कार्यालयाला आग

पाणी पुरवठा,बांधकाम आणि आरोग्य विभागाचे कार्यालय

या आगीत महत्त्वाचे कागदपत्रे, फाईल जळून खाक

पहाटे आग लागल्याची घटना, कारण अद्याप अस्पष्ट

आग कोणी लावली का,? किंवा लागली यांचा तपास पोलिस करत आहेत

Nashik: नाशिकमध्ये अमित शहा यांच्याविरोधात आंदोलन

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून नाशिकमध्ये देखील शहर काँग्रेसच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आज आंदोलने करण्यात आले होते... नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय... दरम्यान यावेळी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शहा आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला..

धाराशिव मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.अमित शहा यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.यावेळी महाविकास आघाडी पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते.

Dombivli: डोबिंवलीत टाटा पावर परिसरातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल

डोंबिवली मधील टाटा पावर परिसरातील माऊली प्रसन्न हाऊसिंग सोसायटीच्या बी व्हिंग मध्ये लागली भीषण आग

घटनास्थळी अग्निसमन दलाचे तीन गाड्या दाखल

आग विजवण्याचे प्रयत्न सुरू

इमारतीचा तल मजल्यावर सतगुरू ऑटो पार्ट्सचे गोडाऊन आहे

सुरक्षितेचे दृष्टीने पोलिसांनी इमारत रिकामी केल्या

Ravindra Waikar : खासदार रविंद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा होता किर्तीकर यांचा आरोप

Mumbai Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा, २ जण अद्याप बेपत्ता

मुंबईतील समुद्रात स्पीड बोटीनं फेरी बोटीला दिलेल्या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी माहिती दिली. कुलाबाजवळ समुद्रात नीलकमल बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत. भरधाव बोट चालवल्याप्रकरणी आम्ही नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सर्व मृतांची ओळख पटलेली आहे. अधिक तपास सुरू आहे, असं मुंडे यांनी सांगितलं.

Mumbai News: औषधे जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

औषधे जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

औषधे जप्तीची मनमानी कारवाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने दिला दणका

औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत औषधे जप्तीचा अधिकार केवळ औषध निरीक्षकांना: मुंबई उच्च न्यायालय

पोलीस महासंचालक कार्यालयाला यासंदर्भात परिपत्रक जारी करण्याचे निर्देश

इंदोर फॅक्टरीतून मुंबईत आलेल्या आयुर्वेदिक औषधांची गाडी

किंग्ज सर्कलजवळ शीव पोलिसांनी रोखली होती

तपासाअंती गाडीतील 40 हजार रुपयांची औषधे जप्त करण्यात आली होती

औषध कंपनीने पोलिसांच्या कारवाईला उच्च न्यायालयात दिलं होत आव्हान

सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Solapur News: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार पुन्हा एकदा आक्रमक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार पुन्हा एकदा आक्रमक

अमित शाह यांच्या प्रतिमेला माथाडी कामगारांनी जोडे मारत आणि चपलांचा हार घालून केला निषेध

प्रतिमेला जोडे मारत असताना पोलिस आणि माथाडी कामागारामध्ये झटापट

काल मध्यरात्रीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामागारानी काम बंद आंदोलन सुरु केलंय

शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल असताना आज कांद्याचे लिलाव देखील होणार नाहीत

तर दुसरीकडे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आपला संताप व्यक्त करतायात

Nashik News: नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांची दहशत, दगडांनी फोडले सीसीटीव्ही

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांची दहशत, दगडांनी फोडले सीसीटीव्ही

अल्पवयीन मुलांनी दगडांनी फोडले परिसरातील सीसीटीव्ही...

त्याच बरोबर परिसरातील स्ट्रीट लाईट वरही फेकले दगड..

संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद...व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत...

Pandharpur News: आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ

भाजपाकडून पक्षशिस्तभंगाच्या कारवाईनंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांचीही नोटीस...

जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या कार्यकाळाती चौकशी अहवालावरून मोहिते पाटलांना नोटीस

डीसीसी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर, इतर सहकारी संस्थांवर संचालक पद का रद्द करू नये याबाबत मोहिते पाटलांना नोटीस...

Dharashiv News: अमित शहांच्या आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे कळंबमध्ये पडसाद

धाराशिव - अमित शहांच्या आंबेडकरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे कळंबमध्ये पडसाद

कळंब शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात अमित शहा यांच्या फोटो जोडे मारुन व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत केली जोरदार घोषणाबाजी

कळंब शहरातील भीमसैनिक व नागरीकांच्या वतीने आंदोलन करत केला अमित शहांचा निषेध

Byte:अनिल हजारे,आंदोलक

Palghar News: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्राफिक जॅम

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्राफिक जॅम.

डहाणूतील धानीवरी ते चारोटी दरम्यान वाहतूक कोंडी.

गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा.

धानीवरी येथील सुसरी नदीवर असलेल्या नादुरुस्त पूलामुळे वाहतूक कोंडी.

रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक तसेच प्रवासी आणि स्थानिकही त्रस्त .

Maharashtra Politics: नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये विरोधकांचे आंदोलन

नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये विरोधकांचे आंदोलन

अमित शहांविरोधात विरोधकांचे आंदोलन

विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते भाई जगताप, सचिन अहिरे, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, सतेज पाटील, आदित्य ठाकरेंसह सर्व आमदार उपस्थित आहेत.

डोक्यावर निळ्या टोप्या आणि हातात आंबेडकरांचा फोटो घेऊ आंदोलन सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेबांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो

Nagpur News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानप्रकरणी आज महाविकास आघाडीचे आंदोलन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानप्रकरणी आज महाविकास आघाडीचे आंदोलन

आज सकाळी १० वाजता संविधान चौकात महाविकास आघाडी करणार आंदोलन

महाआघाडीतील पक्षांचे आमदार संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन

Pune News:  पुणे शहरतील बोगस तपासणीसाठी पथक तयार

पुणे शहरतील बोगस तपासणीसाठी पथक तयार

तीन पथक करणार बोगस दस्तची तपासून

शहारत विविध पथक तयार करून दस्त नोंदणी बाबत तपास सुरू

बनावट दस्त करण्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार

हवेली १३ चे सह दुय्यम निबंधक कासेवाड यांची चौकशी करा...

Nagpur News: विधान परिषदेच्या सभापतीपदाची आज घोषणा होणार

विधान परिषदेच्या सभापती पदाची आज घोषणा होणार

आज अकरा वाजता परिषदेत सभापती पदी राम शिंदे यांचं नाव घोषित होणार

एकच अर्ज आल्याने सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Mumbai News: नीलकमल बोट दुर्घटनेतील 2 प्रवासी अद्यापही बेपत्ता

नीलकमल बोट दुर्घटनेतील दोन प्रवासी अद्यापही बेपत्ता

७ वर्षीय जोहान निस्सार पठाण आणि ४३ वर्षीय हंसराज भाटी अद्यापही बेपत्ता

समुद्रात सुरू असलेलं मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू

अपघातातील मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता

अपघातात आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू तर ९८ जणांना वाचवण्यात यश

अपघातात वाचवण्यात आलेल्या दोघं अत्यवस्थ

अपघातात नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह एकूण तीन कर्मचारी देखील दगावले

Solapur News: अमित शाह यांनी आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे सोलपूरात तीव्र पडसाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे सोलापुरात तीव्र पडसाद

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री 12 वाजता माथाडी कामगारांचे शाह यांच्या विरोधात आंदोलन

कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार बाजारात आलेला कांदा उतरवन्यास तयार नाहीत

बाजार समितीमध्ये अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी माथाडी कामागरकडून केली जातेय

Jalgaon News: जळगावमध्ये वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

जळगाव - वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

धरणगाव चांदसर बु. येथिल गिरणा नदी पात्रातील खळबळजनक घटना

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील सदस्य जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले

Nagpur News: मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

ही भेट राजकीय नसून शुभेच्छा देण्यासाठी घेतली

आम्ही जनतेच्या बाजूने आहे,आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढा उभारू

ज्या पक्षाला बहुमत मोठ्या प्रमाणात दिले ते गांगरून जाते, अंतर्गत कलह असल्याने खातेवाटप लांबत आहे

या देशात उद्धव ठाकरे ला कोणही हिंदुत्व शिकवू शकत नाही,सयद नोमानी सशिकवू शकला की नाही ते माहीत नाही

Mumbai News: नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी?

नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी?

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा

प्रत्येकाला बसायला जागा देखील नव्हती त्यांच्यासाठी अतिरिक्त खुर्च्या लावण्यात आल्या होत्या

अनेकांना लाइफ जॅकेट मिळाले नाही: प्रत्यक्षदर्शी.

पैशाच्या हव्यासपाई बोटीत लोक भरली जातात: प्रत्यक्षदर्शी

बोटीत १०० हून अधिक प्रवासी होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT