वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण
कोर्टाने लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांचा जामीन फेटाळला
वैष्णवी हगवणे प्रकरणातील तीन आरोपींनी जमिनीसाठी केला होता न्यायालयात अर्ज
मात्र न्यायालयाने जामीन फेटाळला
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) कंपनीविरोधात यवतमाळ जिल्ह्यात ३९ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता चिपळूणमध्ये देखील बहिण भावाची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या चार जनांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. याप्रकरणी प्रतिक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीची घटना जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत चिपळूण शहरातील इंटक भवन, पागमळा येथील TWJ असोसिएट्सच्या कार्यालयात घडली.
बीडच्या सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावाला याचा फटका बसला आहे. 75 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफचे जवान करत आहेत. मात्र त्या नागरिकांचे प्रकृती खालावली असून त्यांना प्रचार उपचारासाठी मिल्ट्रीचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे संपूर्ण साहित्य सलाईन स्ट्रेचर संपूर्ण मेडिसिन या ठिकाणी दाखल करण्यात आलाय. जवळपास आठ वैद्यकीय अधिकारी यामध्ये आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात नशेखोराची कोयता हातात घेऊन भर रस्त्यात दहशत
शहरातील एन 9 परिसरात असलेल्या मैदानाजवळ भर दिवसा कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न
सीना नदीला महापूर आला आहे या महापुरामध्ये करमाळा व माढा तालुक्यातील अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे जवळपास 16 ते 17 गावांच्या शेतशिवारात पाणी साचले आहे या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा व करमाळा च्या दौऱ्यावर येणार आहेत.
राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने किती मदत केली, याचा शासन निर्णय काढावा राज्यातील पूर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी काँग्रेसच शिष्टमंडळ जाणार आहे. 300 तालुका नुकसान झाले 143 लाख हेक्टर नुकसान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दोन दिवसानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर सकल आदिवासी समाजाने आज विविध मागण्यासाठी प्रचंड मोर्चा काढला.अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात धनगर, बंजारा आणि इतर गैर आदिवासी समाजाचा समावेश करू नये, तसेच मूळ आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवावे,अशी मागणी या प्रसंगी आदिवासी बांधवांनी केली..भर पावसात आदिवासी भगिनी व बांधवांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. "एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान ", "बोगस हटाव, आदिवासी बचाव" या घोषणांनी परिसर दणाणून गेला..
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टेम्पो व दुधाचा टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला. अपघातात दुधाचा टँकर एक्सप्रेस वे च्या छोट्या पुलावरून खाली कोसळला. या अपघातात पोल्ट्री मधील वाहतुक करणाऱ्या टेम्पो मधील एकाच मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झालेत.
विश्वंभर तिरुखे असे याचे नाव आहे. त्यानेच वाघमारे यांची गाडी जाळली. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वारंवार नवनाथ वाघमारे बोलत असल्याने मनात राग धरून कृत्य केल्याची कबुली.
बीडच्या सिंदफणा नदीकाठच्या हिंगणी हवेली येथील पुराच्या पाण्यामध्ये जवळपास नऊ नागरिक अडकले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे सिंदफणा नदी पात्राने रौद्ररूप धारण केले असून याचा फटका या गावकऱ्यांना बसला आहे आणि गेल्या जवळपास दहा तासाहून अधिक काळ झाला आहे हे नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहे.
आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील आदिवासी आमदार खासदार येणार एकत्र....
उद्या दुपारी दोन वाजता विधान भवनात होणार आदिवासी सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक....
आदिवासींच्या आरक्षणात होणाऱ्या घुसखोरीचा विरोधात बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदिवासी आमदार आणि खासदार घेणार भेट....
आदिवासी सल्लागार समितीचा बैठकीला राज्यातील 26 आदिवासी आमदार आणि 4 खासदार राहणार उपस्थित...
आदिवासींच्या समस्या ,मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणार चर्चा...
राज्यातील 26 आदिवासी आमदार आणि 4 खासदार घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.....
मराठवाड्याला पावसानं झोडपलंय. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्याचं काम सुरू. नुकसानग्रस्तांना मदत करणार. उद्या मी धाराशिव दौऱ्यावर जाणार. माझ्याबरोबर मंत्री प्रताप सरनाईक येतील. तसेच इतर लोक असतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा साठा जप्त केला असून दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
शेतकऱ्यांनी अडून धरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा.
'जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या', शेतकऱ्यांची मागणी.
'मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही' गिरीश महाजन यांचे वक्तव्य.
माढ्याच्या सीना दारफळमध्ये एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल
एंकर- माढ्याच्या सीना दारफळमध्ये एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत.
सीना दारफळमध्ये सुरक्षीत स्थळी हलवण्यासाठी एनडी आर एफची मदत घेण्यात आली आहे.
येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी
पूर्व द्रुतगतीमार्गावरील घाटकोपरच्या उड्डाण पुलाखाली मातीने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात
कारला वाचवत असताना डंपर उड्डाण पुलाच्या संरक्षण भिंतीला जाऊन जोरदार धडकला
चालक व क्लीनर किरकोळ जखमी असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन जाण्यात आले आहे
यामुळे आता पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर ते विक्रोळी पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे
घटना स्थळी अग्निशामक दल व वाहतूक विभाग पोहोचले असून हा डंपर आता साईडला करण्यात आलेला आहे
वाहतूक नियंत्रणात करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाला सुरुवात झाली असून आदिवासी प्रभागातून इतर कुठल्याही जातीला आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणी साठी हच्चाराच्या संख्येने आदिवासी बांधव एक वाटले असून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला देखील आदिवासी समाजातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात सध्या बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन केले जात आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज आक्रमक झालं असून आज शहादा शहरात भव्य मोर्चा काढण्यात आले आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणात चनकापूर,पुनंद,हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणावर गिरणा व मोसम नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे गिरणा धरणाचे सात दरवाजे आता उघडण्यात आले असून धरणात 30 ते 35 हजार क्यूसेक आवक येत असल्याने धरणातून 19,808 इतका पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रातून पुढे जळगाव जिल्ह्यात जात आहे
महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात हा मोर्चा
उद्धव ठाकरे सेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा
महावितरणचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू नयेत अशी उद्धव ठाकरे सेनेची मागणी
मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मोर्चात सहभागी
धाराशीवमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता उद्या देवेंद्र फडणवीस पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्याच्या इंदापूर शहरात बस स्थानकासमोर धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी बंद....
रंगवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद पोलिसांचा बंदोबस्त.....
रंगवली नदीच्या पुलावर बॅरिगेट्स खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन सज्ज.....
सलग दुसऱ्या दिवशी आंदेकर टोळीवर कारवाईचा बडगा
पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीतील सदस्यांच्या अनधिकृत आस्थापनांवर कारवाई
पुणे पोलिस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई
आंदेकर टोळीतील अनधिकृत जागांवर बुलडोझर
कारवाईसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे साबळेवाडी वस्ती गेली पाण्याखाली
सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावचा संपर्क तुटला
साबळेवाडी गावातील 70 ते 80 कुटुंबीयांचे स्थलांतराचे प्रयत्न सुरु
यामुळे साबळेवाडी वस्तीतील सर्व कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पाडला आहे.
साबळेवाडीतील घर पूर्णतः पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सीना नदीचा प्रवाह विस्तीर्ण झाल्याने अक्षरश गळाभर पाणी या वस्तीत आले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू, रापली, तळेगाव रोही परिसरात पिकांचे नुकसान झाले असून काढणीला आलेला मका, बाजरी, सोयाबीन ,तूर यासह या भागातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कांदा पिकांसह कांद्याचे रोपे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास आस्मानी संकटाने हिरावून नेला.त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चनकापूर धरण 99 टक्के भरले असून धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून 17997 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गिरणा नदीला पूर आलाय,पाऊस सुरू राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
मराठवाड्यात पुढील २ दिवस पावसाचा जोर कमी होईल पण येत्या २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र आणि ते पुढे पश्चिमेकडे वळत असल्यामुळे मराठवाड्यात जोरदार पावसाचा पूर्वानुमान व्यक्त करण्यात आला आहे. सध्या तरी मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढे पावसाची तीव्रता पाहता हा अलर्ट बदलला जाऊ शकतो अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे आणि त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच वरच्या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीला अभूतपूर्व पूर आलाय या पुरामुळे गोदाकाचे अनेक गावं पुराच्या पाण्यामध्ये अडकले आहेत परभणीच्या पाथरी तालुक्यातील गोंडगाव शिवारांमधील पूर्ण पाणी हे आलेला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत सलग पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) ची पथके बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर अथक परिश्रम करून बचावकार्य हाती घेतले.
बीड जिल्ह्यातील मजलगाव तालुक्यातील संडास चिंचोले येथे एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर चालवलेल्या मोहिमेत आज सकाळी एका नवजात बालकासह एका महिलेचा सुरक्षित बचाव करण्यात आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील विविध भागांतून 26 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
मराठवाडाप्रमाणे जळगाव जिल्ह्यात मोठा पाऊस पडतोय. बऱ्याच तालुक्यात ढगफुटी झालीय. सरसकट जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करणार आहोत.
निधीच्या संदर्भात अजितदादांशी बोलणे झाले आहे. त्यातून मार्ग काढण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आहे
पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
पाच दिवस पावसाचे आहेत. सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीचा घेतला जाणारा आढावा
ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री करणार
मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
लातूरच्या मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर मांजरा धरणाचे आठ दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय, नदीकडच्या गावांना प्रशासनाकडून सतरतेचा इशारा देण्यात आला. मांजरा नदीवरील 12 उच्च पातळीचे बंधारे हे 100% टक्के क्षमतेने भरले आहेत.
भडगाव पाचोरा चाळीसगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने अक्षरश झोडपून काढले. बहुतांश भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली.येथील शेतकरी संघाच्या खतांच्या गोडावूनमध्ये पाणी शिरून रासायनिक खतांच्या सुमारे १ हजार ४०० गोण्या भिजल्या. यात युरिया, डीएपी, सुपर फॉस्फेट, पोटॅश सल्फेट आदींचे सुमारे १४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यवस्थापक सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील शेकडो मनसे कार्यकर्ते आज भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे. पक्षविरोधी कारवाई केली या कारणावरून मनसेतुन येथील पदाधिकाऱ्यांची हाकलपट्टी केली होती. या मुळे रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून भाजपचा ताकद मिळणार आहे. आज होणाऱ्या या पक्ष प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते भाजपचा जय घोष करीत मुंबईकडे रवाना झाले.
मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात बचाव कार्य आणि मदतीसाठी छत्रपती संभाजी नगर, नाशिक जिल्ह्यातून आर्मीची टीम पाठवण्यात आली आहे.
बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये आर्मीला बोलवले.
गोदावरी नदीपात्रातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी वाढत असल्याने खबरदारी घेणे सुरू
पैठण शहरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचले होते. आज या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधा यासाठी उपाययोजना आणि आवश्यक साफसफाईचे काम तत्परतेने पूर्ण करण्यास नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी सर्व स्थानिक शिवसेना पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते.
- सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय
- सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले
- सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले.
- सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
- धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ
- सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली
- मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सिंदफणा नदीला पूर आला आहे याचे पाणी बऱ्याच भागांमध्ये घुसले असून बीडच्या नांदूर हवेली गावाला याचा फटका बसला आहे गावामध्ये पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते मात्र स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमध्ये येऊन नांदूर हवेली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्याचबरोबर तात्काळ मदत मिळण्यासाठी आश्वासित देखील केलेली आहे त्याचबरोबर पूर्वग्रस्त भागात गुतलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ मदत पोहोचवा.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर, बोरसर, भायगाव, जानेफळ, नांदगाव अनेक गावात पहाटे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्याला पूर आला आहे. वैजापूर शहरात अनेक घरात पाणी शिरले. गेली दोन आठवड्यापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर वस्त्यांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय.
नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
वैभव खेडकर जोरदार शक्तीप्रदर्शन करत खेडमधून मुंबईकडे रवाना
रत्नागिरी शहरातून देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश
पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीतील आणखी तीन सदस्यांना गुंडां विरोधी पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत तसेच रावण टोळीतील दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार पिस्टल, तीन जिवंत काडतुसे असा जवळपास आठ लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अनिकेत अशोक बाराथे वय 27 वर्ष, अश्विन सुधीर गायकवाड वय 21 वर्ष आणि यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा वय 19 वर्ष असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या रावण टोळीतील सदस्यांची नाव आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेले आरोपी आपला इतर काही सहकार्यांसोबत चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील नगर येथील एका सराफा व्यापाराच्या दुकानात दरोडा टाकण्या साठी जाणार होते असे पोलीस तपासात उघडकीस आल आहे.
मुसळधार सुरू असल्या पावसामुळे अंत्यविधी कुठे करावं असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोनोवाडीमध्ये चांगोबाई भागचंद राठोड या वयोवृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरवर ठेवून नेण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात मृतदेह ठेवावा लागला. मृत्यूनंतरही होणारी अशी हीलहवालद परिस्थिती पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मुसळधार सुरू असल्या पावसामुळे अंत्यविधी कुठे करावं असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोनोवाडीमध्ये चांगोबाई भागचंद राठोड या वयोवृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरवर ठेवून नेण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात मृतदेह ठेवावा लागला. मृत्यूनंतरही होणारी अशी हीलहवालद परिस्थिती पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत सलग पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) ची पथके बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर अथक परिश्रम करून बचावकार्य हाती घेतले.
बीड जिल्ह्यातील मजलगाव तालुक्यातील संडास चिंचोले येथे एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर चालवलेल्या मोहिमेत आज सकाळी एका नवजात बालकासह एका महिलेचा सुरक्षित बचाव करण्यात आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील विविध भागांतून 26 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा मध्ये सुद्धा कपिलापुरी गावात पाण्याने वेढलेल्या 9 नागरिकांना एनडीआरएफने रात्रभर सुरू असलेल्या प्रयत्नांतून सुरक्षित बाहेर काढले. सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफ पथकाने पूर्ण रात्र अविरत काम करत 59 नागरिकांचा जीव वाचवला.
सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या 2 लाख 12 हजार 651 क्युसेक इतक्या विसर्गाने पाणी प्रवाहित होत आहे. इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आलेला दिसून येत आहे. माढा तालुक्यातील 16 गावात तर करमाळा तालुक्यातील 10 गावात सीना नदीचे पात्र सोडून पाणी शिरले गेले आहे. त्यामुळे साधारण 1800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आंबी गावातून भूम कडे जाणारा संपर्क तुटला,
अंबी, जयवंत नगर येथील दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी
शंभर वर्षात असा पाऊस पाहिला नाही गावातील लोकांच्या भावना
रात्रभर मुसळधार पाऊस भीतीदायक स्थिती असल्याचही नागरिकांनी सांगितलं
शंभर वर्षांपूर्वीचा पूल वाहून गेल्याची नागरिकांची माहिती
कडबा गंजी, जनावरे, संसार वाहून गेल्याची गावकऱ्याची माहिती
रस्त्यावर माती दगडांचा खच, रस्ते वाहतूक बंद
रात्रीपासून लाईट नाही, इंटरनेट व्यवस्था ही विस्कळीत
बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्प परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे ढाळे पिंपळगाव,पिंपरी साकत,हिंगणी,झाडी,बोरगाव परिसराचा संपर्क तुटला आहे.काढणीला आलेले सोयाबीन गुडगाभर पाण्यामध्ये गेल्याने मातीमोल झालं आहे.यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संपर्क संकटात संपला आहे.सततच्या पडणाऱ्या पावसाचा द्राक्ष उडीद,मूग,कांदा पिकाला देखील मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जालन्यातील परतुर तालुक्यातील गोळेगाव गावात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्यरात्री गावामध्ये अचानक पाणी शिरल्याने मध्यरात्रीपासून ग्रामस्थांना गावाबाहेर मुक्काम करावा लागला. दरम्यान गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्याने परतुर तहसीलदारांनी खबरदारी म्हणून ग्रामस्थांना दुसऱ्या गावात हलवल्याची माहिती आहे..
आगळगावात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चांदणी नदीला महापूर ९ तासापासून उत्तर बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला असून आगळगावातील नदी काठच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली.गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने उडीद, कांदा, सोयाबिन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. चांदणी नदीमुळे मांडेगाव, खडकलगाव, धसपिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या मार्गावरील सर्व गावाचा बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला आहे
धाराशिवच्या भूम, परांडा, कळंब परिसरात मुसळधार पाऊस
भूम मधील अंबी गावच्या चहू बाजूने पाणी, तालुक्याशी संपर्क तुटला
रात्रीपासून वीज नाही, इंटरनेट विस्कळीत
गिरीश महाजन आज जिल्हा दौऱ्यावर
पावसामुळे शाळेला सुट्टी
सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ
- सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय
- सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले
- सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले.
- सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
- धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ
सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली
- मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.या घटनेमुळे मसोबाचीवाडी,बांगरवाडी,चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः उतरले पुराच्या पाण्यात
पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी लावली बाजी
अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खासदार पुराच्या पाण्यात शिरले
एनडीआरएफ टीमच्या मदतीने वाचवला जीव
ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत दिली याबाबतची माहिती
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दि. 23.09.2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामध्ये गावातील तब्बल 23 लोक एका घरावर अडकून पडले आहेत. यासाठी सध्या मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. गावाच्या परिसरामध्ये आमदार संदिप क्षीरसागरांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे.
प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी! आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल
पुणे पोलिसांनी आवळला आंदेकर टोळीचा फास
मासेविक्रेत्यांकडून २० कोटी रूपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा
पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून तब्बल १२ वर्षे प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली उकळली खंडणी
सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी आंदेकर कुटुंबातील एका महिलेचाही समावेश
फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आंदेकर टोळीने मागील १२ वर्षांपासून मासे विक्रेत्यांना जीवे मारण्याची धमकी देत दरमहा मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली. या काळात व्यापाऱ्यांकडून तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे
जालना जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय.जालन्यातील नसडगाव परिसरात देखील मुसळधार पाऊस झाल्याने शेताला तलावाचं स्वरूप आलंय. जोरदार पाऊस झाल्याने नसडगाव येथील शेतकऱ्यांच्या खरिपातील सोयाबीन, कपाशी पिकाच अतोनात नुकसान झालंय. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळच्या एका गावातील खाजगी शिकविणे शिकत असताना आरोपी खाजगी शिक्षकाने विद्यार्थिनीची मैत्री करीत तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर वारंवार एकांतात तिला शिकविण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला पिढीचा गर्भवती राहिल्याने तिला नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले विद्यार्थीनीही 16 वर्षाची होती. गर्भपाताच्या गोळ्या अति झाल्याने तिची प्रकृती खालावली पिडितेचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.
जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. काल दिवसभरात प्रशासनाने 35 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली.जालन्यातील विरेगाव येथील 14 तर हिवर्डी येथील 21 जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढलं.जालना तालुक्यातील वाहणाऱ्या कल्याणी, गिरीजा नदीला पूर आल्यानं हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.दरम्यान काल घटनास्थळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, हे उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाले आणि ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली . तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे, अनेक गावांचा संपर्क कालपासून तुटलाय, निलंगा ते कासार- शिरशी, भेटा, उस्तुरी, निलंगा देवणी यासह इतर मार्ग देखील पाण्याखाली आहेत. तर येत्या काळात हवामान विभागाने लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा आणि मन्याड या सर्व नदींना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकच्या नांदगाव तालूक्यात असलेल्या सर्वात मोठे गिरणा धरण काही दिवसांपुर्वी १०० टक्के भरले मात्र जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने व धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघण्यात आले असून धरणाच्या चार दरवाजातून हे प्रत्येकी ६०सेमी तर दोन दरवाजे ३० सेमी ने उघडण्यात येऊन त्यातून १२.३८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरु झाल्याने नदीकाठच्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
- विदर्भ राज्य आंदोलन समितीने २८ सप्टेंबर रोजी नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्याचा इशारा
- गेल्या १३ वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर करार हा विदर्भाच्या विकासासाठी फसवणूक ठरला असल्याचा आरोप करत
- सिंचन निधी, नोकऱ्या, मंत्रिपदे आणि तांत्रिक शिक्षणातील हक्काचा वाटा मिळाला नसल्याने प्रदेश विकासापासून वंचित राहिला आहे.....
- हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रश्न आजही गंभीर आहेत....
- यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी कारंजा लाड येथे विदर्भ राज्य निर्माण जनठराव सभा होणार असून, ग्रामीण स्तरावर आंदोलन नेण्याचा संकल्प करण्यात आला आ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड उपविभागीय कार्यालयासमोर महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचे 7 दिवसापासून अमारण उपोषण सुरू आहे. संपूर्ण एक कुटुंबासोबत बसलेले आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणीही भेटायला नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. बंजारा समाजाने मागणी केल्यानंतर एसटी प्रवर्गात असलेल्या महादेव कोळी यांचं आरक्षण धोक्यात येईल म्हणून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.या घटनेमुळे मसोबाचीवाडी,बांगरवाडी,चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.