Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: बीडच्या केज तालुक्यातील शाळेच्या मध्यान्ह भोजनातून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 17 January 2025: आज शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्राचे हवामान, राजकीय घडामोडी, बीड संतोष देशमुख प्रकरणातील अपडेट, सैफ अली खानवरील हल्ल्याचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

बीडच्या केज तालुक्यातील शाळेच्या मध्यान्ह भोजनातून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा

बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे एका शाळेतील मध्यान्ह भोजनातून (खिचडी) ३४ विद्याथार्यांना विषबाधा झालीय. या विद्यार्थ्यावर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन नंतर निरीक्षणासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरात वावरणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

कालच खडकवाडी परिसरातील ईश्वरी रोहकले हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात फसला.

नववर्षीय मुलगा खून प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बारामती तालुक्यातील होळ येथे नऊ वर्षे मुलाचा वडिलांनी वडिलांनीच खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

देशातील 63 साखर कारखाने तयार करणार मक्यापासून इथेनॉल

केंद्र सरकारने देशातील 63 सहकारी साखर कारखान्यांना ऑफ सिझन काळात मक्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिलीय. आज पुण्यात नँशनल शुगर फेडरेशन आणि केंद्रीय सहकार सहसचिवांची पुणे साखर आयुक्तलयात बैठक झाली. त्यात या प्रस्तावाला मान्यता दिली गेल्याचं साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.या प्रकल्पसाठी केंद्राकडून अर्थपुरवठा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, मी सध्या राजकीयदृष्ट्या अगदी निवांत असून आहे तिथेच बरा हे आणि आजही मला छान झोप लागते. त्यामुळे तुर्तास तरी इतरत्र कुठेही जाण्याचा विचार नाही, असा खुलासाही हर्षवर्धन पाटलांनी केलाय.

Beed News : बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार?

Satara News : साताऱ्यात अज्ञात महिलेची हत्या, परिसरात खळबळ

साताऱ्यातील फलटणमध्ये अज्ञात महिलेचा हत्या

विडणी गावाजवळील पंचवीस फाटा येथील घटना

महिलेच्या कवठी, पायाचा भाग सापडला

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख रुग्णालयात दाखल

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रुग्णालयात केले दाखल

अशक्तपणा जाणू लागल्याने केज मधील खाजगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार

शरद पवार गटाला धक्का! आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटात करणार प्रवेश

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राजीनामा दिलाय. १८ डिसेंबरला शिर्डीच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये होते. मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत रोष व्यक्त

बीडच्या केज तालुक्यात कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. केज राजेगाव रस्त्यावर टायर जाळत त्यांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच टायर जाळत त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. वाल्मीक कराडवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. ते तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी करत कराड समर्थक आक्रमक झाले आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बसला आग

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे लेनवर खोपोली हद्दीत बसला आग लागली असून, या घटनेनंतर आय आर बी यंत्रणा, देवदूत टीम, फायर ब्रिगेड स्पॉटवर घटनास्थळी दाखल झालेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजेगाव येथे कराड समर्थक आक्रमक

वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या.

या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे कराड समर्थक आक्रमक..

नानासाहेब चौरे असं या समर्थकाचे नाव आहे. तो दिव्यांग आहे.

एक तासापासून पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन.

खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही आक्रमक पवित्रा.

बदलापुरात बलात्कार गुन्ह्यातील फिर्यादीच झाली आरोपी

बदलापुरात बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादीच झाली आरोपी

मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने रचला बलात्काराचा बनाव

पोलिसांकडून दोन आरोपींना बेड्या, वकील भाऊजी फरार

बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिलाही गायब

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ईश्वरी ही रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत होती.

Cold Play: कोल्ड प्ले या आंतराष्ट्रीय कॉन्सर्टसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम वर 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी कोल्ड प्ले चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला 45 हजार पेक्षा अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेडियमच्या आतमध्ये 1 पोलीस उपायुक्त, 70 पोलीस अधिकारी 434 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हिंगणघाटच्या आमदाराकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांचा नागरी सत्कार

हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांनी राज्यमंत्री पंकज भोयर यांचा नागरी सत्कार केलाय. या समारोहात पंकज भोयर यांच्यासह सुमित वानखेडे, बकाने यांचाही सत्कार करण्यात आलाय. या समारोहला हिंगणघाट शहरातील विविध संघटनांचाही सहभाग होता.

ओशिवरा डेपोत बसला लागली आग

बस दुरुस्ती करत असताना सीएनजी बस ने अचानक घेतला पेट

खाजगी कंत्रालदार हंसा सिटी यांच्या मालकीची सीएनजी बस दुरुस्त करताना आग लागली

लागलेल्या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

डेपोतील अग्नी विरोधक यंत्राच्या साह्याने बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न

आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू

केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाल्याचे समोर आले आहे..तर मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे अद्याप समजू शकलेले नाही

शेतीच्या वादातून भावानेच केला बाप-लेकाचा खून...; लातूरमधील धक्कादायक घटना

लातूरच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या तीन भावंडांनी बाप-लेकाचा खून केल्याची धक्कादाय घटना घडली आहे... दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांना तिघांना अटक केलीय.. कासार शिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय..

लोणावळा ॲम्बी व्हॅली मार्गावर घाटात वाहतूक कोंडी.. उसाची मळी सांडल्यामुळे वाहने फसली.....

लोणावळा ॲम्बी व्हॅली मार्गावर घाटात ऊसाची मळी सांडल्यामुळे वाहने फसली. यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. आयएनएस शिवाजी, आपदा मित्र आणि इतर संस्थांनी घटनास्थळी धाव घेत मळी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली., लोणावळा येथून टायगर पॉईंट कडे जाणाऱ्या ॲम्बी व्हॅली मार्गावर घाटामध्ये एका वाहनातून उसाची मळी सांडली.

फेसबुकच्या मैत्रीतून जवळीक.. ब्लॅकमेल करून लग्न आणि शारीरिक छळ!

उल्हासनगरात एका तरुणीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं. मात्र तरुणाने त्यांच्यातल्या काही नाजूक क्षणांचं चित्रीकरण करत तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी अक्षरशः सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे.

राज्याचे एआय धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती

राज्याचे एआय धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवे धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स शिफारस करणार असून, पुढील ३ महिन्यात शिफारस करण्याचे आदेश टास्क फोर्सला देण्यात आलंय. एआय वापरास गती देण्यासाठी नवे धोरणाची निर्मिती होणार असून, महिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमणूक करणार आहेत. टास्क फोर्समध्ये एकूण १६ सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

सैफ अली खान प्रकरण, संशयित आरोपीला ताब्यात घेतलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

सैफ अली खान प्रकरणात ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर, संशयित आरोपी नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. चौकशी झाल्यानंतर पोलीस संशयित आरोपीला सोडून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव दुसरेच असते- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव दुसरेच असते, मी सी. पी. राधाकृष्णन म्हणून इथे नसतो

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

बीडच्या अंबाजोगाईत गोळीबार

जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झल्याची प्राथमिक माहिती

गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना

अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील घटना

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; नऊ जणांचा जागीच मृत्यू

Vo नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पो ने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झालाय.

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर एक माथेफिरू रेल्वे इंजिनवर चढला

डेक्कन ओडिसी ट्रेनवर चढत केला विद्युत तारांना स्पर्श

परराज्यातील कामगार तरुण असल्याची पोलिसांची माहिती

तारेला स्पर्श केल्याने 25 वर्षीय तरुण भाजला

आरपीएफ जवान तातडीने मदतीसाठी धावले

तरुणाची प्रकृती गंभीर, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू

बीडच्या राणुबाई देवी यात्रेत रंगली भव्य जंगी कुस्त्यांची दंगल

बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावात, आयोजित राणुबाई देवी यात्रे निमित्त भव्य जंगी कुस्त्यांची दंगल रंगली. यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवलाय..

वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर

पुण्यातील अमेनॉरा मध्ये दोन फ्लॅट आहेत

ज्योती जाधवच्या नावाने हे फ्लॅट खरेदी करण्यात आले आहेत

ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्मी असल्याची माहिती

एक फ्लॅट हा शरद मुंडे याच्या नावे तर दुसरा फ्लॅट हा ज्योती जाधवच्या नावे आहे

सैफ अली खान हल्लाप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी २० पथके

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचां शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध शाखेची 20 शोध पथके

झोन 9 मधील क्राइम ब्रांच सोबतच एटीसी पथकाचाही समावेश

आरोपी हल्ला करून पळाल्यानंतर साधू वासवानी चौक परिसरात कपडे बदलून वांद्रे स्टेशन कडे जात असताना सूत्रांची माहिती

हल्ल्यानंतर आरोपीने कपडे बदलल्याचा रस्त्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती

Saif Ali khan: सैफ अली खान हल्ला प्रकरणात एकजण ताब्यात

सैफ अली खान हल्ला प्रकरणात एकजण ताब्यात घेण्यात आला आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणारा चोरट्याचे वसई विरारच्या दिशेने पलायन

हा चोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे

पोलिसांचा तपास सुरू असून सीसीटिव्ही तपासण्यात आले आहेत

सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोराचा मागोसा पोलिसांकडून घेतला जातोय

बापानेच केला नऊ वर्षांच्या मुलाचा खून; भिंतीवर डोकं आपटत घेतला जीव.....

बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय.१४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागपुरातील कथित मानसोपचार तज्ञ याच्या विरोधात आता चौथा गुन्हा दाखल

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्या पोलिसांना सूचना.

- नागपुरात कौन्सलिंग सेंटर चालवणाऱ्या मानोसपचार तज्ञांचे लैंगिक छळाचे एका मागून एक प्रकरण उघडकीस येत आहे...

- विजय घायवट असं मानोसपचार तज्ञ असलेल्या आरोपीच नाव

नायलॉन मांज्यांच्या जाळ्यातून वाचला घारीचा जीव

कर्वेनगर भागात नायलॉन मांज्यात अडकली होती घार

शैलेश व्यवहारे या तरुणाने दिले घारीला जीवदान

मकर संक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि नागरिक मांज्यामुळे झालेत जखमी

गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावाजवळील झाडावर चढला बिबट्या

बिबट्या झाडावर चढल्याचे बघून नागरिकांची मोठी गर्दी

गंगापूर तालुक्यातील माळुंजा परिसरामध्ये बिबट्यांचा वावर गेला काही दिवसांपासून असल्यामुळे लोक भयभीत

वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे

रंकाळ्याच्या प्रदूषणात वाढ; हजारो मासे मृत

ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या या रंकाळ्याला कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह... कोल्हापूरचा नेकलेस असेही अनेक जण म्हणतात. मात्र महापालिका प्रशासनाकडून रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळेच रंकाळ्याच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे.

आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने मंजूर केला तात्पुरता जामीन

विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात झाली होती अटक

लग्नासाठी आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे

शिवम राजेश तिवारी असे जामीन देण्यात आलेल्या आरोपीचे नाव

मार्च २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात तिवारी याला दोन डिसेंबर २०२४ ला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली होती.

पुणे महानगरपालिकेसाठी मनसे कडून तयारी सुरू

पुणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनसे जाणार प्रत्येक नागरिकाच्या घरी

मनसे कडून 'मनसे आपल्या दारी' अभियानाची मोहीम

मनसे कडून प्रभाग निहाय आढावा घेत तयारी केली जाणार

पुणे महानगरपालिकेत सध्या मनसेचा एकच माजी नगरसेवक

सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी करिनाचा जबाब आज नोंदवण्याची शक्यता

मुंबई पोलिसाची टीम सैफ अलीच्या घरी दाखल

पोलिसांचे 2 अधिकारी सैफच्या सद्गुरू शरण इमारतीत दाखल झाले आहेत

अभिनेत्री करीना कपूर खान हीचा जबाब अद्याप पोलिसांनी नोंदवला नाही

करिनाचा जबाब पोलीस नोंदवण्याची शक्यता

वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा सीआयडीला संशय

संतोष देशमूख हत्या प्रकरण तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील एक सिमकार्ड हे परदेशात रजिस्टर केलेले असल्याचे समोर आले आहे. यामुळेच वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला असून आता त्या दिशेने तपास सुरु आहे.

बीड जिल्हा पुन्हा हादरला; आष्टी तालुक्यातील दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या..

आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या..

या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झालीय..

दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत..

गृहराज्यमंत्री योगेश कदम आज घेणार पुणे पोलीस विभागाचा आढावा

गृहराज्य मंत्री योगेश कदम घेणार आज पुणे पोलिसांची बैठक

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला राहणार उपस्थितीत

पुणे पोलीस आयुक्तालयात योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली बैठक

पुणे शहरातील गुन्हेगारी बाबत गृहराज्यमंत्री घेणार आढावा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था या संदर्भात सुद्धा बैठकीत होणार चर्चा

अमरावती एमआयडीसीमध्ये महिला कामगाराला अन्नातूनच विषबाधा; आरोग्य विभागाचा अहवाल

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीस मधील गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगारांना झालेली विषबाधा अन्नातूनच, आरोग्य विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल...

'गोल्डन फायबर कंपनीच्या कॅन्टीनमध्ये आढळल्या अळ्या-झुरळ'

अन्नातूनही दुर्गंधी येत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीतून उघड...

12 जानेवारी रोजी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीत असलेल्या गोल्डन फायबर कंपनीत 100 पेक्षा अधीकच्या कामगारांना झाली होती विषबाधा...

विषबाध्येच्या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि एफडीएने केली होती उपहारगृहाची तपासणी...

तपासणी दरम्यान उपाहारगृहाकडे अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना नसल्याची ही धक्कादायक बाब उघडकीस, FDA करणार दंडात्मक कारवाई...

Byte : डॉ. मनीषा सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, अमरावती

Byte : बाबुराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन

Teacher Recruitment: राज्यात दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरती होणार

पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती

शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करा शिक्षण आयुक्तांचे आदेश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून करता येणार प्रक्रिया

शिक्षण विभागाने काढला आदेश

पंकज भोयर यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्या,भाजप नेत्यांची मागणी

वर्धा जिल्ह्यात यंदा भाजपचे चारही आमदार निवडून आले आहे. सोबतच राज्याच्या सरकारमध्ये अनेक वर्षानंतर भाजपा आमदाराला राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की पंकज भोयर यांना वर्धेच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी.

'आरटीई’च्या शाळांमध्ये घट, शिक्षण विभागाकडून कारणांचा शोध

२०२५-२६ साठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

मात्र या प्रक्रियेत प्रवेशासाठी उपलब्ध जागा वाढल्या असल्या तरी राज्यभरातील शाळांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत घटल्याचे स्पष्ट झाले आहे

त्यामुळे शाळांची संख्या का कमी झाली याच्या कारणांचा शोध शिक्षण विभागाने सुरू केला आहे

Dharashiv News: शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम

शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्यावर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येवुन शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गुरूवारी केलीय.

काळ्या उसाला सणासुदीच्या काळात मागणी वाढली...

मागील तीन महिन्यांपासून बाजारात विक्रीस आलेल्या काळ्या उसाला सणासुदीच्या काळात मोठी मागणी आहे. यंदा काळ्या उसाचे उत्पादन घटल्याने बाजारात त्याला चांगला भाव मिळत आहे. एका उसाच्या नगाला 35 ते 40 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

Pune News:  पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतल्या पुणेकरांच्या अडचणी

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाणून घेतल्या पुणेकरांच्या अडचणी

नागरिकांच्या विविध विषयातील अडचणी समजून घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार थेट रस्त्यावर

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः चालत कोरेगाव पार्क परिसराची केली पाहणी

कोरेगाव पार्क परिसराची पाहणी करत पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागरिकांच्या अडचणी तात्काळ दूर करा पुणे पोलीस आयुक्तांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश

कोरेगाव पार्क परिसरासह पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून नागरिकांच्या भेटीगाठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT